agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice, | Agrowon

वातावरणातील बदलत्या स्थितीकडे लक्ष ठेवावे
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नाशिक विभागामध्ये पाऊस व गारा पडण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. मात्र, हवामानाचे अंदाज वेळोवेळी बदलत असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या महत्त्वाच्या द्राक्ष विभागात म्हणजेच दिंडोरी, निफाड तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता फारशी दिसत नाही.

नाशिक विभागामध्ये पाऊस व गारा पडण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. मात्र, हवामानाचे अंदाज वेळोवेळी बदलत असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या महत्त्वाच्या द्राक्ष विभागात म्हणजेच दिंडोरी, निफाड तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता फारशी दिसत नाही.

शुक्रवार-शनिवार (ता. २३ -२४) दरम्यान या विभागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या उत्तरेकडे सटाणा, मालेगाव, व आणखी उत्तरेकडे कदाचित हलक्या पावसाची शक्यता असेल. बाकीच्या द्राक्ष उत्पादक विभागामध्ये पुणे, सोलापूर, नगर, सांगली येथे कुठेही येत्या सात दिवसांत तरी पावसाची शक्यता दिसत नाही. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील येवला व त्याच्या पुढील भागामध्ये रिमझिम पावसाची शक्यता दिसते.

  • सर्वच द्राक्ष विभागांमध्ये पाऊस व गारपीट येणार असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आमच्या वर दिलेल्या अंदाजानुसार जरी पावसाची शक्यता नसल्याचे नमूद केले असले, तरी वातावरणातील प्रत्येक दिवशी होणाऱ्या बदलानुसार योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सध्याच्या उपलब्ध हवामान माहितीनुसार होणाऱ्या ढगाळ वातावरणामध्ये फक्त भुरी रोगाच्या प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
  • फळे काढणीला आलेले असताना मण्यांत पाणी भरल्यानंतरच्या काळात फवारणी झालेली नसल्यास घडावरील भुरीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
  • काढणीला सात दिवसांपेक्षा जास्त वेळ असल्यास सल्फर व त्याहून कमी दिवस असल्यास जैविक नियंत्रक घटक बॅसिलस सबटिलिस यांची फवारणी योग्य राहील. त्याने भुरीचे नियंत्रण चांगले होऊ शकेल.
  • सध्याच्या वातावरणामध्ये तापमान ३२ ते ३५ अंशांपर्यंत वाढत आहे. सापेक्ष आर्द्रताही वेगाने कमी होत आहे. अशा स्थितीमध्ये केवळ ढगाळ वातावरणामध्ये भुरीची फारशी भीती राहणार नाही. अशा वातावरणामध्ये फक्त सामू (पीएच) अधिक असलेल्या पाण्याची फवारणी झाली, तरी भुरी नियंत्रणात राहू शकते. काही ठिकाणी रिमझिम किंवा हलका पाऊस झाला, तरच भुरी वाढण्याची शक्यता आहे. अशाच परिस्थितीमध्ये वर नमूद केलेल्या फवारणीचा विचार करावा.
  • हलक्या पावसानंतर वेलीमध्ये पाण्याचे जास्त शोषण होