agricultural stories in Marathi, agrowon, Grapes Advice | Agrowon

ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात भुरीची शक्यता अधिक
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके पाऊस मिळाल्याची सूचना आहे. अशा प्रकारचे पाऊस येत्या आठवड्यामध्ये पुणे, सांगली व सोलापूर भागातील एखाद-दोन ठिकाणी आज गुरुवार (ता. १८) नंतर सोमवार (ता. २२) पर्यंत होण्याची शक्यता आहे. पुढे बुधवारी (ता.२४) सोलापूरच्या जवळपासच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता दिसते. सर्वच भागांमध्ये २२ तारखेपर्यंत निश्चितपणे अधूनमधून ढगाळ वातावरण राहणार आहे.

सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके पाऊस मिळाल्याची सूचना आहे. अशा प्रकारचे पाऊस येत्या आठवड्यामध्ये पुणे, सांगली व सोलापूर भागातील एखाद-दोन ठिकाणी आज गुरुवार (ता. १८) नंतर सोमवार (ता. २२) पर्यंत होण्याची शक्यता आहे. पुढे बुधवारी (ता.२४) सोलापूरच्या जवळपासच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता दिसते. सर्वच भागांमध्ये २२ तारखेपर्यंत निश्चितपणे अधूनमधून ढगाळ वातावरण राहणार आहे.

  • नाशिक विभागामध्ये शनिवार, रविवार (ता. २०, २१) वगळता पावसाची शक्यता कमी आहे.
  • पुणे विभागामध्ये जुन्नर, बोरी, यवत, पाटस, बारामती या भागांमध्ये २० ते २२ तारखेपर्यंत हलक्या पावसाच्या एक दोन सरी मिळू शकतील.
  • सांगली विभागामध्ये कवठेमहांकाळ, खानापूर, पळशी, विटा, तासगाव या पट्ट्यामध्ये ता. १८ ते २१ व नंतर २६ तारखेच्या आसपास पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. मिरज भागामध्ये कालच्या पावसाच्या नंतर २५ तारखेपर्यंत पावसाची शक्यता दिसत नाही.
  • सोलापूर विभागामध्ये सर्वच भागांमध्ये अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे. नानज, काटी, कारी, उस्मानाबाद, तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये २१ ते २६ तारखेपर्यंत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.

उपाययोजना ः

  • ढगाळ वातावरण आणि पाऊस या दोन्ही वातावरणामध्ये सर्वच भागामध्ये अजूनही भुरीची शक्यता जास्त दिसते. छाटल्यानंतर काड्याच्या पृष्ठभागावर राहिलेल्या भुरीचे बिजाणू व भुरीच्या अवशेषातून भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अलीकडेच छाटलेल्या बागांमध्ये फूट बाहेर निघण्याच्या आधी सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारून घ्यावे. या फवारणीमुळे भुरीची लागण नवीन फुटीवर लवकर होणार नाही.
  • बऱ्याचशा बागा पोंगा अवस्थेमध्ये असतील. पोंगा अवस्थेतील बागांमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्याची घाई करू नये. हलका पाऊस भागामध्ये झालेला असला तरीही जास्त आर्द्रता व सकाळचे दव जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत डाऊनीचा धोका जास्त नाही. पोंगा अवस्थेमध्ये डायथायोकार्बोमेट वर्गातील बुरशीनाशक ( मॅन्कोझेब किंवा प्रोपीनेब किंवा मेटीराम, प्रमाण ः२ ग्रॅम प्रति लिटर) फवारावे.
  • तीन पाने अवस्था आल्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या फवारणीची जरूरी असते. सकाळचे दव जास्त पडत असले तरच डाऊनी मिल्ड्यूचा धोका असतो. तीन पाने अवस्थेमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यात डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रोपीनेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर यांचा वापर करावा.
  • काही ठिकाणी मोठे पाऊस झाले आहेत. अशा बागांमध्ये पाणी साठलेले असल्यास त त्याचा निचरा करण्याकडे जास्त लक्ष द्यावे. पाऊस सगळीकडे पडत नसल्यामुळे वातावरणातील आर्द्रता जास्त वाढत नाही. बागेत पाण्यचा चांगला निचरा व खेळती हवा नसल्यास आर्द्रता वाढते, त्यामुळे रोगाचा धोका वाढतो. बागेमध्ये आर्द्रता न वाढू दिल्यास रोगाचा धोका आपोआप कमी होतो. म्हणूनच फवारणीपेक्षा बागेतील निचरा आणि हवा खेळती राखण्याकडे लक्ष द्या.

संपर्क ः ०२० -२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...