शेतीचा हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीने

शेतीचा हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीने
शेतीचा हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीने

शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन असे न समजता व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक आहे. व्यावसायिक दृष्टीने काटेकोर ताळेबंद मांडण्याची गरज आहे. त्यासाठी शेती व्यवसायातील जमा खर्चाच्या नोंदी शास्त्रीय पद्धतीने ठेवण्याविषयी माहिती घेऊ. अनेक वेळा शेतकऱ्यांकडे नोंदी नसल्यामुळे नेमका किती फायदा अथवा तोटा झाला, हेच समजत नाही. यासाठी शेती व पूरक व्यवसायातील नोंदी ठेवणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्या पिकापासून अधिक उत्पन्न मिळते, किती खर्च येतो याविषयी माहिती होते. नफा व तोटा किती झाला? पीक व्यवस्थापनात कमतरतेच्या लक्षणीय बाबी कोणत्या? त्या कशा दूर करता येतील हे ठरविणे सोपे जाते. वापरलेल्या साधन सामग्रीची कार्यक्षमता समजते. परिणामी पुढील नियोजन करणे सोपे होते. हिशोबासाठी शेती मूल्यमापनाची सूत्रे पीक क्षेत्राची घनता : या सूत्रामुळे शेतकऱ्यांकडील जमीन वापराची कार्यक्षमता कळते.

पीक क्षेत्राची घनता (%) = एकूण पिकाखालील क्षेत्र --- भागिले --- निव्वळ पेरलेले क्षेत्र × १०० घसारा : शेती उत्पादन खर्चाच्या नोदी ठेवताना शेतकऱ्यांकडे वापरात असलेल्या घराचा शेतीपयोगी हिस्सा, गोठा, यंत्रे व अवजारे, सिंचन साधनांवरील घसारा इ. स्थायी मालमत्तेचा घसारा विचारात घेतला जातो. कृषी अर्थशास्त्रज्ञ सर्वसाधारणपणे सरळ रेषीय घसारा पद्धतीचा अवलंब करतात.

घसारा = वस्तूची प्रचलित दराने किंमत -१० टक्के (जंक व्हॅल्यू) --- भागिले --- वस्तूचे उरलेले आयुष्य. प्रती हेक्टरी उत्पादन खर्च : या सूत्रामुळे पीक लागवडीवर वर्षभरात झालेला खर्च पिकाच्या प्रती हेक्टरी लागवडीप्रमाणे निघतो. प्रती हेक्टरी उत्पादन खर्च = एकूण खर्च --- भागिले--- पिकाखालील क्षेत्र टीप : हेक्टरी उत्पादन खर्च जेवढा कमी, तितकी भांडवलाच्या वापराची कार्यक्षमता जास्त असे दिसून येते. प्रती हेक्टरी उत्पन्न : सर्वसाधारणपणे कृषी शेत्रात पिकाचे उत्पन्न हे प्रती हेक्टरी या गुणाकात मोजतात. न्यूनतम लागवड क्षेत्रामध्ये चांगले उत्पत्र मिळाल्यास शेतकऱ्यांने योग्य नियोजन व साधनसामग्रीचा कुशल उपयोग केला असे मानले जाते. प्रती हेक्टरी उत्पन्न = एकूण उत्पन्न (रुपये) ---भागिले --- एकूण पीक क्षेत्र (हेक्टर) उत्पन्न खर्च गुणोत्तर : या सूत्रामुळे शेतकऱ्यांने पीक उत्पादन घेताना कशा प्रकारचे शेतीचे नियोजन केले हे समजते. उत्पन्न खर्च गुणोत्तर = एकूण शेती व्यवसायाचे उत्पन्न (रुपये) --- भागिले --- एकूण शेती व्यवसायासाठी केलेला खर्च (रुपये) प्रती क्विंटल उत्पादन खर्च : या सूत्रामुळे शेतकऱ्यास एक क्विंटल उत्पादन घेण्यास एकून किती खर्च आला हे समजते. हा खर्च जर बाजारभावापेक्षा (प्रती क्विंटल) कमी असेल, तर शेती व्यवसाय फायदेशीर आहे असे समजावे. प्रती हेक्टरी उत्पादन खर्च = प्रती हेक्टरी उत्पादन खर्च (दुय्यम मालाची किंमत वजा करून) --- भागिले --- मुख्य मालाचे उत्पादन (क्विंटल) शेतीत गुंतवलेल्या भांडवलावर मिळालेला परतावा : या सूत्रामुळे शेती व्यवसायात वापरलेल्या भांडवलावर आपल्याला काय दराने परतावा मिळतो हे कळते. या परताव्याच्या दराची बँकेकडून ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या दराची तुलना करावी. शेती व्यवसायापासून सुटलेला व्याजाचा दर बँक दरापेक्षा जास्त असल्यास शेती व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर असल्याचे समजावे. शेती भांडवलावर सुटलेला व्याजाचा दर खालील सूत्राने काढावा. शेती भांडवलावर सुटलेला व्याजाचा दर = निव्वळ नफा--- भागिले --- एकूण भांडवल गुंतवणूक × १०० पीक उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धती : शेती व्यवसायाशी निगडित विविध बाबीची नोद जमा-खर्चाच्या पद्धतीने ठेवावी. हे हिशोब शेतीशिवाय इतर जोडधंदे, उदा. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबाग, फुलशेती यासाठी उपयुक्त ठरतात जमा-खर्च प्रत्येक शेतकऱ्याने ठेवल्यास त्याची शेती फायद्यात आहे किवा नाही हे समजू शकेल आणि त्याचा उपयोग पुढील वर्षातील शेतीच्या नियोजनासाठी होतो. प्राथमिक नोंदणी

