agricultural stories in Marathi, agrowon, grape growers annual meeting, Govind Hande about grape export | Agrowon

तरुणांनो, मार्केटिंग आणि निर्यातीवर भर द्या ः गोविंद हांडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बालेवाडी, जि. पुणे (विशेष प्रतिनिधी) : तरुण शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविले आहे. त्यात वाढ होण्यासाठी मार्केटिंग आणि निर्यातीवर भर द्या, असे आवाहन शेतमाल आयात निर्यात सल्लागार डॉ. गोविंद हांडे यांनी केले. राज्य द्राक्ष अधिवेशनात शुक्रवारी (ता. २४) आयोजित ‘द्राक्ष निर्यातीच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

बालेवाडी, जि. पुणे (विशेष प्रतिनिधी) : तरुण शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविले आहे. त्यात वाढ होण्यासाठी मार्केटिंग आणि निर्यातीवर भर द्या, असे आवाहन शेतमाल आयात निर्यात सल्लागार डॉ. गोविंद हांडे यांनी केले. राज्य द्राक्ष अधिवेशनात शुक्रवारी (ता. २४) आयोजित ‘द्राक्ष निर्यातीच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

श्री. हांडे म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचे स्वरूपही बदलले आहे. तरुण शेतकऱ्यांनी हे बदल स्विकारीत उत्पादनात क्रांती केली आहे. येत्या काळात शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच पिकाचे मार्केटिंग व निर्यात यावर लक्ष केंद्रीत करावे ही काळाची गरजही आहे. यात वाढत्या संधीही आहेत.

  • रशिया, थायलंड, सिंगापूर, चीन या बाजारातही ट्रेसिबिलीटीची मागणी होत आहे. परराज्यातही विक्रीसाठी पणन मंडळाकडून अनुदान मिळत आहे.
  • ‘रेसिड्यू फ्री उत्पादन करणारे राज्य’ हा ब्रॅण्ड विकसित करायचा आहे. १६ प्रयोगशाळांपैकी ४ महाराष्ट्रात आहेत. आपण जीआय नामांकन मिळवले आहेत. येत्या काळात पीजीआय मिळणे आवश्‍यक आहे.
  • अन्नसुरक्षेचे मानक पाळून येत्या काळात जागरुकपणे उत्पादन घेणे गरजेचे आहे. ‘ग्रो सेफ फूड’ ही मोहीम केंद्र शासन सगळीकडे राबवित आहेत. देशांतर्गत बाजारातही याची गरज आहे. त्याला जोडून जमिनीचे आरोग्यावरही भर दिला पाहिजे. पॅकिंगमध्ये आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत.
  • ग्रेपनेटअंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. आधारकार्डसारखीच आपल्या उत्पादनाची आयडेंटी ग्रेपनेटच्या नोंदणीतून मिळते. निर्यात नोंदणीची १ सप्टेंबरपासून मोहीम सुरू होत आहे.
  • माल चांगला असला तरी त्याची हमी देता आली पाहिजे. त्यासाठी डॉक्‍युमेंटेशन आवश्‍यक आहे. ऍगमार्क, ग्रेपनेट यांतून विश्‍वासार्हता दिसते. ट्रेसेबिलीटी ही बंधनकारक आहे. त्याच्या आत आपण पुढाकार घेतला पाहिजे. यावर्षीपासून द्राक्ष निर्यात नोंदणीसाठी ऑनलाइनवर भर देण्यात आला आहे. अपेडाने त्यासाठी `फार्म रजिस्ट्रेशन' हे ॲपही विकसित केले आहे. यासाठी केवळ ५० रुपये शुल्क आहे. दरवर्षी नूतनीकरण करण्यापेक्षा हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी लागू असेल. यावर्षी द्राक्ष निर्यातीसाठी १ लाख नोंदणीचा लक्ष्यांक ठेवला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यात सहभागी व्हावे असेही त्यांनी सांगितले.

रेसिड्यू रिपोर्ट मिळावा ऑनलाइन
रेसिड्यू रिपोर्ट हा निर्यातदारांकडून तत्काळ उत्पादकांना मिळणे बंधनकारक आहे. मात्र, काही निर्यातदार त्याबाबत पारदर्शकता दाखवत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात यावी. द्राक्ष उत्पादकांना त्याच्या उत्पादनाचा रिपोर्ट त्यातून मिळावा, अशी मागणीही `अपेडा'कडे करण्यात आली असल्याचे हांडे यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...