agricultural stories in Marathi, agrowon, banana fruit crop advice | Agrowon

केळी पीक सल्ला
एन. बी. शेख, डाॅ. के. बी. पवार
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश सेल्सिअस) हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत पोचलेले आहे. सरासरी निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचे साठे केळी पिकाच्या कालावधीपर्यंत पुरतील याची शाश्‍वती नाही. याकरिता केळी पिकाची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

सद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश सेल्सिअस) हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत पोचलेले आहे. सरासरी निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचे साठे केळी पिकाच्या कालावधीपर्यंत पुरतील याची शाश्‍वती नाही. याकरिता केळी पिकाची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

 • यापुढे कांदेबाग व आंबेबागेसाठी (फेब्रुवारी लागवड) पाण्याचा मुबलक साठा असेल तरच केळीची लागवड करावी.
 • मृगबाग केळीला एकूण पाण्याच्या साठ्याचा फक्त ३/४ पाणी उपलब्ध असेल तर निसवल्यानंतर फक्त ६ - ७ फण्या ठेऊन बाकी फण्याची विरळणी करावी.
 • मृगबाग केळीमध्ये सेंद्रिय आच्छादनाचे (सोयाबीनचा भुसा, उसाचे पाचट, वाळलेली केळीची पाने) इ.पदार्थ केळीच्या दोन ओळींमध्ये पसरून द्यावे. पाॅलिथिन आच्छादनामध्ये चंदेरी किंवा काळे ३० मायक्राॅन जाडीचे कापड वाफ्यावर किंवा दोन ओळींत टाकून घ्यावे.
 • कांदेबाग केळीची लागवड गादीवाफ्यावर किंवा १.५ बाय १.५ मीटर अंतरावर पाडलेल्या सरीमध्ये करावी. लागवड करण्यापूर्वी कंद किंवा मुनव्यांचे (४५० - ६५० ग्रॅम वजन) करपा, सुत्रकृमी तसेच जिवाणूजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० ग्रॅम अॅसिफेट १०० लीटर पाण्यात मिसळून किमान ४० मिनिट बुडवून प्रक्रिया करावी. जर टिश्यू कल्चरची रोपे लागवडीसाठी वापरणार असाल तर ती २ महिने 'हार्डनिंग’ (कणखरता) कालावधी पूर्ण केलेली, ३० सेंमी उंचीची अाणि ५ - ६ पाने असलेली असावीत.
 • अशा वातावरणात केळी वरील करपा रोग फार झपाटयाने वाढतो. जून - जुलै मध्ये लावलेली मृगबाग शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे. पावसाळी हंगाम, हवेतील आर्द्रता व तापमान हे तीनही घटक करपा रोगाच्या वाढीसाठी अनुकूल आहेत. करपा रोगाचे योग्य वेळी नियंत्रण केल्यास अपेक्षित उत्पादन, गुणवत्तापूर्ण फळे मिळवता येतात त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

केळीबागेची सर्वसाधारण स्वच्छता

 • बागा तणमुक्त ठेवाव्यात.
 • जमिनीलगतची पाने कापून त्याची बागेबाहेर नेऊन योग्य विल्हेवाट लावावी.
 • मुख्य खोडाशेजारी येणारी पिल्ले जमिनीलगत धारदार विळीने नियमित कापावीत.
 • बागेत पाणी साचलेले असेल, तर अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार पाणी द्यावे.
 • ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फाॅस्फेट व ३ किलो म्युरेट आॅफ पोटॅश इ. खते मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस पाण्याद्वारे (फर्टिगेशन) द्यावीत.
 • मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस जमिनीतून खते देण्यासाठी ८२ ग्रॅम युरिया बांगडी पद्धतीने किंवा खोली करून खत द्यावे आणि खत मातीने झाकून द्यावेे.
 • नवी लागवड केलेल्या मृगबागेतील विषाणूजन्य झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.
 • केळी बागेभोवती सजीव कुंपण (शेवरी) वाराप्रतिरोधक म्हणून लावावी.
 • केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चाैथ्या महिन्यात इडीटी-ए जस्त आणि इडीटीए - लोह यांची प्रत्येकी ०.५ टक्के (१० लीटर पाण्यात ५० ग्रॅम) फवारणी करावी.

करपा रोगाचे नियंत्रण

 • सुरवात झालेल्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी खालून सुरवात झालेली करपाग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन पूर्णतः नष्ट करावीत.
 •  केळी बागांची सामुदायिकरीत्या सर्वसाधारण स्वच्छता करावी.
 • रोगांचा प्रादुर्भाव दिसताच खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात
 • फवारणी प्रतिलिटर पाणी
 1. पहिली फवारणी ः १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १ मिलि स्टिकर
 2. दुसरी फवारणी ः १ मिलि प्राॅपीकोनॅझोल अधिक १ मिलि स्टिकर (दुसरी फवारणी करण्याआधी रोगग्रस्त पाने काढून बागे बाहेर टाकावीत)
 3. तिसरी फवारणी ः ०.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १० मिलि मिनरल आॅइल (दुसऱ्या फवारणीनंतर २१ दिवसांनी तिसरी फवारणी करावी फवारणी करण्याआधी रोगग्रस्त पाने काढावी व नंतर फवारणी घ्यावी.)
 4. चाैथी फवारणी ः प्राॅपीकोनॅझोल ०.५ मिलि अधिक १० मिलि मिनरल आॅइल (तिसऱ्या फवारणी नंतर १५ दिवसांनी फवारणी करावी. फवारणी घेण्याआधी बागेची स्वच्छता करणे आवश्‍यक आहे.)
 5. रोगाची तीव्रता अधिक असल्यास
  प्रतिलिटर पाण्यातून प्रोपीकोनॅझोल ०.५ मिलि किंवा कार्बेन्डाझिम ०.५ ग्रॅम अधिक १० मिलि मिनरल आॅइलच्या २ ते ३ फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

संपर्क ः एन. बी. शेख, ०२५७ -२२५०९८६
(केळी संशोधन केंद्र, जळगाव)

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...