agricultural stories in Marathi, agrowon, Grapes Advice | Agrowon

डाउनी, भुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या...
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सर्वसाधारण सर्वच द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये कोठेही पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी म्हणजेच सांगली, पुण्याच्या जवळपासच्या विभागामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ राहील. सर्वच विभागांंमध्ये पुढील चार ते पाच दिवस तरी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर आणि ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. फक्त पुण्याजवळचा भाग म्हणजे यवत, रोहू, श्रीगोंदा, पारगाव, इंदापूर, बोरी आणि बारामती या भागामध्ये अनपेक्षितपणे कमाल तापमान १६ ते १७ तारखेनंतर ३० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. याच विभागामध्ये इतर विभागांच्या प्रमाणामध्ये जास्त आर्द्रता राहण्याची शक्यता आहे.

सर्वसाधारण सर्वच द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये कोठेही पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी म्हणजेच सांगली, पुण्याच्या जवळपासच्या विभागामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ राहील. सर्वच विभागांंमध्ये पुढील चार ते पाच दिवस तरी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर आणि ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. फक्त पुण्याजवळचा भाग म्हणजे यवत, रोहू, श्रीगोंदा, पारगाव, इंदापूर, बोरी आणि बारामती या भागामध्ये अनपेक्षितपणे कमाल तापमान १६ ते १७ तारखेनंतर ३० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. याच विभागामध्ये इतर विभागांच्या प्रमाणामध्ये जास्त आर्द्रता राहण्याची शक्यता आहे. सकाळी पडणाऱ्या दवाकडे या विभागातील शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.

  • छाटलेल्या बागांच्यामध्ये नवीन फुटी येण्यास सुरवात झाल्यास रोगाचा विशेष धोका कोठेही नाही. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहण्याची शक्यता असल्याने दव पडणे फारसे अपेक्षित नाही. अशा परिस्थितीमध्ये नवीन रोग येण्याची शक्यता फारशी दिसत नाही; परंतु ज्या विभागामध्ये मागील काही दिवसांमध्ये हलका पाऊस झाला असेल आणि छाटणीनंतर फुटलेल्या बागांच्या जवळपास न छाटलेल्या बागा असल्यास नवीन फुटींना डाउनीचा धोका थोड्या प्रमाणात निश्‍चित राहील.
  • विशेषतः ज्या बागांमध्ये ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता दिसून आली असल्यास नवीन फुटींवर सकाळी हलके दव पडू शकते. त्यामुळे डाउनीचा धोका वाढू शकतो. असा ठिकाणी मात्र डायथायोकार्बामेट गटातील बुरशीनाशके (मॅंकोझेब किंवा प्रॉपीनेब किंवा मेटीराम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) दोन ते तीन दिवसांच्या अंतराने एक दोन वेळा निश्‍चित फवारावीत. त्यामुळे डाउनीचे चांगले नियंत्रण मिळू शकेल.  
  • इंदापूर, बोरी, बारामती जवळपासच्या भागामध्ये सकाळची आर्द्रता जास्त आहे. सध्या कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असले तरीसुद्धा पुढील काही दिवसांत (१७-१८ तारखेनंतर) ते ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता दिसते. या विभागात छाटण्या जास्त प्रमाणात झालेल्या आहेत. या विभागातील बागायतदारांनी नवीन फुटी डाउनीपासून चांगल्या सुरक्षित ठेवणे आवश्‍यक आहे. फक्त बाह्यस्पर्शी बुरशीनाशकाच्या फवारणीने संपूर्णपणे डाउनीचे नियंत्रण मिळणे कदाचित शक्य होणार नाही. ज्या बागांमध्ये पाच ते सहा पानांच्या पुढील कॅनॉपी आहे अशा ठिकाणी कमी आर्द्रतेचे वातावरण पाहून दुपारच्या वेळेस सीएए गटातील बुरशीनाशकांची  (डायमेथोमॉर्फ १ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी टॅंक मिक्स किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपिनेब हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी घेऊन आंतरप्रवाही बुरशीनाशक चांगल्या रितीने आंतरप्रवाही होईल याची खात्री करून घ्यावी. जेणेकरून पाचव्या पानानंतर येणारा घड डाउनीपासून चांगल्या रितीने सुरक्षित राहील.
  • अलीकडे छाटलेल्या बागांच्यामध्ये फुटी येण्याअाधीच सल्फर (८० डब्लूजी) दिड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास काडीच्या पृष्ठभागावर असलेल्या भुरीचे नियंत्रण होते.  विशेषतः बागेमध्ये छाटणीअगोदर भुरीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी दिसला होता त्या ठिकाणी अशाप्रकारची सल्फरची फवारणी भुरीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने निश्‍चितच फायदेशीर ठरेल. ज्या ठिकाणी वातावरण अधूनमधून ढगाळ राहिल्याचे दिसल्यास सल्फरची फवारणी जरूर घ्यावी.

०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन
केंद्र, मांजरी, जि. पुणे)

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...