agricultural stories in marathi, agrowon, Britan appointed minister for loneliness issues | Agrowon

गम्मत नाही, खरचं.... ब्रिटनने नेमला एकाकीपणासाठी मंत्री !
वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

आधुनिक जगामध्ये एकाकीपणा ही मोठी समस्या ठरत आहे. प्रामुख्याने वार्धक्य आणि अपंगत्व यांच्या जोडली जाणारी ही समस्या कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही काळात येऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी ब्रिटनने वेगळे मंत्रालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधुनिक जगामध्ये एकाकीपणा ही मोठी समस्या ठरत आहे. प्रामुख्याने वार्धक्य आणि अपंगत्व यांच्या जोडली जाणारी ही समस्या कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही काळात येऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी ब्रिटनने वेगळे मंत्रालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधुनिक काळामध्ये इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांनी आभासी पातळीवर लोक जोडले जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, वाढते औद्योगिकीकरण आणि बदलत चाललेली जीवनशैली यामुळे एकाकीपणामध्ये वाढ होत आहे. एकाकीपणा ही एक गुंतागुंतीची भावनिक स्थिती असून, त्यातून व्यक्ती टोकाच्या नैराश्यापर्यंत पोचू शकते. एकाकीपणामागील कारणेही व्यक्ती आणि समाजनिहाय वेगवेगळी असू शकतात. एकाकीपणामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण, स्थौल्यत्त्व यासोबतच पक्षाघात आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. केवळ एकाकीपणामुळे माणसांच्या पर्यायाने समाजाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. या समस्येवर नेमकेपणाने काम करण्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी एकाकीपणासाठी वेगळा मंत्री नेमण्याची घोषणा केली आहे. हा मंत्री विविध उद्योग आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने या समस्या सोडविण्यासाठी काम करेल.

जागतिक समस्या...
केवळ इंग्लंडच नाही, तर जगभरामध्ये एकाकीपणा ही मोठी समस्या ठरत आहे. अमेरिकेमध्येही एकूण लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के (६० दशलक्ष) लोक हे एकाकीपणाच्या छायेत आहेत. इंग्लंडमधील संसदपटू जो कॉक्स (वय ५२) यांनी एकाकीपणाची समस्या ओळखली होती. त्यावर मार्ग काढण्यासाठी ‘जो कॉक्स कमिशन ऑन लोनलीनेस’ स्थापन केले होते. जो कॉक्स यांची नियो-नाझी गटाच्या मारेकऱ्याकडून २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कमिशनने केलेल्या शिफारशींची ब्रिटिश शासनाने ही अंमलबजावणी सुरू केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...