agricultural stories in Marathi, agrowon, arthkatha, vishal mahajan (Naigaon, Dist. Jalgaon) banana, cotton, turmeric farming | Agrowon

सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली नफ्यात
चंद्रकांत जाधव
सोमवार, 7 जानेवारी 2019

जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील तरुण शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणानंतरही शेतीमध्ये पूर्ण वेळ राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या योग्य नियोजनातून, यंत्रांच्या वापरातून वेळ, श्रम व पैशांची बचत साधली आहे. उतिसंवर्धित रोपांनी निवड करून खरिपातही तूर उत्पादन मिळविले. एकूण ताळेबंद सातत्याने तपासत, योग्य ते बदल सजगपणे करत आपली शेती त्यांनी नफ्यात ठेवली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील तरुण शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणानंतरही शेतीमध्ये पूर्ण वेळ राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या योग्य नियोजनातून, यंत्रांच्या वापरातून वेळ, श्रम व पैशांची बचत साधली आहे. उतिसंवर्धित रोपांनी निवड करून खरिपातही तूर उत्पादन मिळविले. एकूण ताळेबंद सातत्याने तपासत, योग्य ते बदल सजगपणे करत आपली शेती त्यांनी नफ्यात ठेवली आहे.

तापी नदीनजीक असलेल्या नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील जमीन प्रामुख्याने मुरमाड, हलकी व काळी कसदार अशी आहे. केळी हे प्रमुख पीक आहे. येथील किशोर महाजन हे  प्रयोगशील, आघाडीचे केळी उत्पादक म्हणून परिचित आहेत. त्यांचा मुलगा विशाल याने कृषी पदवीनंतर कृषी व्यवसाय व्यवस्थापनासंबंधीची पदविका घेतली आहे. आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार २०१३ पासून विशाल आता पूर्ण वेळ शेतीचे व्यवस्थापन करतात. त्यांनी आपल्या शेतीमध्ये एक पीक पद्धती बसवली आहे.  

 दरवर्षी शेतीत सुधारणा झाली पाहिजे
किशोर महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती होती. आपल्या अशोक या बंधूसह या मुरमाड शेतीमध्ये माती, गाळ यांची भर घालत सुपीकता वाढवत नेली. निसर्गाची साथ मिळाल्याने किशोर व अशोक यांनी यश मिळाले. मात्र, त्यासोबतच दरवर्षी शेतीत काही ना काही सुधारणा झालीच पाहिजे, हा ध्यास घेतला. १९८५ मध्ये तापी नदीवरून दोन किलोमीटर एवढी जलवाहिनी टाकून शेतीमध्ये सिंचनाची सोय केली. हळूहळू करत ५२ एकर शेतजमीन खरेदी केली. केळीच्या शेतीमध्ये अनेक प्रयोग त्यांनी केले. अलीकडेच किशोर व अशोक हे बंधू विभक्त झाले. आता किशोर यांच्याकडे ४० एकर शेती असून, सिंचनासाठी दोन विहिरीही आहेत. गेल्या पाच वर्षापासून शेतीचे संपूर्ण नियोजन वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विशाल घेत आहे.

पीक पद्धती ः १५ एकर केळी, पाच एकर हळद, पाच ते सहा एकर कापूस, अन्य खरीप आणि रब्बी पिके.

केळी पिकाचे बसविले शास्त्र

 • पूर्वी पारंपरिक पद्धतीने श्रीमंती, आंबेमोहोर, वसई आदी केळी वाणांची लागवड कंदाद्वारे करत. मात्र, विशाल यांनी उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड सुरू केली.
 • खोल नांगरणी केल्यानंतर रोटाव्हेटरने भुसभुशीत केलेल्या शेतात उंच गादीवाफ्यावर केळी रोपांची लागवड करतात.
 • दरवर्षी १५ एकर क्षेत्रासाठी पाच बाय सहा फूट अंतराप्रमाणे सुमारे २० हजार उतिसंवर्धित रोपे लागतात.
 • जूनमध्ये तापमान कमी झाल्यावर ढगाळ वातावरणात रोपांची उगवण चांगली होते. पिकात तूट येत नसल्याने नांगे भरणीचा खर्च वाचतो.
 • सिंचनासाठी ठिबक केले आहे. सुरवातीला दोन बेसल डोस दिल्यानंतर १८ दिवसांनी ठिबकद्वारे खते दिली जातात.
 • उतिसंवर्धित रोपांमुळे बसली पीकपद्धती  
 • उतिसंवर्धित केळी रोपांमुळे केळीची कापणी १२ महिन्यांत किमान ८५ टक्क्यांपर्यंत आटोपते. पारंपरिक कंद लागवडीमध्ये कापणी १४ ते १५ महिन्यांपर्यंत लांबत होती. परिणामी खरिपातही क्षेत्र रिकामे होत नसे. आता जूनमध्येच ८५ टक्के क्षेत्र रिकामे होते. त्या शेतीत केळीतील ठिबकवरच तुरीची लागवड करतात. तुरीपासून एकरी किमान आठ क्विंटल उत्पादन आणि किमान ३० हजार रुपये फायदा होतो. यातून केळीच्या रोपांसाठी होणारा अधिक खर्च (कंद ४-५ रुपये आणि उतिसंवर्धित रोप १४ रुपये) हा भरून निघत असल्याचे त्यांचे मत आहे. केळीमधील कुजलेले अवशेष, खोडक्‍यांचा उपयोग तूर पिकाला होतो. तर पुन्हा तुरीमुळे बेवडही चांगला होतो. तुरीमुळे सेंद्रिय कर्ब वाढते.
 • तूर काढणीनंतर पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली जाते.
 • केळीची उत्पादकता प्रति झाड  २२ किलोवरून २९ ते ३० किलोपर्यंत पोचली आहे.

