स्वच्छता, पाणी, शिक्षण, अारोग्यावर विशेष लक्ष

दिशा ग्रामविकासाच्या
दिशा ग्रामविकासाच्या

ढोरखेडा (ता. मालेगाव, जि. वाशीम) हे गाव ग्रामपंचायतीचे नियोजन अाणि गावकऱ्यांचे सहकार्य या बळावर विकासाचे नवे टप्पे गाठत आहे. येथील सरपंच सुनिताताई दत्तात्रेय मिटकरी यांनी ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत मिळालेले ज्ञान, योजना यांचा अाधार घेत गावाला विकासाच्या वाटेवर अाणले.

ढोरखेडा हे साधारणतः ११६५ लोकसंख्या असलेले गाव. गावाच्या ग्रामपंचायतीत सात सदस्य अाहेत. मागील तीन वर्षांपासून सरपंच असलेल्या सुनिताताई मिटकरी यांना दरम्यानच्या काळात अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत सहभाग घेण्याची संधी मिळाली. या परिषदेतून गावाच्या विकासाची नवी दृष्टी मिळाल्याचे मत त्यांनी नोंदवले.

 परिषदेतून अाल्यानंतर त्यांनी स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले. गावात १५५ शोषखड्डे खोदण्यात अाले.  छोट्या गावातील शाळांची स्थिती अनेक ठिकाणी दयनीय आहे. मात्र, ढोरखेडा ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पुढाकार घेत ती सुधारण्याचा प्रयत्न केला. गावातील नागरिकांनी तब्बल दोन लाख रुपये लोकवर्गणी गाेळा करत शाळा डिजिटल बनवली.

  • सरपंच महापरिषदेतील ग्रामविकास मंत्र्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत, सुमारे ३३ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना सुधारण्यात अाली. १४ व्या वित्त अायोगाचा ३ लाख रुपये निधी खर्च करून अारअो फिल्टर बसविण्यात अाले. याद्वारे अाता गावकऱ्यांना ५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणी मिळत अाहे.           
  • लोकसहभाग प्रत्येक कामात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून प्रकल्पातील गाळ काढण्यात अाला. गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात अाली. या वर्षात पाऊस अाल्यानंतर दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला अाहे.
  • पूर्वी ग्रामविकासामध्ये शेतीला महत्त्वाचे स्थान नव्हते. आता त्याचा प्राधान्याने विचार केला जातो. केवळ पारंपरिक पिके घेऊन प्रगती होणार नाही, म्हणून कृषीपूरक रेशीम शेतीला प्रोत्साहन देत आहोत. मनरेगातून रेशीम शेती करणाऱ्यांना तीन लाख ८२ हजारांचे अनुदान मिळते. गेल्या वर्षी १२ कुटुंबे रेशीम शेती करत होते, त्याचे प्रमाण या वर्षी ५० कुटुंबापर्यंत पोचत अाहे.
  • येत्या वर्षात शेतरस्ते, जलयुक्त शिवारमधून विविध कामांचे प्रस्ताव अाहेत. स्वच्छता, पाणी, शिक्षण, अारोग्य या पायाभूत बाबींवर ग्रामपंचायत विशेषत्वाने काम करीत अाहे.  
  • संपर्क  ः सुनिताताई दत्तात्रेय मिटकरी, ७८७५३४७७३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com