पशुसल्ला

पशुसल्ला
पशुसल्ला

वाढत्या तापमानात जनावरांच्या आहार व्यवस्थापनामध्ये आवश्‍यक ते बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य आणि शुद्ध पाणी इ. घटकांचा समावेश होतो. पाण्याचे नियोजन

  • शरीराचे तापमान संतुलित राहण्याकरिता जनावरांना ताजे स्वच्छ पाणी ४-५ वेळेस पाजावे. त्यामुळे उष्णतेचा दाह कमी होतो. १ लिटर दूध निर्मितीकरिता जवळपास अडीच लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. त्यानुसार जनावराला दिवसातून किमान ४ ते ५ वेळेस पाणी पाजणे आवश्‍यक आहे.
  • जनावराच्या प्रती १०० किलो वजनाकरिता ३ किलो शुष्क, कोरड्या पदार्थांची आवश्‍यकता असते. शरीराला लागणारे शुष्क पदार्थ आणि पाणी यांचे एक विशिष्ट प्रमाण आहे. मोठ्या जनावरांमध्ये ते १ः३ः५ तर वासरांमध्ये १ः६ः७ एवढे असते. उदा. ३०० किलो वजनाच्या जनावराला ९ किलो शुष्क पदार्थ लागत असल्यास याप्रमाणे पाण्याची गरज जवळपास ३२ लिटर एवढी असेल.
  • चाऱ्याचे व्यवस्थापन वाळलेला चारा कडबा व्यवस्थित साठवून ठेवावा. कडबा कुट्टी करूनच द्यावा. कुट्टीचे तुकडे एक इंच एवढे छोटे असावेत म्हणजे चारा वाया जाणार नाही. कुट्टीवर गूळपाणी आणि मीठ यांचे द्रावण करून शिंपडावे व ते एकत्र करून जनावरांना द्यावे, त्यामुळे खाद्यसेवनाचे प्रमाण वाढते. जनावरे चारा आवडीने खातात. -उपलब्ध असल्यास कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा एक भाग आणि वाळलेल्या चाऱ्याचे तीन भाग एकत्र करावेत. त्यामुळे चाराही पौष्टिक बनतो. अंबोवणाचे महत्त्व

    वाढत्या तापमानामुळे जनावरांवर ताण येतो. म्हणून शरीराला आहारातून आवश्‍यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होणे गरजेचे असते. उपलब्ध असलेली पेंड, ज्वारी किंवा गव्हाचा भरडा, डाळीचा भरडा एकत्र करून द्यावा. या व्यतिरिक्त दिवसातून दोन वेळेस १५-२० ग्रॅम खनिज व जीवनसत्त्वाचे मिश्रण द्यावे. ऊस आणि उसाचे वाढे

  • शरीराचे व्यवस्थित पोषण होण्याकरिता आणि दुग्ध उत्पादन टिकून राहण्याकरिता जनावराच्या शरीराला प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिज, क्षार, जीवनसत्त्वे आणि पाणी या सर्व पोषणतत्त्वांची गरज असते. कोणत्याही एकाच प्रकारच्या चाऱ्यातून ही सर्व पोषणतत्त्वे मुबलक प्रमाणात मिळत नाहीत.
  • जनावरांना त्यांच्या वजनाच्या ३ टक्के या प्रमाणात कोरडे, शुष्क पदार्थ लागतात, म्हणून आहारात अंबोवण मिश्रण, हिरवा आणि वाळलेला चारा या सर्व बाबींचा समावेश असायला हवा. सध्याच्या परिस्थितीमध्ये जेथे ऊस भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जनावरांना केवळ ऊस किंवा उसाचे वाढे देण्यापेक्षा उसाची कुट्टी करून त्या सोबत वाळलेला चारा शक्‍य असल्यास हिरवा चारा आणि अंबोवण (अंबोवण नसल्यास पेंड, खनिज व जीवनसत्त्वाचे मिश्रण एकत्र करून) द्यावे.
  • उसाच्या वाढ्यामध्ये ऑक्‍झलेट नावाचा घटक असतो. शरीरातील कॅल्शियमसोबत ऑक्‍झलेट संयोग पावून कॅल्शियम ऑक्‍झलेट नावाचा पदार्थ तयार होतो व तो लघवीवाटे शरीराच्या बाहेर टाकला जातो, यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन त्यासंबंधीचे आजार, आजारसदृश्‍य लक्षणे दिसू लागतात म्हणून उसाचे वाढे एकूण आहाराच्या १५ ते २० टक्के वाळवून द्यावे. सोबत २० ते २५ ग्रॅम खनिज क्षार मिश्रणाची मात्राही द्यावी.
  • गव्हाच्या काडापासून पौष्टिक वैरण गव्हाचे काड साठवून ठेवावे, ते जाळू नये. गव्हाच्या काडावर चार टक्के युरियाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी आणि त्यापासून पौष्टिक चारा तयार करावा. संपर्क ः डॉ. सु. म. वानखेडे, ९४२०६५३५१५ (पशुपोषण व आहारशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com