निर्यातक्षम केळी उत्पादन हेच ध्येय

 • योग्य नियोजनातून निर्यातक्षम केळीचे उत्पादन शक्‍य झाले. मागील हंगामात (मार्च, एप्रिल २०१८) एका खरेदीदाराने त्यांच्या ६५ मेट्रिक टन केळीची आखातात निर्यात केली. त्यांच्या केळीला गेल्या दोन वर्षात स्थानिक बाजारातही १००० ते १२०० रुपये प्रति क्विंटल इतके चांगले दर मिळाले आहेत. निर्यातक्षम केळीला १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. या वर्षी फेब्रुवारीपासून केळीची काढणी सुरू होईल. त्यातून सुमारे १०० ते १५० मेट्रिक टन केळी निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे.  
 • जूनमध्ये लागवड केलेल्या उतिसंवर्धित रोपांच्या केळीला चांगले व्यवस्थापन केल्याने अपेक्षित दर मिळतात, असा अनुभव विशाल सांगतात.
 • मागील वर्षी केळीमध्ये मशागतीपासून ते काढणीपर्यंत प्रति झाड ७० रुपये
 • इतका खर्च आला. तर एका झाडापासून २०० रुपये किमान सरासरी उत्पन्न मिळाले.

   पिकांचे अवशेष आणि घरचे शेणखत ठरते पुरेसे

 • ज्या क्षेत्रात केळी लागवड करायची असते, त्यात एकरी तीन ट्रॉली शेणखत घालणे अपेक्षित असते. बाहेरून विकत घ्यायचे, तर ३००० रुपये प्रति ट्रॉली असा दर आहे. या खर्चात बचत करण्यासाठी विशाल यांनी पावले उचलली.
 • यादृष्टीने घरची जनावरे फायद्याची ठरतात. त्यांच्यापासून दूधही मिळते. सध्या विशाल यांच्याकडे बैलजोडी, गाय व म्हैस असे पशुधन आहे. त्यातून प्रति वर्ष सुमारे आठ ट्रॉली शेणखत मिळते. सेंद्रिय कर्बाची पूर्तता करण्यासाठी गहू, तूर अशा विविध पिकांचे अवशेष शेतात गाडले जातात. तसेच केळीचा हंगाम संपल्यानंतर केळीचे खांब डिस्क हॅरोने बारीक करून शेतातच कुजू देतात.

  कपाशीचे गणित...
कापूस पिकाची लागवड चार बाय पाच फुटांवर ठिबकने जूनमध्ये करतात. कापूस पिकात मशागतीपासून पूर्ण वेचणीपर्यंत एकरी २० हजार रुपये खर्च येतो. एकरी १२ क्विंटलपर्यंतचे उत्पादन घेतात. एकरी उत्पादन लक्षात घेता क्विंटलला किमान पाच हजार रुपये दर मिळाल्यास ते ३५ ते ४० हजार रुपये एकरी नफा मिळतो.

पॉवर टिलरद्वारे वाचविला वेळ व खर्च
पूर्वी बैलजोडीने आंतरमशागतीचे काम केले जाई. पाच एकर क्षेत्रासाठी तीन दिवस लागत. अलीकडे आंतरमशागतीसाठी पॉवर टिलर वापरण्यास सुरुवात केली असून, एका दिवसात पाच एकर क्षेत्राचे काम होते. पॉवर टिलरमुळे वेळेप्रमाणेच एकरी ५०० रुपये खर्चही वाचला आहे. आता फक्त दोन वेळेस तण नियंत्रण करावे लागते. पूर्वी चार ते पाच वेळेस करावे लागणारे तण नियंत्रण आता केवळ दोन वेळेपर्यंत मर्यादित झाले आहे. थोडक्यात तणनियंत्रणावरील एकरी १२०० रुपये खर्च वाचला आहे. एकूण शेतीकामासाठी तीन सालगडी नियुक्त केले आहेत.

हळद पिकाचे अर्थशास्त्र

 • हळद लागवडीसाठी सेलम जातीच्या वाणांना पसंती.
 • दरवर्षी जूनमध्ये दीड फूट उंच गादीवाफ्यावर दोन ओळीमध्ये लागवड.
 • सिंचनासाठी ठिबकचा वापर केला जातो.
 • नऊ महिन्यांत हळद पिकांचे एकरी १८० क्विंटल ओले उत्पादन मिळते. त्याचे बॉयलिंग करून नंतर ती वाळवली जाते.
 • सांगली येथील बाजारात तिची विक्री करतात. गत वर्षी प्रतिक्विंटल ७१०० रुपये दर वाळविलेल्या हळदीला मिळाला.
 • हळद पिकांसाठी एकरी ७० हजार रुपये खर्च झाला.
 • खर्च वगळता एकरी किमान ७० हजार रुपये नफा मिळाल्याचे विशाल सांगतात.

  ः विशाल महाजन ः ९५९५७४१०२१, ९२८४८४०४९९

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...