agricultural stories in Marathi, agrowon, CAREFUL USE OF UREA | Agrowon

योग्य प्रमाणातच वापरा युरिया
अशोक साकळे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र अावश्‍यक आहे.

नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र अावश्‍यक आहे.

युरियामध्ये ४६ टक्के नत्र असते. युरियामधील ४६ टक्के नत्र पिकाला किती मिळते हे वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ओल्या जमिनीत युरिया दिल्यानंतर त्याची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन अमोनियम तयार होतो. युरिया जर पारंपरिक पद्धतीने शेतात फेकून दिला, तर ही अभिक्रिया मातीवर म्हणजेच उघड्यावर होते. अमोनियमचे अमोनिया गॅसमध्ये रुपांतर होऊन तो लगेच हवेत उडून जातो. म्हणून युरिया नेहमी जमिनीत पेरून द्यावा.

 • अमोनियम हे अस्थिर संयुग असते. जमिनीत नैसर्गिकरीत्या आढळणारा नायट्रोझोमोनस जिवाणूच्या मदतीने तो नाइट्राईटमध्ये रुपांतरीत होतो. लगेच नायट्रोबॅक्‍टर जिवाणूच्या मदतीने नाइट्रेट तयार होते.
 • भात पीक सोडून इतर सर्व पिके नत्र फक्त नाइट्रेट स्वरुपातच घेतात. याचा अर्थ असा, की पीक अन्न म्हणून सरळ युरिया घेत नाही, तर नाइट्रेट घेते. या रुपांतरासाठी जमीन जिवंत असायला हवी.
 • जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर पाहिजे. त्यामुळे जमिनीत हवा आणि ओलाव्याचे योग्य प्रमाण टिकून राहते. उपयुक्त जिवाणू, बुरशी व इतर जिवांची चांगली वाढ होते. यासाठी रासायनिक खताबरोबर चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खते दरवर्षी जमिनीत मिसळावीत.

विघटित युरिया वाया जाण्याची कारणे

 • युरियाचे अमोनिफिकेशन होताना हवेशी संपर्क आला, की अमोनिया वायू तयार होऊन तो हवेत उडून जातो. या क्रियेला होलाटीलाईझेशन असे म्हणतात. हे नुकसान सर्वांत जास्त म्हणजे दिलेल्या युरियाच्या जवळपास ५८ ते ६० टक्के असते.
 • जेव्हा युरिया नाइट्रेट स्वरुपात येतो, तेव्हा पिकाची मुळे त्याला कोशिकांमध्ये शोषून घेतात. परंतु, जमिनीत जर ओल खूप जास्त असेल तर चल नाइट्रेट घटक मुळांपासून दूर खोल जमिनीत पाण्याबरोबर झिरपून जातो. याचे प्रमाण २० ते २२ टक्के आहे.
 • ज्या जमिनीला पाट पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे चिखल तयार होतो. मातीतील हवेची जागा पाणी घेते. मुळांची अन्न व पाणी घेण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन ही सर्वोत्तम पद्धत आहे.
 • पिकांच्या मुळांबरोबर नत्रासाठी स्पर्धा करणारे काही जिवाणू जमिनीत राहतात. आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जिवाणू नाइट्रेट शोषून घेऊन सेंद्रिय स्वरुपात रुपांतरीत करतात. पीक हे नत्र घेऊ शकत नाही याला इंमोबिलायझेशन म्हणतात. युरियामधील फक्त ३० ते ३५ टक्के नत्र पिकाला मिळते.

दाणेदार युरिया फायदेशीर

 • विशेष तंत्रज्ञान वापरून दाणेदार युरिया बनवितात. याचा दाणा टणक, २ ते ३ मिलीमीटर जाडीचा, पांढराशुभ्र, पावडरविरहीत असतो. प्रत्येक दाण्यावर फॉर्माल्डीहाइड नावाच्या मेणासारख्या घटकाचा लेप केलेला असतो. पारंपारिक युरियापेक्षा हा युरिया पिकाला कमी लागतो.
 • जमिनीत जास्तीचा ओलावा असला तरी हा युरिया हळूहळू विरघळतो. बारीक युरिया जास्तीत जास्त ७ ते ८ तासांत विरघळतो, तर जाड युरिया ३६ ते ३८ तास उपलब्ध असतो. जास्त वेळ उपलब्धता म्हणजे पिकाला नत्र शोषण्यासाठी जास्त कालावधी. यामुळे जाड युरियाची कार्यक्षमता तिपटीने वाढते.
 • जाड युरियाचा जेवढा भाग मातीच्या संपर्कात येतो, तेवढ्याच भागावरील फॉर्माल्डीहाइड मेणाचा लेप विरघळतो. त्यातून नत्र बाहेर पडते. जो भाग मातीच्या संपर्कात येत नाही, त्यावरील लेप तसाच राहतो, नत्र हवेत उडत नाही. त्यामुळे मोठे नुकसान टाळले जाते.
 • जाड दाणा पेरणीसाठी सोपा आहे. त्यात अजिबात पावडर नसते. त्यामुळे उभ्या पिकाला वापरताना पानावर पडून पाने जळण्याचा धोका नसतो.
 • युरियाचे नुकसान टाळून पिकाला नत्राची उपलब्धता वाढते. दिलेल्या खताचा पुरेपूर उपयोग होतो.

संतुलित खत मात्रा द्या

 • पिकांना संतुलित खत मात्रा द्यावी. म्हणजे पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊन, सोळा अन्नघटकपैकी आवश्‍यक अन्नघटक योग्यप्रकारे, योग्य मात्रेत पिकाच्या मुळांच्या कक्षेत द्यावेत.
 • बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकद्वारे आणि कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना फवारणीद्वारे शिफारशीत मात्रेमध्ये विद्राव्य खते द्यावीत. ८५ ते ९० टक्के विद्राव्य खते पिकाला लागू होतात, ही खते कमी प्रमाणात लागतात. ही खते हाताळणीस सोपे आणि किफायतशीर आहेत. १७ः४४ः००, १८ः१८ः१८, ०ः०ः५०, १२ः६१ः०, ०ः५२ः३४, १३ः०ः४५, १९ः१९ः१९ असे विद्राव्य खतांचे प्रकार उपलब्ध आहेत.

संपर्क ः अशोक साकळे, ७७९८०९१२८८
(लेखक इफको मध्ये क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)

इतर ताज्या घडामोडी
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...
कांदा चाळ अनुदानापासून पुणे...पुणे   ः कमी दरामुळे कांदा साठवणुकीकडे...
नगर महापालिका निवडणूकीत शिवसेना ठरला...नगर  : नगर महापालिका निवडणुकीचा निकाल...
भंडारा जिल्ह्यात खासगी खरेदीदारांकडून...भंडारा  ः पूर्व विदर्भात दूध संकलनात आघाडीवर...
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...