agricultural stories in Marathi, agrowon, grape growers annual meeting, Kobas Bathama about soil fertility management | Agrowon

मातीच्या आरोग्याला प्राधान्य द्या : कोबस बोथमा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बालेवाडी, जि. पुणे (विशेष प्रतिनिधी) : माती हीच चांगल्या पिकाचा पाया आहे. त्यातूनच चांगले द्राक्ष उत्पादन शक्‍य आहे. माती झाडाला पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये पुरवते. तेच झाडाच्या वाढीला, शाकीय वाढ, फळांचे उत्पादन गुणवत्ता यांत मातीची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्यासाठी मातीच्या आरोग्याला प्राधान्य द्या, असे आवाहन दक्षिण अफ्रिकेतील कृषितज्ज्ञ कोबस बोथमा यांनी केले. द्राक्ष अधिवेशनात शुक्रवारी (ता. २४) त्यांनी ‘मातीची सुपीकता आणि पाणी व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कोबस बोथमा यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे :

बालेवाडी, जि. पुणे (विशेष प्रतिनिधी) : माती हीच चांगल्या पिकाचा पाया आहे. त्यातूनच चांगले द्राक्ष उत्पादन शक्‍य आहे. माती झाडाला पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये पुरवते. तेच झाडाच्या वाढीला, शाकीय वाढ, फळांचे उत्पादन गुणवत्ता यांत मातीची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्यासाठी मातीच्या आरोग्याला प्राधान्य द्या, असे आवाहन दक्षिण अफ्रिकेतील कृषितज्ज्ञ कोबस बोथमा यांनी केले. द्राक्ष अधिवेशनात शुक्रवारी (ता. २४) त्यांनी ‘मातीची सुपीकता आणि पाणी व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कोबस बोथमा यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे :

  • माती बनायला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा ४० पट अधिक वेगाने तिची धूप होत आहे. मातीच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
  • कोणत्याही पिकाचा पाया मातीवरच अवलंबून आहे. माती झाडाला पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये पुरवते. झाडाच्या वाढीला, शाकीय वाढ, फळांचे उत्पादन गुणवत्ता यांत मातीची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.
  • मातीच्या संरचना : भौतिक, रासायनिक आणि जैविक हे भाग आहेत. रासायनिक भागात पोषक अन्नद्रव्ये, जैविक भागात सेंद्रिय पदार्थ, जैवविविधता आहे.
  • चुकीच्या पद्धतीने सिंचन केल्याने माती खराब होते.
  • आपण रासायनिक घटकांच्या मातीचे पोषणमूल्य वाढवता येते. तसेच, अधिक वापराने ते खराबही होऊ शकते. अधिक खतामुळे जिवाणू, गांडूळे यांना हानी पोचू शकते.
  • जैविक घटकांच्या वाढीसाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात होणे गरजेचे आहे.
  • भौतिक गुणधर्म : जमिनीच्या आत मुळांची वाढ, निचरा, खेळती हवा, ओलावा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पोषक अन्नद्रव्ये देण्याची क्षमता ही मातीच्या भौतिक गुणधर्मावर ठरते. मातीच्या जैविक आणि रासायनिक घटकांचा आणि खडकाळ, पोत, भूसभुशीतपणा, मातीची पाणी आणि धरून ठेवण्याची क्षमता यांचा जवळचा संबंध असतो. वाण कोणते आहेत, त्यापेक्षा जमिनीची खोली किती आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातून मुळे वाढण्यास पुरेशी जागा मिळत असते.
  • नवीन लागवडीपूर्वी एकदा जमिनीची खोलवर मशागत करून जमीन मोकळी करून घेणे आवश्‍यक आहे.

(अनुवाद -अभिजित कांचन)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...