कर्बवायूच्या शोषणामध्ये सागरातील सूक्ष्मजीवांचा भूमिका

कर्बवायूच्या शोषणामध्ये सागरातील सूक्ष्मजीवांचा भूमिका
कर्बवायूच्या शोषणामध्ये सागरातील सूक्ष्मजीवांचा भूमिका

समुद्राच्या खोल पाण्यामध्ये आढळणारे नायट्राइट ऑक्सिडाजिंग जिवाणू हे कार्बन डायऑक्साइड पकडून ठेवण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका निभावू शकत असल्याचे व्हियन्ना येथील बिगेलॉ लॅबोरेटरी फॉर ओशियन सायन्सेस येथील संशोधकांचे मत आहे.

सागरामध्ये २०० ते १००० मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश अत्यंत कमी प्रमाणात पोचतो. अशा ठिकाणी वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या विविध प्रजातीविषयी अद्यापही संशोधन सुरू आहे. यातील अनेक सूक्ष्मजीव हे कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर प्रथिने, कर्बोदके आणि लिपीड घटकांमध्ये करतात. हे पोषक घटक पुढे अनेक सागरी जलचरांचे खाद्य बनतात. २०० ते १००० मीटर खोलीच्या पट्ट्यामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांकडून मोठ्या प्रमाणात कार्बन पकडला जातो. या सूक्ष्मजीवांचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण बिगेलॉ लॅबोरेटरी फॉर ओशियन सायन्सेस येथे करण्यात येत आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधिका मारिया पचियाडाकी यांनी सांगितले, की जागतिक कर्बसाखळीमध्ये कार्यरत असलेल्या अनेक जिवाणू सागराच्या २०० ते १००० मीटर खोलीच्या टप्प्यात असल्याचा अंदाज होता. मात्र अपेक्षेपेक्षाही अधिक महत्त्वाची भूमिका हे सूक्ष्मजीव जागतिक प्रदूषण कमी करण्यासाठी बजावू शकत असल्याचे विश्लेषणाअंती समोर येत आहे.

...असे झाले संशोधन हे जिवाणू नायट्रोजन मूलद्रव्यांच्या विघटनातून जगण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळवतात. काळोख्या समुद्रातील हे सूक्ष्मजीवाचे हे प्रमाण आधी केवळ पाच टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे मानले जात होते. मात्र तरीही प्रति वर्ष त्यांच्याकडून शोषल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे १.१ गीगाटनापेक्षा (११० दशलक्ष टन) अधिक आहे. हे सूक्ष्मजीव प्रयोगशाळेमध्ये वाढवणे अवघड असल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळवणेही अडचणीचे ठरते. त्यामुळे संशोधकांनी जगभरातील चाळीस ठिकाणावरून या सूक्ष्मजीवांचे नमुने गोळा केले. काळोख्या सागरामध्ये आढळणारा आर्चिया हा एक सूक्ष्मजीवांचा मोठा गट आहे. या गटातील सुमारे ३५०० जिवाणूंचे विश्लेषण केले.मात्र कर्बवायूंच्या शोषणामध्ये कार्यरत अन्य घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये करण्यात आला. विश्लेषण झालेल्यापैकी सुमारे १०० जिवाणू हे नायट्राइटचे ऑक्सिडेशन (विघटन) करत असल्याचे आढळले. त्यातील ३० प्रजातींचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण करण्यात आले. अर्थात, अशा जिवाणूंचे प्रमाण ५० पटीने अधिक असण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com