agricultural stories in Marathi, agrowon, FEROMONE TRAPS USE FOR CONTROL OF PINK BALLWORM | Agrowon

गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी गंधसापळे
डाॅ. ए. व्ही. कोल्हे, डाॅ. डी. बी.उंदिरवाडे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी विविध नियंत्रण पद्धतींचा वापर करणे आवश्‍यक असते. किडीच्या अवस्था व प्रादुर्भाव पातळीनुसार वापरण्यात येणाऱ्या या पद्धतीमध्ये गंधसापळ्याचा वापर अनिवार्य होतो. ही पद्धत तुलनेने कमी खर्चाची आहे.

पीक अवस्थेनुसार व किडींच्या प्रादुर्भाव पातळीनुसार एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा वापर केल्यास किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीखाली ठेवणे शक्य होते. या पद्धती एकमेकास पूरक असून, तुलनेने कमी खर्चाच्या असतात. यामुळे पर्यावरणासाठी हानीकारक ठरू शकणाऱ्या रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी ठेवणे शक्य होते.

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी विविध नियंत्रण पद्धतींचा वापर करणे आवश्‍यक असते. किडीच्या अवस्था व प्रादुर्भाव पातळीनुसार वापरण्यात येणाऱ्या या पद्धतीमध्ये गंधसापळ्याचा वापर अनिवार्य होतो. ही पद्धत तुलनेने कमी खर्चाची आहे.

पीक अवस्थेनुसार व किडींच्या प्रादुर्भाव पातळीनुसार एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा वापर केल्यास किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीखाली ठेवणे शक्य होते. या पद्धती एकमेकास पूरक असून, तुलनेने कमी खर्चाच्या असतात. यामुळे पर्यावरणासाठी हानीकारक ठरू शकणाऱ्या रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी ठेवणे शक्य होते.

कपाशीतील गुलाबी बोंड अळीच्या सर्वेक्षण आणि नियंत्रणासाठी फेरोमोन म्हणजेच कामगंध सापळे उपयुक्त ठरू शकतात. याद्वारे पतंगाची संख्या कमी होत असल्याने दीर्घकालीन नियंत्रण मिळू शकते.

गुलाबी बोंड अळीविषयी अधिक माहिती

 • गुलाबी बोंड अळीची एक पिढी २५ त ३५ दिवसांची असते.
 • विदर्भात कपाशीची पहिली पेरणी मे महिन्याच्या तिसरा ते चौथ्या आठवडयात, दुसरी पेरणी पुरेसा पाऊस आल्यानंतर जूनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात आणि उशिरा पेरणी जूलैच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवडयात होते. प्रत्येक पेरणीत ३ ते ४ आठवड्यांचा फरक असतो. उशिरा पक्व होणाऱ्या (१८० व त्यापेक्षा जास्त) वाणाच्या लागवडीमुळे पक हंगाम लांबतो. तसेच ओलिताखालील कपाशीची फेब्रुवारी ते मार्चपर्यत फरदड घेतली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड अळीला उपजीविकेसाठी निश्‍चित कालावधीनंतर ८ ते ९ महिन्यांपर्यंत नियमित अन्न उपलब्ध होते.
 • ही अळी प्रामुख्याने बोंडात उपजिविका करते. तिचा प्रादुर्भाव पीक परिपक्वतेमध्ये अधिक असतो. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या आपल्या वातावणात सर्वसाधारण ४ ते ६ पिढ्या होतात.
 • गुलाबी बोंड अळीचे पतंग हे रात्री सक्रीय असून मादीचा मिलन व अंडी देण्याचा काळ हा रात्री १२ ते ३ पर्यंत असतो. मार्गक्रमण करण्याची क्रिया प्राधान्याने रात्री ३ ते ६ च्या दरम्यान असते, तर दिवसा पतंग पानाखाली किंवा इतर ठिकाणी लपून बसतात.
 • सद्यस्थितीत रात्रीचा कालावधी हळूहळू वाढत आहे. तो पतंगाना उपजीविकेसाठी पोषक आहे.
 • गुलाबी बोंड अळीला दिवसाचे तापमान २९ ते ३१.५ अंश आणि रात्रीचे ११ ते १४.५ अंश सेल्सिअस पोषक असते. तसेच आर्द्रता कमाल ७१ ते ८० टक्के तर किमान २६ ते ३५ टक्के पूरक असते.
 • हे वातावरण आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सर्वसाधारणपणे असते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून पुढे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

फेरोमोन सापळा :
फेरोमोन सापळ्यांचे तीन भाग असतात. १ चाळी २. ल्युर (आमिश वडी) ३. झाकण.

चाळी ः सर्वप्रथम चाळीला गुंडाळलेले मेनकापड उघडा. मेनकापडाचा वरचा भाग चाळीच्या खालच्या बाजूस घट्ट बसवलेला असतो. खालचा उघडा भाग सोबत दिलेल्या रबराने बंद करून घ्या.

ल्युर/गंधगोळी/आमिष वडी ः हा सापळ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यातील गंधामुळेच नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होतात. नैसर्गिक मिलनाच्या प्रक्रियेमध्ये मादी पतंगाद्वारे हवेत सोडलेल्या गंधाकडे नर पतंग आकर्षित होतात. नेमका हाच गंध प्रयोगशाळेमधे तयार केला जातो. त्यापासून ल्युर तयार करून, त्याचा सापळ्यामध्ये वापर केला जातो.

