agricultural stories in marathi, agrowon, crop advice | Agrowon

कृषी सल्ला
कृषी विद्या विभाग, राहुरी
गुरुवार, 1 मार्च 2018

कांदा
    सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये असून, त्यावर फूलकिडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हे प्रमाण फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत वाढत राहते.

त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
कार्बोसल्फान १ मिली किंवा
फिप्रोनील १.५ मिली किंवा
अधिक १ मिली स्टिकर.

ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅन्कोझेब किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली.
टीप ः ही फवारणी कीटकनाशकात मिसळूनही करता येईल.

कांदा
    सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये असून, त्यावर फूलकिडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हे प्रमाण फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत वाढत राहते.

त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
कार्बोसल्फान १ मिली किंवा
फिप्रोनील १.५ मिली किंवा
अधिक १ मिली स्टिकर.

ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅन्कोझेब किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली.
टीप ः ही फवारणी कीटकनाशकात मिसळूनही करता येईल.

टोमॅटो
    सध्या बऱ्याचशा भागात उन्हाळी टोमॅटोची लागवड चालू झाली आहे.
    टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लिफ कर्ल) रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होतो. टॉस्पो व्हायरस फुलकिडीमार्फत पसरतो. या किडींचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे असते. रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा.
फवारणी प्रतिलिटर पाणी
फिप्रोनील (५ ईसी) १.५ मिली किंवा कार्बोसल्फान (२५ ईसी) १ मिली अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम

फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
सायपरमेथ्रीन (१० ईसी) १ मिली
    अधूनमधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

हरभरा
हरभरा पीक सध्या काढणीच्या स्थितीत आहे. हरभरा पीक ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते. ते सध्या काढणीच्या स्थितीमध्ये आहे. पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास ६ ते ७ दिवस कडक ऊन द्यावे. बरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला (५ टक्के) घातल्यास साठवणीमध्ये कीड लागत नाही.

डाळिंब
    बागेमध्ये सध्या फळे लागण्याची स्थिती आहे. या स्थितीमध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंबावर आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
    फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी  स्पिनोसॅड (२.५ एससी) १ मिली

गहू
    ज्या ठिकाणी पीक काढणीच्या अवस्थेत आहे, अशा ठिकाणी कापणीस उशीर झाल्यास एनआय ५४३९, त्र्यंबक (एनआयडब्ल्यू ३०१) या गहू जातीचे दाणे शेतात झडू शकतात. म्हणून पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी, यंत्राच्या साह्याने करावी. अलीकडे गहू कापणी, मळणी कंबाईन हार्वेस्टरने एकाच वेळी करता येते.
    उशिरा लागवड झालेले पीक सध्या कांडी धरणे ते ओंबी लागण्याच्या स्थितीत आहे. येथे मावा किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपर्ला कार्निया या परभक्षी किडीच्या १० ते १५ हजार अळ्या प्रतिहेक्टरी पिकांवर सोडाव्यात.
    किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
    अथवा क्विनॉलफॉस २ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसानंतर करावी.

करडई
सध्या पीक काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे १३० ते १३५ दिवसांत करडईचे पीक पक्व होते. पाने व बोंडे पिवळी पडतात. पिकाची काढणी सकाळी करावी. हवेत आर्द्रता जास्त असल्याने दाणे गळत नाही व हाताला काटे टोचत नाहीत. कापणीनंतर झाडाची कडपे रचून पेठे करावीत. ते पूर्ण वाळल्यानंतर काठीने बडवून काढावे. नंतर उफणणी करुन बी स्वच्छ करावे. काढणी गव्हाच्या एकत्रित काढणी व मळणी यंत्राने केल्यास अत्यंत कमी खर्चात आणि वेळात करता येते. तसेच त्यापासून स्वच्छ माल मिळतो.

लसूण
    लागवड करण्यात आलेल्या लसूण पिकावर फुलकिडे आणि पांढरे लांबट कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
    फुलकीडींचा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रतिलिटर पाणी
    फिप्रोनील (५ एस.सी.) १.५ मिली
    सध्या उष्णता वाढू लागल्यामुळे लसणावर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
    फेनपायरॉक्झिमेट (५ ईसी) १ मिली किंवा पेनाक्झाक्विन (१० ईसी) २.५ मिली

सूर्यफूल
हे पीक ११० दिवसामध्ये काढणीस तयार होते. सूर्यफुलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.

गुलाब
फुलकीड व पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि किंवा अॅसिटामीप्रीड (२० एसपी) ०.४ ग्रॅम

मका
पीक उगवणीच्या स्थितीमध्ये असून, या काळात खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

लसूण घास (चारा)
वाढीच्या अवस्थेमध्ये या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम
फवारणी वेळ ः संध्याकाळी.

चवळी (चाऱ्यासाठी)
वाढीच्या अवस्थेमध्ये माव्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिली
टीप ः फवारणीनंतर पुढील सात दिवस जनावरांना चारा खाऊ घालू नये.

तुती
पिकावर तुडतुडे व फुलकिड्याचा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी प्रतिलिटर पाणी  डायमेथोएट १ मिली
टीप ः फवारणी केल्यानंतर १० ते १५ दिवसांपर्यंत तुतीचा पाला रेशीम कीटकांसाठी खाद्य म्हणून वापरू नये.
लिंबूवर्गीय पिके ः
सायला या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी.
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १ मिली किंवा
नोव्हॅल्युरॉन (१० टक्के प्रवाही) ०.५५ मिली

वाल, वाटाणा, कोबी, फुलकोबी व बटाटा
या भाजीपाला पिकांवर मावा किडीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे.
त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर
डायमेथोएट (३० ईसी) १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली.

कलिंगड आणि खरबूज
सध्या या पिकांची लागवड सुरू झाली आहे. या पिकात प्रामुख्याने मावा, फुलकिडे व पांढरी माशी या किडीचा तर केवडा, भुरी, पानावरील ठिपके, मर आणि विषाणूजन्य रोगांमध्ये मोझॅक व बड नेक्रॉसीस या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. कलिंगडाचे पीक २ ते ३ पानांवर असताना फवारणी प्रतिलिटर पाणी  थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान १ मिली यापैकी एक अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
    पिकावर नागअळी आढळून आल्यास, त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
निंबोळी अर्क ४ टक्के
    टीप ः या फवारण्या फुले येण्यापूर्वी कराव्यात. फुले आल्यानंतर शक्यतो निओनिकोटीनॉइड गटातील (उदा. अॅसीटामीप्रीड, इमिडाक्लोप्रीड व थायामेथोक्झाम) कीटकनाशकांचा फवारणी करू नये.

आंबा
तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मिली.

संपर्क ः ०२४२६- २४३२३९  
(ग्रामीण कृषी हवामान विभाग आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...