agricultural stories in Marathi, agrowon, crop advice | Agrowon

कृषी सल्ला
कृषी विद्या विभाग, राहुरी
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

मका
अवस्था - काढणी
१) कणसे पक्व झाल्यास त्याची काढणी करावी.
२) लष्करी अळी किंवा केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२० इसी) २ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुईमूग
अवस्था - काढणी
भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घ्यावेत. पुरेसा ओलावा नसल्यास हलके पाणी देऊन डहाळे उपटून घ्यावेत आणि शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात.

मका
अवस्था - काढणी
१) कणसे पक्व झाल्यास त्याची काढणी करावी.
२) लष्करी अळी किंवा केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२० इसी) २ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुईमूग
अवस्था - काढणी
भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घ्यावेत. पुरेसा ओलावा नसल्यास हलके पाणी देऊन डहाळे उपटून घ्यावेत आणि शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात.

तूर
अवस्था - फुले लागणे
- फुले आणि शेंगा खाणाऱ्या अळीच्या (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) नियंत्रणासाठी आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी शेतामध्ये ४ ते ५ कामगंध सापळे प्रतिएकर लावावेत.

हरभरा
अवस्था - उगवण
१. शेतात पाने खाणाऱ्या अळीच्या (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० पक्षिथांबे बसवावेत. पक्षिथांब्याजवळ पिवळ्या रंगाचा भात पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवावा. पक्षी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात.
२. हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्यास, जमिनीत ओल असताना बिव्हेरिया बॅसियाना २ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिएकर पिकाच्या मुळाशी आळवणी घालावी.

ज्वारी
अवस्था - दाणे भरणे
१. ज्वारीवरील दाण्यावर काणी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ते कणीस जमा करून जाळून टाकावे.
२. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी पिकाचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी पिकाच्या अवतीभोवती बेगडी पट्ट्या (चमकणाऱ्या अग्निरेखा) लावाव्यात.

गहू
अवस्था - उगवण
१. गहू पिकाच्या पेरणीसाठी फक्त प्रमाणित, रोग व किडीला प्रतिकारात्मक बियाणे निवडावे. आंतरपीक म्हणून चवळी, कांदा, मका याची पेरणी करावी.
२. सापळा पीक म्हणून झेंडू किंवा वाटणा या पिकाची निवड करावी. शेताच्या चारही बाजूने उंच पिके उदा. मोहरी, मका किवा ज्वारी पिकाच्या दोन किवा चार ओळी पेराव्यात.

ऊस
अवस्था - वाढ
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
लोकरी माव्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिहेक्टरी दहा हजार डिफा ॲफिडिव्होरा, मायक्रोमस टीमीडस हे प्रभावी परभक्षक मित्रकीटक प्रादुर्भावग्रस्त पिकात संध्याकाळी सोडावेत.

ऊस (पूर्वहंगामी)
अवस्था - लागवडीची पूर्वतयारी
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करतात. त्यासाठी पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी. मध्यम ते भारी जमिनीत १०० सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
रानबांधणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत जमिनीतून द्यावे. (५० गाड्या/हेक्टर)
बेणेप्रक्रिया करण्यासाठी मॅलॅथिऑन ३०० मिलि अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात १० मिनिटांसाठी बुडवून लागवड करावी.
लागवडीसाठी को-८६०३२, को-९४०१२, को-८०१४, फुले ०२६५ या वाणांची शिफारस आहे.
एक डोळा पद्धतीत को-८८१२१, को-९४०१२ हे वाण चांगले आहे, त्याचा वापर करावा.

भात
अवस्था - वाढ
तपकिरी तुडतुडे या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी ब्यूप्रोफेजिन (२५ टक्के प्रवाही) २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

करडई
अवस्था - पेरणी
करडई पिकाच्या पेरणीसाठी एस.एस.एफ. ७०८, फुले चंद्रभागा या सुधारित वाणांची निवड करावी.
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रक्रिया करावी.
मर रोगांपासून रोप अवस्थेत संरक्षणासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
पेरताना प्रतिएकरी ४५ किलो युरिया व ६५ किलो स्फुरद द्यावे.

भाजीपाला पिके
भाजीपाला पिकांमध्ये जैविक, सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रणाकरिता खालीलप्रमाणे कीडनाशके वापरता येतील.
१) मावा, फुलकिडे, पांढरी माशीचे नियंत्रण ः
व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.
निंबोळी अर्क ४ टक्के फवारणी करावी.
२) पाने आणि फळे खाणाऱ्या अळ्या : फवारणी
निंबोळी अर्क (४ टक्के) किंवा कडुनिंब आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २.५ मि.लि. प्रतिलिटर
बिव्हेरिया बॅसियाना ४ ग्रॅम प्रतिलिटर
एच.एन.पी.व्ही. (हेलिओकील) १ मिलि प्रतिलिटर पाणी.

काकडी
अवस्था - फळे लागणे
काकडी पिकावर केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
फळमाशी आणि केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान १ मिलि या पैकी एका कीटकनाशकामध्ये मिसळून मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फवारावे.

सीताफळ
अवस्था - वाढ
पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव दिसून येताच, व्हर्टिसिलियम लेकॅनी ४०० ग्रॅम अधिक दूध १ लिटर प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे मिसळून संध्याकाळी फवारणी करावी.

डाळिंब
अवस्था - फळे लागणे
सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा प्लस २५ ग्रॅम अधिक शेणखत २.५ किलो अधिक निंबोळी पेंड २.५ किलो या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून बांगडी पद्धतीने प्रतिझाड आळ्यातील मातीत मिसळून झाकणे. पाणी देणे.

संपर्क ः ०२४२६ -२४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...