agricultural stories in Marathi, agrowon, banana fruit crop advice | Agrowon

थंडीच्या काळात केळी बागांची काळजी
बी. जी. टेमकर
शनिवार, 19 जानेवारी 2019

केळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४ दिवसांनी जाणवू लागतात. पानाचा पृष्ठभाग फिक्कट पिवळा पडतो. थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. बागांना संध्याकाळी किंवा रात्रीचे वेळेस पाणी द्यावे. शिफारशीनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.

केळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४ दिवसांनी जाणवू लागतात. पानाचा पृष्ठभाग फिक्कट पिवळा पडतो. थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. बागांना संध्याकाळी किंवा रात्रीचे वेळेस पाणी द्यावे. शिफारशीनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.

सध्याच्या काळातील थंडीचा विपरित परिणाम केळीच्या वाढीवर होत आहे. कमी तापमानामुळे फळांच्या सालीमधील रस गोठतो. रस वाहून नेणाऱ्या शिरा रंगहीन होतात. त्यामुळे फळाला फिक्कट पिवळा रंग येतो. कधी कधी फळे करड्या विटकरी रंगाची होतात.
१) कमी तापमानामुळे केळफूल बाहेर पडण्यास विलंब होतो. तसेच काही वेळेस बाहेर पडलेला घड अविकसित स्वरूपाचा असतो.
२) कमी तापमानामुळे फळाच्या सालीच्या आतील भागावर, पाणीदार ठिपके तयार होतात, त्यामुळे फळ पिकण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो. अशी फळे पिकत असताना साल काळी पडते.
३) केळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४ दिवसांनी जाणवू लागतात. पानाचा पृष्ठभाग फिक्कट पिवळा पडतो. नवीन येणाऱ्या पानाची मध्यशीर तांबूस तपकिरी होते. त्यावर पाणीदार ठिपके येतात. पूर्ण वाढलेल्या पानांचा देठ मोडून, खोडाभोवती लोंबत राहतात. अशी पाने नंतर पिवळी पडून, वाळून जातात.
४) कमी तापमानामुळे खोडावरील दोन पानांमधील अंतर कमी असल्याचे आढळते. त्यामुळे संपूर्ण झाड खुरटल्यासारखे बुटके वाढते.
५) घड बाहेर पडण्याच्या वेळेस कमी तापमान असल्यास, घड लवकर बाहेर पडत नाही. घड खोडामध्येच अडकून बसतो. अशाप्रकारचे घड कालांतराने बाहेर पडल्यानंतर त्यावर उन्हामुळे करपटल्यासारखी लक्षणे दिसू शकतात. अशा घडावरील फळे व्यवस्थित विकसित होत नाहीत.
६) तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी गेल्यावर झाडांची वाढ थांबते. नवीन पानांची निर्मिती होत नाही. मुळांचा विकास थांबतो. कमी तापमानामुळे अन्नघटकांची उपलब्धता घटते. तापमानामुळे पोटॅश, मॅग्नेशियम, लोह व जस्ताची कमतरता जाणवते. बागांमध्ये करपासुद्धा वाढतो.
७) दोन ते चार महिने वयाच्या बागांचे पांढरे पोंगे येतात. पानांचा आकार अतिशय छोटा येतो.
८) चुनखडीयुक्त जमिनीत लोह घटकांची कमतरता जाणवते. लहान झाडांचे पोंगे करपतात.
९) कमी तापमानामुळे नवीन आलेला पोंगा आकाराने वेडावाकडा निघतो.
१०) कमी तापमानामुळे झाडाची पाने एकाकी पिवळी होऊन करपतात यालाच आपण चरका म्हणतो.
११) कमी तापमानामुळे घडांचा विकास थांबतो. कांदेबाग व पिलबागाची केळी कापणीस लवकर तयार होत नाहीत.
१२) केळी फळाच्या सालीवर कमी तापमानामुळे चिलिंग इफेक्‍ट होतो, अशी केळी पिकताना रंग व चकाकी येत नाही.

उपाययोजना ः

१) थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. बागांना संध्याकाळी किंवा रात्रीचे वेळेस पाणी द्यावे. ओलसर माती उष्णता बराच काळ राखून ठेवते.
२) बागेमध्ये जागोजागी शेकोटी पेटवून धूर करावा. त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा भुसा, वाळलेला पालापाचोळा किंवा उसाचे पाचट वापरावे.पहाटे शेकोट्या पेटवल्यास तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्यास मदत होते. धुराचा थर केळीच्या बागेवर असल्यामुळे शीतलहरी बागेमध्ये घुसत नाहीत.
३) बागेमध्ये येणाऱ्या शीतलहरींना बागेमध्ये शिरण्यापासून अटकाव करणेकरिता बागेभोवती शेडनेट लावावे.
४) लहान बागांवर सूक्ष्म अन्नद्रव्य ३० मिलि, फेरस सल्फेट ३० ग्रॅम प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) बागेतील प्रत्येक झाडाला झिंक सल्फेट दहा ग्रॅम व फेरस सल्फेट दहा ग्रॅम द्यावे.
६) पाच महिन्यांपेक्षा मोठ्या बागेला १० ते १२ लिटर प्रती झाड पाणी द्यावे. दोन ते तीन महिन्यांच्या बागांना ६ ते ८ लिटर पाणी दररोज द्यावे.
७) मुळाच्या कक्षेत कायम वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
९) निसवलेल्या बागेतील घडावर स्कर्टिंग बॅग घालावी. जेणेकरून फळांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत.
१०) केळीच्या घडावर ०ः५२ः३४ विद्राव्य २० ग्रॅम प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली असता फळांचे पोषण होण्यासाठी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

संपर्क ः बी. जी. टेमकर, ९४२२५१९१४३
(उद्यानविद्या विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)

इतर फळबाग
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने...सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत...
फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्यासध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम...
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म...द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू...
द्राक्ष : नवीन वाढ करण्यासाठी आवश्यक...द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत १३०... राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हिंगोली...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
सुपीक जमीन, नियोजनातून वाढविली...हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल...
द्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...
थंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...
वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...
केळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...
आंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...
संत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...
गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे...वादळी पाऊस आणि गारपीटच्या माऱ्यामुळे संत्रा /...
डाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...