झाकण : चाळीला वरून बसवण्यासाठी झाकण दिलेले असते. प्लॅस्टिकच्या वेस्टनामधील ल्युर स्वच्छ हाताने, कमीत कमी संपर्क होईल अशा पद्धतीने झाकणाखालील खोबणीत व्यवस्थित बसवावे. अस्वच्छ हाताने हाताळल्यास त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यासाठी रबरी हातमोजे वापरल्यास योग्य राहील. चाळी व झाकणामध्ये सभोवताल साधारण अर्धा ते पाऊन इंचाची फट असते. त्या फटीमधून नर पतंग आमिषाला धडकतात. चाळीतून मेनकापडामध्ये खाली पडून अडकतात.

फेरोमोन सापळयाचे कार्य

 • सापळ्यात बसवलेल्या ल्युरद्वारे हवेमधे गंध सोडला जातो. त्यातील रसायनाचे सामान्य तापमानात हळूहळू बाष्पिभवन होते. त्याची कार्यक्षमता सर्वसाधारण ५० मीटर व्यासाची असते. म्हणुनच हेक्टरी चार ते पाच कामगंध सापळ्याची शिफारस आहे.
 • ल्युरची कार्यक्षमता तीन ते सहा आठवडे असू शकते. ल्युरची मुदत शेतातील तापमानानुसार कमी जास्त होऊ शकते.
 • कामगंध रसायन किडीच्या प्रत्येक प्रजातीसाठी वेगवेगळे आहे.
 • उदा. गुलाबी बोंड अळीसाठी पेक्टीनोल्युर, हिरव्या बोंड अळीसाठी हेक्सॅल्युर, ठिपक्याच्या बोंड अळीसाठी इरव्हीटल्यूर.
 • वेगवेगळ्या प्रजातीसाठी कामगंध सापळेे लावायचे असल्यास, प्रथम एकाच प्रजातीचे सापळे लावून घ्यावेत. त्यानंतर दुसऱ्या कामगंध सापळ्यासाठी हात स्वच्छ धुवून, वेगळे हातमोजेे वापरावेत.
 • एकाच प्रकारच्या दोन फेरोमोन सापळ्यांमध्ये चौबाजूने किमान ५० मीटरचे अंतर ठेवावे.

फेरोमोन सापळ्यांचा वापर :
वर नमूद केल्या प्रमाणे गुलाबी बोंड अळ्यांच्या पिढया व पिकावरील त्यांची संख्या लक्षात घेता, पिकांमध्ये जुलै महिन्यापासुन ते पीक संपेपर्यंत लावणे आवश्‍यक आहे. कपाशीची वेचणी सुरू झाल्यापासून मे महिन्यापर्यंत कापूस संकलन केंद्रे, साठवणूक केंद्रे व जिनींग मिल्स येथेही कामगंध सापळे लावावेत. हंगाम संपल्यांनतर येथेही पुढील पिढ्या तयार होऊ शकतात.
कपाशीचे शेतात :

 • प्रत्येक कपाशी शेतकऱ्यांने गुलाबी बोंड अळीवर पाळत ठेवण्यासाठी हेक्टरी ५ फेरोमोन सापळे उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी लावावेत. ते पिकापेक्षा एक फूट उंच असावेत.
 • गुलाबी बोंड अळीसाठी गाॅसील्यूर लावाव्यात. त्यावरील सूचनेप्रमामणे विशिष्ट कालावधीनंतर गंधगोळ्या बदलाव्यात.
 • सापळ्यामध्ये जमा होणारे नर पतंग दररोज काढून मोजून नष्ट करावेेत. ते शक्य न झाल्यास निदान दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावेेत.
 • या सापळ्यामधे प्रत्येकी सरासरी ८ ते १० नर पतंग सतत दोन ते ३ दिवस आढळल्यास नियंत्रणाचे योग्य ते उपाय योजावेत.
 • गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी हेक्टरी २० फेरोमोन सापळे प्रामुख्याने पिक उगवणीनंतर ८० ते ९० दिवसांनी लावन पीक संपेपर्यंत ठेवावेेत.

कापूस संकलन, साठवणूक व प्रक्रिया केंद्रे :

 • येथे कापूस येण्यास सुरवात झाल्यापासून ते कापसाची पूर्ण विल्हेवाट होईपर्यंत फेरोमोन सापळे लावावेत.
 • प्रत्येक ठिकाणी १० ते १५ सापळे लावावीत. पतंग अडकण्याची संख्या, कापसाचे आवगमन व केंद्राची जागा यानुसार फेरोमोन सापळ्याची संख्या कमी जास्त करता येईल. सूचनेनुसार विषिष्ट कालावधत ल्युर बदलाव्यात. दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावेेत.
 • जिनींग/प्रकि्रिया होत असलेल्या परिसरामध्ये चाळणीतून वेगळ्या झालेल्या कवडी कापूस व अळ्या वेळोवेळी नष्ट कराव्यात. त्यातून पुढील पिढ्या तयार होणे टाळता येईल.
 • जिनींगमध्ये, संकलन किंवा साठवणूक केंद्रातील कापूस गंजी स्वरूपात ठेवून, त्यावर ताडपत्र्या झाकाव्यात. ते उघडे ठेवू नयेत.

डाॅ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
(कीटकशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...