ढगाळ वातावरणात जैविक नियंत्रकांचा वापर शक्य

ढगाळ वातावरणात जैविक नियंत्रकांचा वापर शक्य
ढगाळ वातावरणात जैविक नियंत्रकांचा वापर शक्य

आठवडाभर ढगाळ वातावरण राहून अधूनमधून रिमझिम पाऊस बहुतांश सर्व द्राक्ष विभागामध्ये मिळेल. नाशिक विभागामध्ये शनिवार -रविवार (ता. १, २) किंवा बुधवार (ता. ५) या काळात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सोडल्यास सर्वत्र फक्त ढगाळ वातावरणच राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये रिमझिम पाऊस सुरू असून, अधून मधून थोडासा सूर्यप्रकाशही मिळत आहे.

असे वातावरण असल्यास नवीन फुटी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. या नवीन फुटीवर भुरी, तांबेरा, करपा या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शक्य असल्यास वाढणाऱ्या फुटीची वाढ थांबवण्यासाठी खुडणी करून घ्यावी. लवकर छाटणी झालेल्या बागांमध्ये बऱ्यापैकी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरण ढगाळ राहत असल्यामुळे भुरीपासून नवीन फुटींचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सल्फर (८० टक्के डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात चांगल्या रीतीने फवारल्यास फायद्याचे होऊ शकेल. छाटणी न झालेल्या बागांमध्ये ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर झालेला नसल्यास किंवा ट्रायअझोल वर्गातील बुरशीनाशके वापरलेली नसल्यास जैविक नियंत्रणासाठी योग्य जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य आहे. बागेमध्ये रसशोषक किडीसाठी बिव्हेरीया बॅसियाना किंवा मेटारायझीम तर भुरीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा अॅम्पिलोमायसीस यांची ४ ते ५ मिलि प्रति लिटर किंवा एक किलो प्रति एकर या प्रमाणे कॅनोपिमध्ये फवारावे. हे जैविक नियंत्रण घटक या वातावरणामध्ये चांगले काम करू शकतात.                   संपर्क ः ०२०-२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com