agricultural stories in Marathi, agrowon, flia beetal inciedence in grapes | Agrowon

द्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या
डॉ. विनायक शिंदे-पाटील
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा काळ असून, या काळात उडद्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.

पिसू भुंगेरा किंवा उडद्या
इंग्रजी नाव - फ्लिया बीटल
शास्त्रीय नाव - स्केलोडोंटा स्टरिगिकोल्लिस
गण - कोलिऑप्टेरा
कुळ - अ‍ॅल्टिसिडी व यूमोल्पिडी

द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा काळ असून, या काळात उडद्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.

पिसू भुंगेरा किंवा उडद्या
इंग्रजी नाव - फ्लिया बीटल
शास्त्रीय नाव - स्केलोडोंटा स्टरिगिकोल्लिस
गण - कोलिऑप्टेरा
कुळ - अ‍ॅल्टिसिडी व यूमोल्पिडी

भारतामध्ये नियमितपणे द्राक्ष उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भागामध्ये पिसू भुंगेरे किंवा उडद्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत आहे. पिसूसारखा आकार व उडी मारण्याची पद्धत यामुळे त्यांना 'पिसू भुंगेरे' असे संबोधले जाते. उडद्या भुंगेराचा रंग पिंगट, तांबे किंवा ब्रॉन्झ धातूसारखा असतो. आकार अत्यंत लहान, लंबवर्तुळाकार, बहिर्वक्र असून, त्यांच्या पंखावर ५-६ काळे तांबट ठिपके असतात. पाय लहान, केशविरहित असून पाठीमागील पायांची जोडी लांब असते. त्यामुळे उडी मारण्यास मदत होते.

जीवनचक्र

 • उडद्या भुंगेऱ्यांची मादी मार्च-ऑक्टोबर महिन्यांदरम्यान वेलीच्या खोडावरील सालीमध्ये पुंजक्यांच्या स्वरूपात (२०-४०) अंडी घालते. अंडी पांढऱ्या-पिवळ्या रंगाची, लांब निमुळती असतात. प्रत्येक मादी २५० ते ५०० अंडी घालते.
 • अंडी उबल्यानंतर ४-७ दिवसांमध्ये पिवळसर अळी बाहेर पडते. या अळ्या जमिनीमधील (१८ सें.मी. खोलीपर्यंत) मुळांचा शोध घेऊन मुळावरील साल खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळीचे दात टणक, सुरकुतलेले असतात. त्यांचा रंग निमपारदर्शक पांढरा असतो. अळी अवस्था ३०-४० दिवसांची असते.
 • कोषावस्था ७-१० दिवसांची असते.
 • प्रौढ भुंगेरा ८-१२ महीने पाने खाऊन जिवंत राहतो. प्रौढ भुंगेरे वर्षभर दिसून येत असले तरी त्यांची नुकसान करण्याची कार्यशक्ती ही वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळी असते. हे भुंगेरे डिसेंबर ते मार्चपर्यंत सालीखाली सुप्तावस्थेत राहतात.
 • वाढती सापेक्ष आर्द्रता व तापमान तसेच सकाळची वेळ या किडीच्या वाढ़ीकरिता अतिशय पोषक असते.
 • संपूर्ण जीवनचक्र ५०-७५ दिवसांमध्ये पूर्ण होते.

नुकसान
एप्रिल-ऑक्टोबर छाटणीच्या वेळी साधारणतः या किडीचे प्रमाण जास्त असते. ही कीड सकाळी-संध्याकाळी व रात्रीच्या वेळी नवीन येणाऱ्या कोवळ्या फुटीवर अगदी तुटून पडते. डोळ्यातून फुटणारे बारीक कोंब, बाळ्या, कोवळी फूट, पाने तसेच घड खातात. नवीन फूट वाळते, गळते. पानांवर गोल-लंबोळी छिद्रे पडतात. प्रादुर्भाव अधिक असल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. मुळ्यावर अळ्या उदरनिर्वाह करतात. त्यामुळे वेलीची पाने पिवळी होतात, गळतात. या किडीच्या प्रादुर्भावाने द्राक्ष बागेचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची नोंद आहे.

एकात्मिक नियंत्रण
मशागतीय पद्धत

 • अळ्या व कोष सूर्यप्रकाशामध्ये येण्याकरिता वेळोवेळी जमीन चाळून घ्यावी.
 • छाटणी दरम्यान बाग स्वच्छ ठेवावी. बोदावर गवत वाढू देऊ नये. खाली पडलेली, वाळलेली पाने गोळा करून बागेबाहेर नष्ट करावीत.
 • ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीच्या खोडावरील व ओलांड्यावरील सुटलेली साल काढून घ्यावी.

जैविक पद्धत

 • उडद्या भुंगेऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता कोषांची संख्या कमी करावी लागते. याकरिता बागेला पाणी द्यावे.
 • जमिनीमध्ये जैविक नियंत्रणासाठी सूत्रकृमी (ईपीएन), हेट्रोरेबीडीटिस इंडिकस यांचे ड्रेंचिग करावे. त्यानंतर पुन्हा परत बागेला पाणी द्यावे.

रासायनिक पद्धत
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार कीडनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०
(सहायक प्राध्यापक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, नगर.)

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...