agricultural stories in Marathi, agrowon, crop advice | Agrowon

कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा, बाजरी, भुईमूग, टोमॅटो
कृषी विद्या विभाग, राहुरी
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यास सरंक्षित पाणी द्यावे.

ऊस (पूर्वहंगामी)

ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यास सरंक्षित पाणी द्यावे.

ऊस (पूर्वहंगामी)

 • अवस्था - लागवडीची पूर्वतयारी
 • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करतात. त्यासाठी पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी. मध्यम ते भारी जमिनीत १०० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. रानबांधणीअगोदर चांगले कुजलेले शेणखत जमिनीतून द्यावे (५० गाड्या प्रतिहेक्टरी).
 • बेणेप्रक्रिया - मॅलॅथिऑन ३०० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या द्रावणामध्ये १० मिनिटे बेणे बुडवून ठेवावे.
 • लागवडीसाठी को- ८६०३२, को- ९४०१२, को- ८०१४, फुले ०२६५ या वाणांची शिफारस आहे. एक डोळा पद्धतीत को- ८८१२१, को- ९४०१२ या वाणांचे निष्कर्ष चांगले आहेत.

कापूस
अवस्था - बोंड धरणे
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर
हेक्झाकोनॅझोल (५% ई.सी.) १.६६ मि.लि.

तूर
अवस्था - शेंगा भरणे
शेंगा खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,
एकरी २० पक्षिथांबे उभारावेत
एचएएनपीव्ही ५०० मि.लि. प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गहू

 • गव्हाची पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी.
 • वेळेवर पेरणीसाठी एन.आय.ए.डब्लू.- ३०१ (त्र्यंबक), एन.आय.ए.डब्लू.- ९१७ (तपोवन), एन.आय.डी.डब्लू.- २९५ (गोदावरी), तसेच बागायती उशिरा पेरणीकरिता एन.आय.ए.डब्लू.- ३४, तर जिरायती पेरणीकरिता एन.आय.डी.डब्लू.- १५ (पंचवटी) या वाणांचा वापर करावा.
 • हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.
 • पेरणीच्या वेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
 • पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणीनंतर ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद द्यावे.

बाजरी
अवस्था - दाणे भरणे
जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार काढणी करून घ्यावी.

भुईमूग
अवस्था - शेंगा लागणे
शेंगा भरत असताना जास्तीत जास्त आकार व वजन वाढण्यासाठी ७० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०), ५० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

हरभरा
अवस्था - पेरणीपूर्व तयारी
पेरणीपूर्व प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेन्डाझिम चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हीरीडी ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चोळावे.

मिरची

 • अवस्था - फळे लागणे
 • मिरचीवरील लिफ कर्ल (चुरडामुरडा) हा विषाणूजन्य रोग असून, त्याचा प्रसार पांढरी माशी, फुलकिडे आणि कोळी या रसशोषक किडींमार्फत होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपे लागवडीनंतर २५ दिवसांनी पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस (५० ईसी) १ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी गरजेनुसार करावी.
 • फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच, फिप्रोनील (५ ईसी) १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
 • कोळी नियंत्रणासाठी, डायकोफॉल २ मि.लि. किंवा फेनाक्झाक्वीन १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

वांगी

 • अवस्था - फळे लागणे
 • रोपे पुनर्लागवडीनंतर २० दिवसांनी प्रादुर्भावित शेंडे दिसून आल्यास ती काढून टाकावीत. फळे तोडणीच्या वेळेस कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत.
 • फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
  क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% ईसी) ०.४ मि.लि. किंवा
  स्पिनोसॅड (४५ एस.सी.) ०.५ मि.लि.
  पुढील फवारणी गरजेनुसार करावी.

टोमॅटो
अवस्था - फळे लागणे

 • टोमॅटोवरील रसशोषक किडी (फुलकिडे, पांढरी माशी व मावा) नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
  इमिडाक्लोप्रिड (१८ एस.सी.) ०.५ मि.लि. किंवा
  फिप्रोनील (५ ईसी) १.५ मि.लि.
 • फळे पोखरणाऱ्या अळीच्या व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी,
  क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि.
  यापैकी एक कीटकनाशकांमध्ये
  मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम यापैकी एक बुरशीनाशक मिसळून प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

संपर्क ः ०२४२६ २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

इतर ताज्या घडामोडी
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...
कांदा चाळ अनुदानापासून पुणे...पुणे   ः कमी दरामुळे कांदा साठवणुकीकडे...
नगर महापालिका निवडणूकीत शिवसेना ठरला...नगर  : नगर महापालिका निवडणुकीचा निकाल...
भंडारा जिल्ह्यात खासगी खरेदीदारांकडून...भंडारा  ः पूर्व विदर्भात दूध संकलनात आघाडीवर...
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...