  • पीक उत्पादनचा खर्च काढताना प्राथमिक नोदी ठेवावी.
  • प्रत्येक दिवसाच्या झालेल्या शेती व्यवहाराची नोंद दैनंदिनीमध्ये कच्ची नोंद म्हणून घ्यावी. त्यानंतर खर्चाच्या स्वरूपानुसार, व्यवहारानुसार त्याची नोंद अनुक्रमाने रोजकिर्दीमध्ये करावी.
  • व्यवहाराचे योग्य रितीने वर्गीकरण करून, संबंधित खातेवहीत त्या व्यवहाराची नोद करावी. खातेवहीत उघडलेल्या खात्यांच्या नोदीच्या आकडेवारीची बेरीज करावी. यामध्ये अचूकता असली पाहिजे.
  • खातेवहीतील जमाखर्चाचे विशेष करून नफा-तोटा किती झाला हे समजते. नफा-तोटा पत्रकावरून नियोजन ताळेबंद तयार करावा. त्यावरून संपूर्ण शेतीपूरक उद्योगाची आर्थिक परिस्थितीची कल्पना येते.
  • ताळेबंद पत्रकात डावीकडे मालमत्ता व उजवीकडे देणी याची संपूर्ण माहिती असावी. जमाखर्चाच्या दृष्टीने रोजकीर्द व खातेवहीमधील नोंद ही महत्त्वाची असते.
  • तक्ता क्र. १: शेतीमशागतीसाठी वापरलेली सामग्री, मजूर आणि खर्च पिकाचे नाव ................. जात ................. क्षेत्र ................ हंगाम ................ सर्वे/ गट. क्र ................

    शेतीच्या कामाचे विवरण लागलेले मजूर बैलजोड्या वापरलेल्या निविष्ठा  
    पुरुष स्त्रिया
    दिवस मजुरीचा दर दिवस मजुरीचा दर दिवस मजुरीचा दर सामुग्रीचे नाव प्रमाण दर
    1 पूर्व मशागत                  
      जमीन तयार करणे                  
      नांगरणी वखरणी                  
      इतर                  
    2 शेण खत/ सेंद्रिय खत (वाहतूक व पसरवणे                  
    3 पेरणी                  
      दुबार पेरणी झाल्यास                  
    4 अांतरमशागत                  
      निंदणी                  
      डवरणी                  
      इतर                  
    5 रासायनिक खते                  
      पेरणीच्या वेळी                  
      पेरणीनंतर                  
    6  पीक संरक्षण                  
      कीटकनाशके                  
      बुरशीनाशके                  
      संजीवके                   
      इतर                  
    7 ओलीत                  
      पहिली पाळी                  
      दुसरी पाळी                  
    8  पिकांची राखण                  
    9  कापणी/ वेचणी/ मळणी                  

     टीप : तक्ता क्र. १ मध्ये पीक उत्पादनाकरिता घरचे साहित्य वापरले असल्यास, उदा. मजूर, बैलजोडी, बियाणे, शेणखत इत्यादी प्रचलित दराप्रमाणे त्याचे मूल्य काढावे. पीक मशागतीस लागलेली साधनसामग्री, निविष्ठा, वापरलेल्या मजुराची नोद व दिलेली मजुरी या तक्त्यामध्ये लिहावी. / पिकाच्या लागवडीसाठी झालेला खर्च काढण्यासाठी शेतकऱ्यांने खालीलप्रमाणे खर्च लिहावा. खर्चाची बाब --- एकूण बाब --- केलेला खर्च

    1. रोजंदारीच्या मजुरीवरील खर्च
    2. बैल जोडीवरील खर्च (भाडेतत्त्वावर/ घरची बैलजोडी)
    3. यंत्रावरील खर्च (भाडेतत्त्वावर/ घरचे यंत्र)
    4. बियाणे खर्च
    5. सेंद्रिय खते : शेणखत, हिरवळीचे खत
    6. रासायनिक खते
    7. जैविक खते
    8. सूक्ष्म अन्नद्रव्ये
    9. पीक संरक्षणावरील खर्च
    10. निविष्टा मिळवण्याच्या अनुषंगाने झालेला खर्च
    11. अवजारे व इतर यंत्रसामग्री दुरुस्ती खर्च
    12. पीकविमा हप्ता
    13. वाढ नियंत्रके
    14. तणनाशके -
    15. खेळत्या भांडवलावरील व्याज (द. सा. द. से. १४ टक्के दराने)
    16. घसारा - शेतीउपयोगी हिस्सा, गोठा, अवजारे व यंत्राचा इ. घसारा (ओलीताखालील पिकासाठी ओलीताच्या साधनावरील घसारा)
    17.  शेतसारा
    18. खर्च अ (अ.क्र. १ ते १७ ची बेरीज)
    19. प्रचलित पद्धतीनुसार जमिनीचा खंड (एकूण उत्पनाच्या ६ वा हिस्सा वजा शेतसारा)
    20. स्थिर भांडवलावरील व्याज (१० टक्के दराने १ वर्षाकरिता)
    21. खर्च ब (खर्च अ + अ. क्र. १९ व २० ची बेरीज)
    22.  एकूण कौटुंबिक मजुरीवरील खर्च
    23. खर्च क (खर्च ब + अ. क्र. २२)
    24. उत्पन्न
    25. मुख्य उत्पन्न -------
    26. दुय्यम उत्पन्न-------
    27. एकूण उत्पन्न (अ + ब) -------
    28. प्रति क्विंटल उत्पन्न खर्च ---------

    विनोद वावधने, ९४२३७२४७९५ डॉ. राजेंद्र देशमुख, ८२७५३३११८९ (कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com