फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे व्यवस्थापन

फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे व्यवस्थापन
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे व्यवस्थापन

शास्त्रीय नाव ःOthreis fullonia

  • फळातील रस शोषक पतंग आकाराने मोठे व आकर्षक रंगाचे असतात. त्याची मादी साधारणपणे ८०० ते ९०० अंडी घालते. २ ते ३ दिवसात अंडी पूर्णपणे उबवल्यानंतर त्यातून पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. १२ ते १६ दिवसांत अळीची पूर्ण वाढ होऊन ती कोष अवस्थेमध्ये जाते. ही कोषावस्था वेलीवरच १० ते १५ दिवसांत पूर्ण होऊन, त्यातून पतंग बाहेर पडतात.
  • साधारणत: दिवस मावळल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत पतंग बागेमध्ये नुकसान करतात. हे पतंग पूर्ण वाढ न झालेल्या तसेच पिकलेल्या फळांना आपल्या सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून त्यातील रस शोषतात. कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार लालसर डाग दिसून येतो. येथून फळ सडते. गळून पडते.
  • नियंत्रणाचे उपाय

  • या पतंगाच्या अळीचे पोषण प्रामुख्याने वासनवेल, चांदवेल व गुळवेल इ. वनस्पतीवर होते. बागेतील व बागेलगतच्या माळरानामध्ये असलेल्या या वनस्पती नष्ट कराव्यात. रात्रीच्या वेळेस बागेत तीव्र झोताचे टॉर्च लावल्यास पतंग सुस्त होतात. असे पतंग पकडून त्वरित नष्ट करावेत.
  • सायंकाळी बागेमध्ये धूर करावा. तसेच पिकलेली केळी किंवा टरबूज बागेमध्ये ठेवल्यास त्याकडे पतंग आकर्षित होतात. असे पतंग पकडून नष्ट करावेत. फळांना कागदी किंवा कापडी पिशवीने झाकावे. तसेच बागेमध्ये शकय असल्यास सर्व झाडे ०.५ सें.मी. मेश पेक्षा कमी छिद्रांच्या नायलॅान जाळीने झाकावेत.  जमिनीवर पडलेली प्रादुर्भाव ग्रस्त फळे ताबडतोब जमा करून जमिनीत खड्डा करून पुरून टाकावेत.
  • पतंगाना आकर्षित करून मारण्यासाठी विषारी अमिष ः मॅलाथिऑन (५०  ई. सी.) २० मिली अधिक १०० ग्रॅम गूळ अधिक ६ ग्रॅम व्हिनेगार अधिक १०० ते २०० मिली फळांचा रस प्रतिलिटर पाणी.
  • हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये १०० ते २०० मिली या प्रमाणात घ्यावे. त्यावर शक्य असल्यास सीएफएलचा बल्ब लावून ठेवावा. त्यामुळे प्रकाशाकडे आकर्षित होऊन अधिक पतंग सापळ्यात पडून मरतील. असे सापळे ८ ते १० झाडांच्या अंतरावर झाडांना बाहेरील बाजुस टांगून ठेवावेत.
  •  ः  डॉ. धीरज कदम, ९४२१६२१९१०  ः  विवेक सवडे ,  ९६७३११३३८३ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com