agricultural stories in marathi, AGROWON, fertiliser management of shrikant patil, jalgaon | Agrowon

हिरवळीच्या खतांसोबत रासायनिक खतांचा संतुलित वापर
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 26 जून 2018

कठोरा (ता. जि. जळगाव) हे तापी नदीच्या काठावरील गाव असून, केळी हे प्रमुख पीक आहे. येथील श्रीकांत व पुरुषोत्तम पांडुरंग पाटील या दोघा बंधूंची २८ हेक्‍टर शेती आहे. ते केळीचे खत व्यवस्थापन करताना हिरवळीची खते, पाचट व पीक अवशेषाचे आच्छादन, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांची सांगड घालतात. यामुळे केळीचा घट २२ किलोपर्यंत मिळत असून, गेली अनेक वर्षे ही उत्पादकता टिकून आहे.

शेतकरी ः श्रीकांत व पुरुषोत्तम पांडुरंग पाटील
गाव ः कठोरा (ता. जि. जळगाव)
पीक ः केळी
एकूण क्षेत्र ः २८ हेक्टर

कठोरा (ता. जि. जळगाव) हे तापी नदीच्या काठावरील गाव असून, केळी हे प्रमुख पीक आहे. येथील श्रीकांत व पुरुषोत्तम पांडुरंग पाटील या दोघा बंधूंची २८ हेक्‍टर शेती आहे. ते केळीचे खत व्यवस्थापन करताना हिरवळीची खते, पाचट व पीक अवशेषाचे आच्छादन, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांची सांगड घालतात. यामुळे केळीचा घट २२ किलोपर्यंत मिळत असून, गेली अनेक वर्षे ही उत्पादकता टिकून आहे.

शेतकरी ः श्रीकांत व पुरुषोत्तम पांडुरंग पाटील
गाव ः कठोरा (ता. जि. जळगाव)
पीक ः केळी
एकूण क्षेत्र ः २८ हेक्टर

श्रीकांत यांनी कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी घेतली असून, ते पिकाची लागवड व खतांचे नियोजन पाहतात. दरवर्षी ४० - ४० हजार केळी खोडे लागवडीचे नियोजन असते. आगाप (अर्ली) कांदे बहार केळी ते घेतात. त्यांची काळी कसदार जमीन आहे. केळी लागवडीपूर्वी जमिनीत जूनमध्ये धैंचांची धूळपेरणी करतात. जुलैअखेर धैंचा ट्रॅक्‍टरच्या साह्याने जमिनीत गाडून घेतात. एकरी किमान तीन ट्रॉली शेणखत वापरतात. त्यावर ऑगस्टमध्ये केळीची लागवड करतात. लागवडीनंतर एक हजार खोडांना चार गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट टाकले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे दोन डोस संयुक्त खतांचे दिले जातात. यात निंबोळी पेंडचे प्रतिहजार रोपाला एक गोणी या प्रमाणात मिसळली जाते. पहिले तीन डोस मोकळ्या स्वरूपात झाडानजीक टाकले जातात. रासायनिक खते दिल्यानंतर लागलीच मिनी ट्रॅक्‍टरने त्यात हलकी आंतरमशागत केली जाते. यामुळे खतावर माती पडून, खतांचा कार्यक्षम वापर होण्यास अनुकूल स्थिती तयार होते. मग केळीची बांधणी झाल्यानंतर प्रतिहजारी झाड एक ट्रॉली या प्रमाणात उसाचे पाचट नैसर्गिक आच्छादन जमिनीवर टाकले जाते. यानंतर सर्व खते द्रव स्वरुपात व्हेंच्युरीने सोडली जातात. त्यात केळी निसवणीच्या वेळेस एक हजार झाडांना एक लीटर पीएसबी व एक लिटर ॲझेटोबॅक्‍टर सोडले जातात.

  • प्लॅस्टिक मल्‍चिंग करण्याचे टाळले जाते. कारण, पीक काढणीवेळी ते फाटते, गोळा करता येत नाही. प्लॅस्टिकचा कचरा शेतीमध्ये पसरून राहतो. प्रदूषण होते. त्या तुलनेत ऊस पाचटामुळे केळीच्या पांढऱ्या मुळांना संरक्षण मिळते. ओलावा टिकून राहतो. जळगावात उष्णता अधिक असते, या काळात या पाचट आच्छादनाचा चांगला आधार केळी पिकाला होत असल्याचे श्रीकांत सांगतात.
  • शेणखतासाठी दोन गायी व दोन म्हशी आणि दोन बैलजोड्यांचे संगोपन करतात.
  • केळीची ऑगस्टमध्ये कापणी सुरू होते, ती नोव्हेंबरपूर्वी १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असते. कापणी सुरू झाल्यानंतर खते दिली जात नाहीत.
  • चांगल्या व्यवस्थापनामुळे उत्तम दर्जाची केळी येते. त्यांच्या शेतातील केळी कंदांना मागणी असते. कापणी पूर्ण झाली की कंदांची विक्री सुरू होते. प्रतिकंद दोन ते तीन रुपये दर मिळतो. कंदांची विक्री आटोपल्यानंतर जे अवशेष शिल्लक राहतात, ते डीस्कहॅरो, रोटाव्हेटरने बारीक करून शेतात पसरवतात. रिकाम्या झालेल्या केळीच्या शेतात हरभरा, दादर (रब्बी ज्वारी) ही कमी सिंचनाची आवश्यकता असलेली पिके घेतात. ही पिके मार्चच्या अखेरीस हाती येतात. त्यानंतर उन्हाळ्यात शेत पलटी नांगरने नांगरून जूनपर्यंत तापू देतात. नंतर धैंचा पेरणीसाठी ते रोटाव्हेटरने भुसभुशीत केले जाते.

संपर्क ः श्रीकांत पाटील, ९९२३४१५४०२

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
कडवंची : हमखास मजुरी देणारं गावद्राक्षबागांमुळे कडवंची गावात बारमाही रोजगार तयार...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...