agricultural stories in Marathi, agrowon, GRAPES ADVICE | Agrowon

ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी, पिंक बेरीपासून संरक्षण आवश्यक
डॉ. एस. डी. सावंत
शनिवार, 26 जानेवारी 2019

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये बहुतांश द्राक्ष विभागामध्ये वातावरण पुन्हा ढगाळ होण्याची शक्यता आहे. सांगलीच्या कवठे महांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज या भागामध्ये शुक्रवारी (ता. २७) हलका पाऊस एक दोन ठिकाणी होण्याची शक्यता दिसते. बाकी अन्य विभागांमध्ये पावसाची फारशी शक्यता दिसत नाही.

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये बहुतांश द्राक्ष विभागामध्ये वातावरण पुन्हा ढगाळ होण्याची शक्यता आहे. सांगलीच्या कवठे महांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज या भागामध्ये शुक्रवारी (ता. २७) हलका पाऊस एक दोन ठिकाणी होण्याची शक्यता दिसते. बाकी अन्य विभागांमध्ये पावसाची फारशी शक्यता दिसत नाही.

नाशिक भागामध्ये शनिवार रविवारनंतर वातावरण जास्त ढगाळ होण्याची शक्यता आहे. या काळात रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. या वाढलेल्या थंडीमुळे रात्री व दिवसाच्या तापमानातील फरक वाढतो, त्यामुळे थॉम्सन सीडलेस व त्याचे क्लोन असलेल्या जातींमध्ये मण्यांत पाणी भरण्यास सुरवात झाल्याच्या अवस्थेमध्ये पिंक बेरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक घडावर पेपर लावल्यास पिंक बेरीची समस्या राहत नाही. या वर्षी सुरवातीपासून आलेल्या जास्त थंडीमुळे मण्यात पाणी भरण्याची स्थिती येण्यास उशीर झाला असेल, तरीही येत्या शुक्रवार-शनिवारच्या आधी घडावर पेपर लावण्याचे काम प्राधान्याने करून घ्यावे.

ढगाळ वातावरणामध्ये भुरीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असते. बागेत भुरीचे थोडेही लक्षण दिसत असल्यास भुरीच्या नियंत्रणासाठी योग्य फवारणी करणे आवश्यक आहे.
- यासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे चांगल्या प्रकारे कव्हरेज होईल, असे फवारून घ्यावे. त्यापाठोपाठ जैविक नियंत्रणासाठी अॅम्पिलोमायसीस ८ ते १० मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात जरूर फवारावे. सल्फर हे बाह्यस्पर्शी असल्यामुळे त्याच्या कव्हरेजकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

  • ज्या ठिकाणी फवारणीचे सल्फर पोचत नाही, तिथे भुरीचा प्रादुर्भाव होणे शक्य असते. म्हणूनच सल्फरच्या फवारणीपाठोपाठ जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त अशा बुरशी किंवा जिवाणूंची फवारणी केल्यास जिथे सल्फर पोचत नाही, तिथे जैविक नियंत्रणाचे घटक पोचू शकतात. परिणामी भुरीचे नियंत्रण चांगले मिळते. ज्या ज्या ठिकाणी सल्फरचाच वापर सुरवातीपासून झालेला आहे, त्या ठिकाणी जैविक नियंत्रण घटकांचा उपयोग करणे आवश्यक आहे.
  • सोलापूर, सांगली विभागातील बऱ्याचशा ठिकाणी तापमानामध्ये वाढ होत आहे. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे. परिणामी सापेक्ष आर्द्रता कमी होत आहे. अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा किंवा बॅसीलस सबटिलीस या जिवाणूजन्य घटकांच्या फवारण्या भुरीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतील.
  • नाशिक सारख्या भागामध्ये जेथे पुन्हा थंडी वाढत आहे, अशा ठिकाणी अॅम्पीलोमायसीस चांगले काम करू शकते.
  • मण्यांवर कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. थंडीमुळे होणारे मण्यांचे क्रॅकिंग कमी होईल. त्याच बरोबरच जैविक नियंत्रणासाठी वापरलेले घटक चांगल्या प्रकारे काम करू शकतील.
  • वर सुचवलेल्या सर्व फवारण्या घडांवर पेपर चढवण्याआधी करणे आवश्यक आहेत.
     

इतर फळबाग
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने...सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत...
फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्यासध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम...
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म...द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू...
द्राक्ष : नवीन वाढ करण्यासाठी आवश्यक...द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत १३०... राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हिंगोली...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
सुपीक जमीन, नियोजनातून वाढविली...हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल...
द्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...
थंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...
वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...
केळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...
आंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...
संत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...
गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे...वादळी पाऊस आणि गारपीटच्या माऱ्यामुळे संत्रा /...
डाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...