agricultural stories in Marathi, agrowon, citrus psyllid management | Agrowon

संत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे नियंत्रण
डॉ. अनिल कोल्हे
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर सिट्रस सायला कीडीचा प्रादूर्भाव होतो. ही कीड आकाराने लहान, पिवळसर करड्या रंगाची असते.

संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर सिट्रस सायला कीडीचा प्रादूर्भाव होतो. ही कीड आकाराने लहान, पिवळसर करड्या रंगाची असते.

  • मादी कोवळी पाने, कळ्या अशा भागामध्ये लांबट पिवळसर रंगाची अंडी घालते.
  • अंड्यातून निघालेली लहान पिल्ले मळकट पिवळ्या रंगाची मंद हालचाल करतात.
  • पिले आणि प्रौढ कोवळी पाने, फुले आणि कोवळ्या फांद्या अशा भागातील रसशोषण करतात. कोवळी नवती करपून जाते. कळ्यांचे फुलामध्ये रूपांतर न होता त्या गळून पडतात. फळधारणा कमी होते. तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये संपूर्ण पिकाचे नुकसान होते.

उपाययोजना ः

  • आकाराने लहान असल्याने झाडावरील नवतीचे बारकाईने निरीक्षण करावे. या किडीच्या प्रादुर्भावासोबत बागेमध्ये क्रायसोपा, लेडीबर्ड बीट, कातीन अशा भक्षक कीटकांची संख्या तपासावी. त्यानुसार नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा.
  • लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
    थायोमेथोक्झाम (२५ टक्के) ०.१ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के ईसी) ०.१५ ते ०.२ मिलि
    आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

डॉ. अनिल कोल्हे, ९९२२९२२२९४
(कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

इतर फळबाग
द्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...
थंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...
वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...
केळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...
आंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...
संत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...
गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे...वादळी पाऊस आणि गारपीटच्या माऱ्यामुळे संत्रा /...
डाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...
ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी,...सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
थंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....
थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...
भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...
नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...
मोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे...  मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ...
निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...
डाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...