agricultural stories in Marathi, agrowon, animal husbundry advice | Agrowon

शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील रिंगणी व्याधी
डॉ. एस. एस. पिटलावार
रविवार, 6 जानेवारी 2019

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे बैलावर अवलंबून आहेत. आंतरपिकातील मशागत, भात शेतात माल वाहतूक व ज्या ठिकाणी ट्रॅक्‍टर किंवा इतर वाहने जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी माल वाहतूक अशी कामे बैलांच्या साहाय्याने केली जातात.

गायी व म्हशीमध्ये बरेचसे आजार किंवा व्याधी या शल्कचिकित्सा संबंधित आहेत जसे की, शिंगाचा कर्करोग, डोळ्यांचा कर्करोग, खांद्यावरील ट्युमर, अस्थिभंग, जखमा इत्यादी या व्याधीपैकीच एक म्हणजे रिंगणी. जनावरांमध्ये रिंगणी व्याधी झाल्यास जनावर विकून न टाकता त्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून उपचार केल्यास जनावरे पूर्ववत कामासाठी वापरता येतात.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे बैलावर अवलंबून आहेत. आंतरपिकातील मशागत, भात शेतात माल वाहतूक व ज्या ठिकाणी ट्रॅक्‍टर किंवा इतर वाहने जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी माल वाहतूक अशी कामे बैलांच्या साहाय्याने केली जातात.

गायी व म्हशीमध्ये बरेचसे आजार किंवा व्याधी या शल्कचिकित्सा संबंधित आहेत जसे की, शिंगाचा कर्करोग, डोळ्यांचा कर्करोग, खांद्यावरील ट्युमर, अस्थिभंग, जखमा इत्यादी या व्याधीपैकीच एक म्हणजे रिंगणी. जनावरांमध्ये रिंगणी व्याधी झाल्यास जनावर विकून न टाकता त्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून उपचार केल्यास जनावरे पूर्ववत कामासाठी वापरता येतात.

रिंगणी म्हणजे काय?

 •  रिंगणी हे स्थानिक भाषेतील नाव आहे. याला शास्त्रीय भाषेत अपवर्ड फिक्सेशन आॅफ पटेला (Upward fixation of patella) किंवा स्ट्रींग हॉल्ट असे म्हणतात.
 •  रिंगणी हा आजार नसून व्याधी आहे.
 •  ही व्याधी हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते.

रिंगणी व्याधी कशी होते?

 •  रिंगणीसाठी पटेला नावाची अस्थी कारणीभूत असते.
 •  जनावरात तीन प्रकारच्या पटेला असतात त्यातील मेडिअल पटेला ताठर झाल्यास रिंगणी होते.
 •  पटेला अस्थी ही सीसमॉईड जातीची अस्थी असून ती लहान वासरांमध्ये आकाराने खूप लहान असते व वयानुसार ती हळूहळू वाढत जाते आणि विशिष्ट आकार प्राप्त केल्यानंतर त्याची वाढ थांबते.
 •  यामध्ये सांध्याची हालचाल (मागच्या पायाच्या आतील बाजूस) पटेला अस्थी ताठर झाल्यामुळे जनावराला हालचाल करताना त्रास होतो, त्यामुळे जानावर लंगडत चालते.

लक्षणे

 •  रिंगणीमुळे मागचा एक किंवा दोन्ही पाय बाधीत होतात.
 •  मागच्या पायाची सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही.
 •  जनावर विश्रांतीनंतर विशेषतः सकाळी लंगडते, पण काही अंतर चालल्यानंतर चाल ही व्यवस्थित होते.
 •  पाय ताठर झाल्यामुळे कधी कधी जनावरांचे खुर जमिनीवर घासतात व त्यामुळे काही जनावरात रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो.
 •  बाधित जनावरे जमिनीवर पाय घासतात.
 •  जनावरे पायांची हालचाल झटके मारत करतात.
 •  अशा जनावरांत चारा खाणे, पाणी पिणे व्यवस्थित असते.

उपचार पद्धती

 •  अशा जनावरांची वेळीच पशुवैद्यकीय डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करावी. याच्या उपचारासाठी वात तोडणे (Patella Desmotomy) ही शस्त्रक्रिया केली जाते.
 •  अगदी काही वेळातच ही शस्त्रक्रिया होते आणि त्यानंतर जनावर व्यवस्थित चालू शकते आणि त्याला सांध्याची हालचाल करता येते.
 •  या शस्त्रक्रियेमध्ये मागच्या पायाच्या आतील बाजूस भूल दिली जाते आणि मेडिअल पटेला अस्थी तोडली जाते.
 •  शस्त्रक्रियेमुळे दुधाळ किंवा गाभण जनावर व काम करणाऱ्या बैलांत कोणताही विपरित परिणाम होत नाही.
 •  शस्त्रक्रियेनंतर जनावरास लगेच चालवले जाते.

संपर्क  ः डॉ. एस. एस. पिटलावार, ९४२३९०५८४२
(पशुशल्यचिकित्सा विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....