कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ, भाजीपाला/ फळबाग रोपवाटिका, मसाले पिके

कृषी सल्ला (कोकण विभाग)
कृषी सल्ला (कोकण विभाग)

वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करून घ्यावी. ४ ते ५ दिवस शेंगा उन्हात वाळवाव्यात. नंतर मळणी करावी किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवावीत. नंतर मळणी करावी. साठवणुकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावे. आंबा मोहोर व फलधारणा अवस्था

  • सध्या आंबा पिकामध्ये मोहोर फुटण्याची व वाटाण्याच्या आकाराची फळे येण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर तुडतुड्याचा आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) प्रतिलिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मिली किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (८० टक्के) २ ग्रॅम.
  • फळगळ कमी करण्यासाठी फलधारणा झाल्यावर पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रतिझाड या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाळ्या द्याव्यात.
  • फळे वाटणा आकाराची असताना फळाचा आकार, फळाचे वजन वाढणे, फळामध्ये साका न येणे यांसह फळमाशीपासून संरक्षणासाठी २५ x २० आकाराची पेपर पिशवी लावावी.
  • काजू बी अवस्था काजूमध्ये सध्या मोहोर व बी अवस्था आहे. त्यावर फुलकिडीचा व ढेकण्या किडीचा (टी मॉंस्कीटो बग) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली नवीन काजू लागवडीतील कलमांना गवताचे आच्छादन करून नियमित पाणी द्यावे. नारळ

  • नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी नारळ बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यावर त्यात या किडीच्या वाढणाऱ्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी दर दोन महिन्यांनी क्लोरपायरीफॉस २ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • नारळ बागेत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
  • मसाले पिके फळपक्वता काळीमिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच मिरीची काढणी करावी. दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिटे बुडवावेत. उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगले वाळवावे. भाजीपाला/ फळबाग रोपवाटिका

  • काढणी अवस्था
  • वेलवर्गीय भाजीपाला पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या माशीच्या नियंत्रणासाठी शेतात “रक्षक” सापळा प्रतिहेक्टरी ४ नग या प्रमाणात लावावेत.
  • उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड ४५ x १५ से.मी. अंतरावर करावी. लागवडीच्या वेळेस १५ टन शेणखत, ७२ किलो युरिया, ३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिहेक्टरी खताची मात्रा द्यावी.
  • फळबाग रोपवाटिकेस, नवीन लागवड केलेल्या फळबागा, तसेच भाजीपाला पिकास पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • ०२३५८- २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com