पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील उपाययोजना

पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील उपाययोजना
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील उपाययोजना

लोह (Fe) कार्ये ः

  • हरितद्रव्ये निर्मितीचे (आॅक्सिडेशन- रिडक्शन) अभिक्रियामध्ये महत्त्वाचे.
  • विविध संप्रेरकाचा घटक असल्यामुळे वनस्पतीतील श्वसनक्रिया, प्रकाश संश्लेषण आणि नायट्रेटच्या रूपांतरास मदत.
  • वनस्पतीतील प्रथिने तयार होण्याच्या क्रियेत मदत.
  • वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमधील लेगहिमोग्लोबीनचा एक भाग. लोहामुळे कडधान्याच्या मुळांवरील गाठीची वाढ होण्यास मदत.
  • कमतरता लक्षणे

  • शेंड्याकडील कोवळ्या पानांच्या शिरा हिरव्या राहून मधला भाग पिवळा पडतो. नंतर पानाचा रंग पांढरा होऊन पाने करपतात.
  • वनस्पतीमध्ये अल्फा ओमेगा, लिव्हेलिनो, लिव्हेलिनीक आम्लाचे प्रमाण घटते.
  • मुळ्यांची लांबी खुंटते. त्यावरील तंतू वाढतात.
  • उपाययोजना ः

  • परीक्षणानंतर मातीमध्ये लोहाचे प्रमाण ४.५ मिलिग्रॅम/किलो (पीपीएम) पेक्षा कमी असल्यास कमतरता असल्याचे समजावे. त्यासाठी-
  • जमिनीतून १५ ते २५ किलो फेरस सल्फेट प्रतिहेक्टर - शेणखतात अथवा गांडूळ खतात मिसळून द्यावे.
  • फवारणीसाठी ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फेरस सल्फेटची फवारणी करावी. चिलेटेड लोह असल्यास ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) प्रमाणे फवारणी करावी.
  • जस्त (Zn) कार्ये ः

  • वनस्पतींच्या वाढीसाठी योग्य अशी संप्रेरक (संजीवके) तयार करणे.
  • ट्रिफटोफॅन, आॅक्झिन व इण्डॉल अॅसेटिक आम्लाचा संश्लेषणासाठी उपयोग होतो. त्यामुळे वनस्पतीमधील आॅक्झीन संप्रेरकाची निर्मिती होऊन वनस्पतीची वाढ होते.
  • स्टार्च (कर्बोदके) निर्मितीच्या कार्यात मदत.
  • वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत व पाण्याच्या अभिसरण प्रक्रियेत मदत.
  • गायकाॅलिसिस, प्रकाश संश्लेषण, कार्बनडायआॅक्साईड समीकरण आणि प्रथिने संश्लेषणासाठी विकरांना (एन्झाइम) चेतना देतो.
  • वनस्पतीची पाने पिवळी पडून कमजोर होतात, पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील ऊती मरतात.
  • शेंड्याकडील पाने खुजी होतात.
  • फळांचा आकार बिघडतो, लिंबूवर्गीय फळांची पाने सडतात.
  • फांदयांच्या शेंड्याकडील पाने अतिशय बारीक येतात.
  • पानांच्या कडा वेड्यावाकड्या दिसतात.
  • कळया व फळे लहान आकाराची होतात.
  • शेंडा व खोडाच्या लांबीवर परिणाम होतो.
  • पालवी तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाची दिसते.
  • खोड वाळते व पाने पक्व होण्यापूर्वी अकाली गळतात.
  • साल खडबडीत व टणक होऊन चकाकते.
  • भातपिकावर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • उपाययोजना

  • माती परीक्षणानुसार जमिनीतील जस्ताचे प्रमाण ०.६ मिलिग्रॅम/किलो (पीपीएम) पेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी.
  • जमिनीतून १५ ते २० किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्टर शेणखतातून अथवा गांडूळ खतातून द्यावे.
  • फवारणीद्वारे ०.५ टक्के झिंक सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा ०.१ टक्के चिलेटेड जस्त (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) प्रमाणे फवारणी करावी.
  • बोराॅन (B) कार्ये -

  • वनस्पतीतील नवीन पेशींची वाढ करण्यास मदत.
  • परागसिंचन व परागवाढ, पुंकेसराच्या कामास, तसेच बी व फळे तयार होण्यासाठी मदत करतो.
  • वनस्पती शरीरांतर्गत शर्करायुक्त पदार्थांच्या चलनवलनाशी संबंधित आहे.
  • वनस्पतीमधील संजीवक निर्मिती, प्रथिने व अमिनो आम्लाचे विश्लेषणात मदत.
  • द्विदल पिकांच्या मुळांमध्ये नत्राच्या गाठी तयार करणे.
  • कॅल्शियम व नत्राच्या शोषणप्रक्रियेत वनस्पतींना मदत.
  • गळीत धान्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढते.
  • वनस्पतीमध्ये पोटॅश/कॅल्शियम यांचे प्रमाण योग्य ठेवण्यास नियामक म्हणून कार्ये करते.
  • वनस्पतीच्या शेंड्याकडील वाढ मंदावते.
  • कळीचा रंग फिक्कट हिरवा होतो व कमतरतेमुळे वाढणारी कळी मरते.
  • पानाचा रंग निळसर हिरवा होऊन, ती वेडीवाकडी जाड व ठिसूळ होतात.
  • नवीन पाने गुंडाळतात व सुकतात.
  • परागकणाची क्षमता व फळधारणा कमी होऊन फळे कमी लागतात.
  • कंदफळाचा गाभा काळा पडतो, त्यांना भेगा पडतात, ती कुजतात व फुटतात.
  • खोड व पानांचा देठ यांना तडे जातात.
  • फुलकोबीवर तपकिरी कूज दिसते, कोबीवर तांबूस करडे ठिपके पडतात.
  • रताळीच्या मुळांवर कॅंकर व मालफार्मेशन होते.
  • लिंबावर डिंक्या, आंब्यावर काळबोंडी, नारळावर पानकुज व शेंडाकूज रोग होतात.
  • डाळिंबाची फळ तडकतात.
  • लिंबूवर्गीय फळे आतून व बाहेरून दगडासारखी टणक होतात. त्यातील बलक व साल यांचे गुणोत्तर कमी होते.
  • भुईमुगाची पाने हलक्या जमिनीत पिवळी पडतात.
  • माती परीक्षणानुसार जमिनीतील बोराॅनचे प्रमाण ०.५ मिलिग्रॅम प्रतिकिलो (पीपीएम) पेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी.
  • जमिनीतून ५ किलो बोरॅक्स प्रतिहेक्टर शेणखतातून द्यावे.
  • फवारणीद्वारे ०.०५ ते ०.१ टक्के (०.५ ते १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) बोरीक अॅसिडची फवारणी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com