agricultural stories in Marathi, agrowon, crop advice | Agrowon

कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका, कांदा तूर आदी पिके
कृषी विद्या विभाग, राहुरी
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

ऊस
हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३% दाणेदार कीटकनाशक) ३३ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात पसरावे.

कापूस

ऊस
हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३% दाणेदार कीटकनाशक) ३३ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात पसरावे.

कापूस

 • अधूनमधून कीडग्रस्त, गळलेली पाने पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत.
 • दुपारी कडक उन्हामध्ये फवारणी करू नये.
 • दिवसाचे तापमान वाढल्यास व पाण्याच्या पाळीतील अंतर कमी-जास्त झाल्यास आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी युरिया १.५ किलो, अधिक पोटॅश १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाला १५०-२०० मिली या प्रमाणात द्यावे.
 •  पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलिक अॅसेटिक ॲसिड (एनएए) या संजीवकाची एकरी ४० मिली प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

भुईमूग
शेंगा भरत असताना आकार व वजन वाढण्यासाठी, सल्फेट ऑफ पोटॅश (०ः०ः५०) ७० ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

सोयाबीन

 •  पिकाच्या सभोवती फिरून कीड व रोगाचे निरीक्षण करावे.
 •  सोयाबीन पिकातील मोठाले तण हाताने काढून घ्यावे.
 •  सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा, हिरवी उंट अळी, गर्डल बीटल यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मिली किंवा फ्ल्युबेन्डिअमाईड (३९.३५ टक्के प्रवाही) ०.२ मिली.

मका
    कणसे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यावर लक्ष ठेवावे. गरजेनुसार शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी.   दुपारी कडक उन्हामध्ये फवारणी करू नये.

करडई

 •  करडई पिकाच्या पेरणीसाठी एस. एस. एफ. ७०८, फुले चंद्रभागा या सुधारित वाणांची निवड करावी.
 •  पेरणीपूर्वी अॅझेटोबॅक्टर २५ ग्रॅम + पी.एस.बी. २५ ग्रॅम तसेच बुरशीजन्य रोगापासून रोप अवस्थेत संरक्षणासाठी ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

काकडीवर्गीय पिके

 • काकडीवर्गीय पिकांवर सध्याच्या दमट हवामानामध्ये केवडा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. पानांच्या खालील बाजूस रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून येताच, फवारणी प्रतिलिटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (६४ टक्के) अधिक मेटॅलॅक्झील (८ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
 •  तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.

कांदा
करपा व फुलकिडे यांच्या एकत्रित रोग व कीड नियंत्रणासाठी, कांदा लागवडीनंतर मॅन्कोझेब ३ ग्रॅम अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ इ.सी.) १ मिली (टॅंक मिक्स) प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

भाजीपाला पिके

 •  काही ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे शेतात लावावेत.
 •  पांढऱ्या माशीचा अधिक प्रादुर्भाव असल्यास, व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 •  भाजीपाल्यावरील मूळकूज रोग टाळण्यासाठी, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

डाळिंब
पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी ॲसीटामीप्रिड (२० एस.पी.) ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कार्नेशन
लाल कोळी या किडीचे नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी)  १.५ मिली किंवा ॲबामेक्टीन (१.८ इसी) ०.४ मिली.

ज्वारी
ज्वारी पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव आढळून येते आहे. नियंत्रणासाठी, व्हर्टीसिलीयम लेकॅनी ५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

रब्बी ज्वारी

 • रब्बी हंगामासाठी ज्वारी पेरणीची आदर्श कालावधी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर आहे. हा कालावधीत पेरणी साधण्यासाठी रब्बी पिकांच्या सुधारित वाणांचे बियाणे व खतांचे आधीच नियोजन करावे.
 •  रब्बी ज्वारीची पेरणी करताना रोपावस्थेत खोडमाशी आणि खोडकिडीचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी थायामेथोक्झाम (३० एफ.एस.) १० मिलि प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
 •  रब्बी ज्वारी काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी गंधक (३०० मेष) ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲसिटोबॅक्टर आणि अॅझोटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

टीप ः खरेदी केलेल्या बहुतांश बियांणावर कीडनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते. अशी बीजप्रक्रिया झालेली नसल्याची खात्री करून योग्य ती बीजप्रक्रिया करावी.  

तूर
    मर रोग रोगाच्या नियंत्रणासाठी, प्रादुर्भावग्रस्त रोपांभोवती आळवणी प्रतिलिटर पाणी 

कार्बेन्डाझिम (५०% डब्ल्यूपी) १ ग्रॅम

 ः ०२४२६ २४३२३९  
(कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...