या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या लागोपाठच्या महिन्यांतील पौर्णिमांना चंद्र सुपरमू
तेलबिया पिके
करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याच्या क्षमतेमुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या व फुलोरा स्थितीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी वेळीच नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याच्या क्षमतेमुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या व फुलोरा स्थितीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी वेळीच नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
करडईवर मावा (शास्त्रीय नाव ः Uroleucon compositae Th.) या किडीच्या प्रादुर्भावास पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी प्रदुर्भावास सुरवात होते. ५५ ते ६० दिवसांनी सर्वात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. मावा काळ्या रंगाचा मृदू, अर्धगोलाकार असून, पाठीमागच्या बाजूस असलेल्या दोन शिंगांमुळे सहज ओळखता येतो. पंख असलेला मावा करडईच्या पिकावर प्रामुख्याने सुरवातीला व पीक परिपक्वतेच्या वेळी आढळतो. या किडीचे पुनरुत्पादन संयोगाशिवाय सरळ पिलांना जन्म देऊन होते. प्रौढ मादी सुमारे ३० पिलांना जन्म देते. ७ ते ९ दिवसांत पिलांची वाढ पूर्ण होते. या प्रकारे अधिक प्रजनन क्षमता आणि पिढी पूर्ण होण्याचा कमी कालावधी यांमुळे प्रादुर्भावानंतर दुर्लक्ष झाल्यास किडीची तीव्रता वाढते. उत्पादनात ५५ ते ८० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते.
नुकसानीचा प्रकार :
- मावा कीड सुरवातीस झाडाच्या कोवळ्या भागावर, नंतर संपूर्ण झाडावर आढळते.
- पिले व प्रौढ सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषण करतात. परिणामी फुले व बोंडे कमी लागतात आणि उत्पादनात घट येते. तीव्र स्थितीमध्ये झाडे वाळतात.
- पीक फुलोरा अवस्थेमध्ये असताना माव्याचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
- मावा किडीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या साखरेसारख्या चिकट द्रवावर पुढे काळी बुरशी वाढते. झाडाच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येते. त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
एकात्मिक कीड नियंत्रण :
- मावा किडीच्या प्रादुर्भावावर पेरणीच्या वेळेचा परिणाम होतो. करडईची पेरणी लवकर केल्यास (सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. पेरणीस जसजसा उशीर होतो, तसा माव्याचा प्रादुर्भाव वाढत जातो. शेताभोवती ग्लिरीसिडीया, हॉलीओक, चंदन बटवा गवत, तांदुळजा, दुधी, पाथरी व काचमांडा या पर्यायी यजमान तणाचा नाश करावा. एक कोळपणी आणि एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून मित्र कीटकांचे संवर्धन करावे. माव्यावर जगणाऱ्या लेडी बर्ड भुंगेरे (ढाल किडे) आणि क्रायसोपा यांचे रक्षण व संवर्धन करावे. मावा किडीचा प्रादुर्भाव शेताच्या कडेच्या पट्ट्यात सुरू होतो. तो रोखण्यासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी शेताच्या कडेने ४ ओळीवर (१८० से.मी.) डायमिथोएट (३० ई. सी.) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी)
- आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीपेक्षा अधिक (सरासरी ३० टक्के झाडावर) प्रादुर्भाव आढळल्यास,
- निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) ३ मि.ली. किंवा
- डायमिथोएट (३० ई. सी.) १ मि.ली.
प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असल्यास,
- थायामेथोक्झाम (२५% डब्लू.जी.) ०.२ ग्रॅम किंवा
- अॅसिटामिप्रिड (२०% एस.पी.) ०.२ मि.ली.
ः डॉ. धीरजकुमार कदम, ९४२१६२१९१०
ः विलास खराडे, ९४२१५९६१७९
(लेखक डॉ. कदम हे कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी,
येथे सहयोगी प्राध्यापक असून, श्री. खराडे व श्री. मात्रे हे
पीएच.डी. चे विद्यार्थी आहेत.)
- 1 of 2
- ››