agricultural stories in marathi, agrowon, crop advice for kokan | Agrowon

कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा, भाजीपाला लागवड
डॉ. विजय मोरे
गुरुवार, 24 मे 2018

भात ः
सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असेल. भात पेरणीसाठी जमीन नांगरून, त्यातील ढेकळे फोडावीत. प्रति चौरस मीटर एक किलो शेणखत जमिनीत मिसळाले. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच व पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जागेवर गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्याचा आकार तळाशी १२० सें.मी. रुंद असावा. वाफ्यांना प्रति आर क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.

भात ः
सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असेल. भात पेरणीसाठी जमीन नांगरून, त्यातील ढेकळे फोडावीत. प्रति चौरस मीटर एक किलो शेणखत जमिनीत मिसळाले. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच व पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जागेवर गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्याचा आकार तळाशी १२० सें.मी. रुंद असावा. वाफ्यांना प्रति आर क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.

भुईमुग ः
उन्हाळी भुईमूग सध्या काढणीच्या अवस्थेत आहे. तयार झालेल्या शेंगाची काढणी करून उन्हामध्ये ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात. वाळलेल्या शेंगाची संरक्षित ठिकाणी साठवण करावी.

आंबा ः
बागेमध्ये हवामानानुसार मागे पुढे फळधारणा व फळे काढणीचा हंगाम सुरू आहे.

  • आंबा फळावंर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी चार रक्षक सापळे लावावेत.
  • मोठ्या आकाराची फळे तयार झाली असून, ती काढणीच्या अवस्थेत आहेत. तयार फळे सकाळी दहाच्या आधी आणि दुपारी चारनंतर झेल्याच्या साह्याने ८० ते ८५ टक्के पक्वतेला काढावीत. काढलेली फळे साका टाळण्यासाठी व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीत ठेवावीत.
  • काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर त्वरित फळे ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिट बुडवून काढावीत. नंतर सावलीत वाळवावीत. काढलेली तयार फळे पिकविण्यासाठी ती इथ्रेल ६.५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून तयार केलेल्या द्रावणामध्ये पाच मिनिटे बुडवून नंतर सावलीत वाळवावीत. विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये आंब्यांची पॅकिंग करावी. शक्यता आंब्याची वाहतूक रात्रीच्या वेळी करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस आधी झाडावर कोणतीही फवारणी करू नये.

काजू ः
पावसाळ्याच्या सुरवातीला आंबा आणि काजू झाडांना खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी बागेमध्ये प्रकाश सापळ्याचा वापर करून, जमा झालेल्या कीटकांचा कीटकनाशक मिश्रित पाण्यामध्ये बुडवून नाश करावा. खोडकिडीचा प्रादुर्भाव बागेत ज्या ठिकाणी दिसून दिसून येत असेल, तेथील साल १५ मि.मी. पटाशीसच्या साह्याने काढून, आतील खोडकीड मारून टाकावी. नंतर हा भाग क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणाने चांगला भिजवावा. खोडकिडीने तयार केलेल्या छिद्रामध्ये क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि.लि अधिक रॉकेल ५० मि.लि.मध्ये ओतावे.
काजू बी तयार झालेली असल्यास तिची काढणी करून उन्हामध्ये वाळवावी.
नवीन फळबाग लागवड करण्यासाठी फळपिकांच्या शिफारस अंतरानुसार खड्डे खोदून तयार करावेत.

नारळ, सुपारी ः

  • - सरासरी तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे नारळाच्या बागेला ५ ते ६ दिवसांनी व सुपारी बागेला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • नारळावरील गेंडा भुंदा या किडीच्या नियंत्रणासाठी बागेतील शेणखताच्या खड्ड्यामध्ये दर दोन महिन्याने मिथिल पॅराथिऑन (२ टक्के भुकटी) मिसळावी.
  • नारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी खोडावर एकम मीटर उंचीवर गिरमिटाच्या साह्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे छिद्र पाडावे. त्यामध्ये क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) नरसाळ्याच्या साह्याने ओतावे. ते छिद्र सिमेंटच्या राह्याने बंद करावे.
  • सुपारीवरील कोळे रोग हा बुरशीजन्य रोग असून, त्याच्या नियंत्रणासाठी पावसाला सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या झावळ्या, शिंपुटे काढून टाकाव्यात. पानाच्या बेचक्यात बोर्डो मिश्रण (१ टक्का) फवारावे.
  • कोळेरोगाच्या यशस्वी नियंत्रणासाठी फोसेटिल एएल (८० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या तयार केलेले द्रावण सुपारी झाडांना मुळावाटे पाच हप्त्यांत द्यावे. त्यासाठी सुपारी झाडाची अन्न घेणारी दोन मुळे निवडून, त्याची टोके कापून घ्यावीत. वरील द्रावण प्रत्येकी १०० मि.लि. दोन प्लॅस्टिक पिशव्यामध्ये भरून त्यात कापलेली मुळे बुडवून पिशव्या मुळांचा बांधून ठेवाव्यात. हे बुरशीनाशक पावसाळा सुरू होण्यापूर्वी द्यावे.

भाजीपाला लागवड ः
वांगी, टोमॅटो, मिरची व नवलकोल अशा भाजीपाला पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
हेक्साकोनॅझोल (५ टक्के) ५ मि.लि. किंवा
गंधक (८० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) २ ग्रॅम
वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर ४ रक्षक सापळे लावावेत.

डॉ. विजय मोरे, ०२३५८- २८२३८७, ९४२२३७४००१
(कृषी हवामान तज्ज्ञ, कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...