कृषी सल्ला : कापूस, गहू, रब्बी ज्वारी, ऊस, तूर, भाजीपाला पिके, डाळिंब

कृषि सल्ला
कृषि सल्ला

कापूस ः १) बीटी कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी प्रोफेनोफॉस (५०% ई.सी) २ मिली २) दुसरी वेचणी पहिल्या वेचणीनंतर १५ दिवसांनी करावी गहू ः सापळा पिकावर असलेल्या किडीच्या हालचालीची नोंद करावी. आवश्यकता भासल्यास ५ % निबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी करावी. रब्बी ज्वारी ः ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट १ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ०.४ मिली. ऊस ः लोकरी माव्याच्या व्यवस्थापनासाठी डिफा ऑफीडिव्होरा व मायक्रोमस टिमिडस या प्रभावी परभक्षक कीटक शेतात सोडावेत. करडई ः मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी ॲसिटामीप्रिड (२० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ०.२ मिली किंवा डायमेथोएट (३०% प्रवाही) १.५ मिली. तूर ः सध्या पीक शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. १) घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरपायरीफॉस (२० ई.सी.) २ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५%) २ मिली. २) पावसामध्ये खंड पडल्यास शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. भाजीपाला पिके सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे गवार, टोमॅटो, भेंडी, मिरची इ. भाजीपाला पिकांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गंधक (पाण्यात विरघळणारे ८०% प्रवाही) २ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव अधिक दिसून आल्यास डायफेनकोनॅझोल अर्धा मिली अधिक पोटॅशियम बायकार्बोनेट ५ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणात फवारणी करावी. कारले कारले पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, मेलॅथिऑन २ मिली अधिक १० ग्रॅम गुळ प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी त्यावर येणाऱ्या रसशोषक किडींचे नियंत्रण करावे. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी ॲसिटामीप्रिड ०.५ ग्रॅम किंवा डायफेन्थुरॉन १ ग्रॅम. डाळींब सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी, ट्रायकोडर्मा प्लस २५ ग्रॅम अधिक २.५ किलो शेणखत अधिक २.५ किलो निंबोळी पेंड चांगले मिसळून बांगडी पद्धतीने प्रति झाड द्यावे. पाणी देणे. संपर्क ः ०२४२६ -२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com