agricultural stories in Marathi, agrowon, banana fruit crop advice | Agrowon

केळी सल्ला : थंडीचा परिणाम
डॉ. एस. व्ही. धुतराज, प्रा. आर. व्ही. देशमुख
शनिवार, 22 डिसेंबर 2018

सद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे. तापमान बऱ्या­च प्रमाणात खाली गेलेले आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान १६ अंश सेल्सिअसच्याही खाली जाते. अशा तापमानाचा केळी पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

सद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे. तापमान बऱ्या­च प्रमाणात खाली गेलेले आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान १६ अंश सेल्सिअसच्याही खाली जाते. अशा तापमानाचा केळी पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

थंडीचा परिणाम
लागवडीवर होणारा परिणाम
ऊतिसंवर्धीत रोपे व्यवस्थित सेट होण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान लागते. सध्या केळीची कांदेबाग लागवड झालेली आहे. थंडी वाढल्याने मृगबाग, तसेच कांदेबाग लागवडीच्या केळीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुळावर होणारा परिणाम
ऊतिसवंर्धीत रोपाची कांदेबाग लागवड झालेली आहे. मुळांची संख्या व लांबी कमी होते. मुळांच्या अन्न व पाणी शोषण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

पानांच्या वाढीवर होणारा परिणाम
केळीला सरासरी ३ ते ४ पाने प्रतिमहिन्याला येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रतिमहिना २ ते ३ पाने येतात. पाने कमी अंतरावर येतात, त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. झाडांची वाढ
खुंटते आणि उत्पनावर परिणाम होतो.

झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम
झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी, केळी निसवण्याचा कालावधी लांबतो, त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो.

बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम
केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांडयावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात, हे चट्टे वाढत जातात व घड सटकतो.

फळवाढीवर होणारा परिणाम
घडातील केळीची वाढ फार हळुवार होते. परिमाणी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड कापनिस उशिरा येतो.

रोगाच्या प्रादुर्भावावर परिणाम
थंडीच्या काळात प्रामुख्याने केळीवर करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यावर वेळीच बुरशीनाशकाची फवारणी करणे योग्य ठरते.

उपाय योजना

  • ऊतिसंवर्धीत रोपांची योग्य निवड. ऊतिसंवर्धीत रोपांची लागवड केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी व आळवणी करावी.
  • शेतात शिफारसीप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. रासायनिक खतांचा योग्य वापर करावा.
  • बागेच्या चोहोबाजूने वारासंरक्षक उंच वाढणा­ऱ्या वनस्पती २ ते ३ ओळीत दाट लावाव्यात, त्यामुळे थंड  वारे अडवले जाते.
  • केळीच्या खोडालगत
  • आच्छादन करावे, जेणेकरून थंडीतील कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर  परिणाम होणार नाही.
  • केळीची कार्यक्षम पाने कापू नयेत, फक्त रोगग्रस्त पाने कापावीत व सुकलेली पाने बुंध्याभोवती तशीच  राहू द्यावीत. त्यामुळे बुंध्याचे थंडीपासून संरक्षण होईल.
  • थंडीच्या काळात पाणी रात्री द्यावे. पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने बांधावर काडी कचरा जाळून धूर करावा.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिली प्रतिलिटर
  • पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.   

 ः डॉ. एस. व्ही. धुतराज, ७५८८६१२६३२
 ः प्रा. आर.व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४,

(केळी संशोधन केंद्र, नांदेड)

इतर फळबाग
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
थंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....
थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...
भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...
नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...
मोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे...  मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ...
निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...
डाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...
पेरू बागेत फळमाशीचा प्रादुर्भावसध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत...
रुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....
केळी सल्ला : थंडीचा परिणामसद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...