agricultural stories in marathi, agrowon, crop advice | Agrowon

कृषी सल्ला
कृषी विद्या विभाग, राहुरी
गुरुवार, 15 मार्च 2018

ऊस

ऊस

 • पीक स्थिती ः वाढीची.
 • सुरू उसाला लागवडीनंतर ६ ते ८ आठवडे झाले असल्यास हेक्टरी १०० किलो नत्राचा हप्ता द्यावा. उसाच्या सरीमध्ये हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन टाकावे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. ओल जास्त काळ टिकून राहते. पिकाला सेंद्रिय खतांचा पुरवठासुद्धा होतो.
 • पूर्वहंगामी उसाला दोन कांड्या सुटलेल्या असल्यास हेक्टरी १३६ किलो नत्र, ८५ किलो स्फुरद, ८५ किलो पालाश या प्रमाणात खताची मात्रा देऊन पक्की बांधणी करावी.

उन्हाळी भुईमूग
उन्हाळी भुईमुगावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास,
नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
    सायपरमेथ्रीन (२० टक्के प्रवाही) ०.४ मिलि. किंवा
    क्विनॉलफॉस (२० टक्के प्रवाही) २ मिलि.
टीप ः प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाणी वापरावे.  

गहू

 • पीक स्थिती ः काढणी
 • पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास एन आय-५४३९ व त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू-३०१) या गव्हाच्या वाणाचे दाणे शेतात झडू शकतात. पीक पक्व होण्याच्या २-३ दिवस अगोदर कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी, यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा अलीकडे गव्हाच्या कापणी व मळणीसाठी कंबाईन हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे वेगाने काम होते. हाताने कापणी केली असल्यास यंत्राच्या साह्याने वेळेवर मळणी करावी.

हरभरा  

 • पीक स्थिती ः काढणी
 • ११० ते १२० दिवसांमध्ये हरभरा पीक तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला (५ टक्के) वापरल्यास साठवणीत कीड लागत नाही.

कांदा

 • पीक स्थिती - वाढ
 • कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकीडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे प्रमाण फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये वाढत असते. त्याच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
   कार्बोसल्फान १ मिलि. किंवा फिप्रोनील १.५ मिलि
  टीप ः वरील कीटकनाशकासोबत उत्तम दर्जाच्या स्टिकरचा वापर करावा. पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून घ्यावी.  
 • करपा रोगाचे प्रादुर्भाव दिसून आल्यास, त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
  मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा     क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा    टेब्युकोनॅझोल १ मिलि.    वरील कीटकनाशकात मिसळून फवारणी करावी

रब्बी काढणी व धान्य साठवण

 • रबी पिकांची काढणी झालेल्या क्षेत्रामध्ये त्वरित नांगरणी करावी. शेतातील पिकांचा पालापाचोळा, अवशेष इ. जमिनीत गाडले जातात.
 • धान्य साठवतेवेळी त्यात लिंबाचा पाला १ ते २ टक्के मिसळावा.
 • वेखंड किबा बोरीक पावडर यांची भुकटी २-५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणात मिसळावे.
 • साठविलेल्या धान्यातील किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.  

भाजीपाला पिके ः

 • पीक स्थिती ः वाढीची.
 • ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांवर पाने खाणाऱ्या हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी किंवा प्रादुर्भाव झाला असल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी     क्लोरपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस यापैकी कोणतेही एक १.५ मिलि.  

फळझाडे व भाजीपाला ः
वाढत्या तापमानामुळे फळझाडे व भाजीपाला पिकांवर पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, लालकोळी या सारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. असा प्रादुर्भाव आढळल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी
    इमिडाक्लोप्रीड ०.४ ते ०.५ मिलि. किंवा
    डायमेथोएट १.५ मिलि.

वांगी ः

 • पीक स्थिती ः फळे लागणे
 • वांगी पिकाच्या रोपांच्या पुनर्लागवडीवेळी रसशोषक कीडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ०.४ मिलि. किंवा कार्बोसल्फान १ मिलि. प्रतिलिटर पाणी या द्रावणामध्ये रोपांची मुळे बुडवावीत.
 • फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,  फवारणी प्रतिलिटर पाणी
  ४ टक्के निंबोळी अर्क किंवा    प्रोफेनोफॉस २ मिली किंवा     स्पिनोसॅड ०.३ ते ०.४ मिलि. किंवा    इंडोक्झाकार्ब १ मिलि.

वाल ः

 • पीक स्थिती ः शेंगा लागणे
 • वाल या पिकावर करपा व पानांवरील ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
  मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा
  कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा    कार्बेन्डाझीम १ ग्रॅम
 • टीप ः पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

भेंडी ः

 • पीक स्थिती ः फळे लागणे
 • भेंडी या पिकावर फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी
  डेल्टामेथ्रीन ०.८ मिलि. किंवा क्विनॉलफॉस २ मिलि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि.
  अधूनमधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  ट्रायकोकार्ड हेक्टरी १० प्रमाणात वापरावेत.

टोमॅटो ः

 • पीक स्थिती ः लागवड
 • सध्या बऱ्याचशा भागात उन्हाळी टोमॅटोची लागवड चालू झाली आहे.
 • टोमॅटो पिकात पर्णगुच्छ विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत, तर टॉस्पो व्हायरसचा प्रसार फुलकिड्यांमार्फत होतो. तो टाळण्यासाठी या किडींच्या नियंत्रणासाठी रोपावस्थेपासूनच प्रयत्न करावेत. अशी रोगग्रस्त रोपे, झाडे दिसताच उपटून नायनाट करावा.
  गरजेनुसार फिप्रोनील (५ ईसी) १.५ मिलि किंवा कार्बोसल्फान (२५ ईसी) १ मिलि. या पैकी एक कीटकनाशकामध्ये मॅन्कोझेब २.५ ग्रॅम  किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
  फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
  सायपरमेथ्रीन (१० ईसी) १ मिलि.    अधून-मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

संपर्क  ः ०२४२६ - २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...