agricultural stories in Marathi, agrowon, Fruit crop advice for cold | Agrowon

थंडीपासून फळबागेचे संरक्षण
डॉ. कैलास डाखोरे, प्रमोद शिंदे, डॉ. विनोद शिंदे
सोमवार, 7 जानेवारी 2019

सध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे. त्याचा परिणाम फळपिकांवर होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

डाळिंब

 • अति थंडीमुळे डाळिंबाची पाने जळतात, फळे तडकतात.
 • बागेला मोकाट सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
 • जेथे बागेमध्ये बहर धरलेला आहे आणि फळवाढीची अवस्था आहे तेथे पहाटेच्या वेळेस धूर करावा.
 • बागेतील तोडलेल्या फांद्यांचे अवशेष, कचरा जाळून नष्ट करावा.

संत्रा, मोसंबी

सध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे. त्याचा परिणाम फळपिकांवर होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

डाळिंब

 • अति थंडीमुळे डाळिंबाची पाने जळतात, फळे तडकतात.
 • बागेला मोकाट सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
 • जेथे बागेमध्ये बहर धरलेला आहे आणि फळवाढीची अवस्था आहे तेथे पहाटेच्या वेळेस धूर करावा.
 • बागेतील तोडलेल्या फांद्यांचे अवशेष, कचरा जाळून नष्ट करावा.

संत्रा, मोसंबी

 • थंडीमुळे मृग बहर धरलेल्या बागेत फळांची वाढ थांबली आहे. या काळात उपाययोजना म्हणून १३ः००ः४५  हे १० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 • थंडीच्या काळात फळझाडांना पहाटेच्या वेळेस बांगडी पद्धतीने पाणी द्यावे.
 • फळबागेत तसेच बांधावर रात्री शेकोटी पेटवून धूर करावा.

  द्राक्ष

 •  थंडीच्या काळात मुळांच्या परिसरात पाण्याचा ताण पडणारा नाही, अशा रीतीने ठिबक सिंचनाने वेळोवेळी पाणी द्यावे.
 •  किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास मुरमाड ते मध्यम जमीन असल्यास दोन वेलींमधील ओळीत मोकाट पद्धतीने पाणी द्यावे. म्हणजे त्या ठिकाणीही जमिनीतील थंड हवा कमी होऊन तेथे पाणी राहील.
 •  वेलीच्या दोन ओळींमधील जमिनीला भेगा पडलेल्या असल्यास हलकी मशागत करून त्या बुजवून घ्याव्यात. यामुळे जमिनीत मुळांपर्यंत थंड हवा जाणार नाही, मुळांना इजा होणार नाही.
 •  थंड हवा बागेत शिरून बागेचे तापमान कमी होऊ नये याकरिता बागेच्या कडेने बारदान किंवा जास्त गेजचे शेडनेट लावावे. यामुळेही बागेतील हवामान उबदार राहण्यास मदत होते.
 • घडाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी पेपर लावावा.

केळी

 • थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या कंदाच्या उगवणीला उशीर होतो, उतिसंवर्धित रोपे लावलेली असल्यास वाढ खुंटते, मुळांची संख्या व लांबी खुंटते, अन्न व पाणी शोषण करण्याच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
 • केळीची वाढ खुंटते, घड निसवण्यास उशीर लागतो, पाने पिवळी पडतात.

उपाय

 • थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. शक्यतो रात्री ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
 • बाग तसेच बांधावर ठिकठिकाणी रात्री शेकोटी पेटवून धूर करावा. यामुळे बागेतील वातावरणात उष्णता वाढते.
 • थंड वा­ऱ्यापासून संरक्षणासाठी बागेभोवती शेडनेट, ताटी किंवा बारदानाचे कुंपण करावे.
 • निसवलेल्या बागेतील घडांवर स्कर्टिंग बॅग लावावी.
 • नवीन कांदे बागेस प्रति झाड बुंध्याभोवती रिंग पद्धतीने २०० ग्रॅम, तर मृग बागेस प्रतिझाड ५०० ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी.
 • जुन्या कांदेबागेतील फळवाढीच्या अवस्थेतेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा २ ते ६ टक्के सच्छिद्रतेच्या १०० गेज जाडीच्या पांढ­ऱ्या प्लॅस्टिक पिशवीने झाकावेत.
 • थंडी लाटेच्या काळात बागेमध्ये १९:१९:१९ हे खत २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल.

 : डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५  
: डॉ.विनोद शिंदे, ९९७०२२८३४५

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर फळबाग
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
थंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....
थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...
भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...
नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...
मोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे...  मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ...
निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...
डाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...
पेरू बागेत फळमाशीचा प्रादुर्भावसध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत...
रुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....
केळी सल्ला : थंडीचा परिणामसद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...