agricultural stories in marathi, AGROWON, fertiliser management of Popat Suryawanshi | Agrowon

एकात्मिक व्यवस्थापनातून डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन
अभिजित डाके
मंगळवार, 26 जून 2018

शेतकरी ः पोपट सुखदेव सूर्यवंशी
गाव ः खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली.
पीक ः डाळिंब
क्षेत्र ः १३ एकर

शेतकरी ः पोपट सुखदेव सूर्यवंशी
गाव ः खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली.
पीक ः डाळिंब
क्षेत्र ः १३ एकर

आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे प्रमुख पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी तालुक्यातून सुमारे २०० शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यात केली आहे. आता युरोपला डाळिंबाची निर्यात करू लागले आहेत. याच तालुक्यातील पोपट सूर्यवंशी यांनी शेतात सातत्य ठेवून २००९ पासून डाळिंबाची निर्यात सुरू आहे. डाळिंब दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल साधावा लागतो. त्यासाठी दरवर्षी माती परीक्षण केले जाते. यातून जमिनीत कोणत्या अन्नघटकांची कमतरता आहे, याची माहिती मिळते. यासोबत खतांच्या शिफारशींचा विचार करून एकात्मिक खत व्यवस्थापन करण्यात येते.

 • डाळिंबाचे क्षेत्र : १३ एकर
 • एकूण झाडे : ५०००
 • दोन ओळींतील अंतर १२ फूट
 • दोन रोपांतील अंतर ६ फूट
 • जून ते जुलैच्या दरम्यान मृग बहर धरला जातो.
 • हंगाम संपल्यानंतर आणि सुरू होण्याआधी तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते. त्यानंतर महिन्यातून एकदा बोर्डो फवारणी करतात. झाडाच्या खोडाला बोर्डोची पेस्ट वर्षातून एकदा लावली जाते. ताणाचे अंतर ठेवून छाटणीनंतर महिन्यातून दोन वेळा बोर्डोची फवारणी करतात.
 • दरवर्षी एकदा माती परीक्षण करून घेतात. माती परीक्षणानुसार खतांची मात्रा दिली जाते. (प्रतिझाड प्रमाण अंदाजे) ५० किलो शेणखत, निंबोळी पेंड १ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये २५० ग्रॅम याप्रमाणे मात्रा दिली जाते. ७० ते ८० दिवसांनंतर रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. त्यानंतर डीएपी किंवा १०:२६:२६ प्रतिझाड ७० ग्रॅम दिले जाते. पुढे ऑक्टोबरमध्ये वरीलप्रमाणे खताचा डोस दिला जातो.
 • शेणखतावर अधिक भर असतो. त्यातही गोमुत्र आणि शेणखताच्या स्लरी महिन्यातून एकदा देतात. सेंद्रिय खतांच्या अधिक वापर केल्यामुळे तेल्या, बिब्या रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता वाढते. आच्छादन व सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची उष्णता वाढत नाही.
 • झाडाची प्रतिकारक्षमता नैसर्गिकरीत्या वाढते.
 • पाऊस आणि ढगाळ वातावरण झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाते. परिणामी दर्जेदार डाळिंब उत्पादन मिळते. बागेतून सर्वसाधारणपणे ३५० ते ७५० ग्रॅम वजनाची फळे मिळतात.
 • एकरी उत्पादन २३ टन असून, गेल्या वर्षी १२२ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला.

संपर्क ः पोपट सुखदेव सूर्यवंशी, ८८०५३४३१३१

इतर यशोगाथा
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...
कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...
पेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...
दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...
हुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...
संघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...
अभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...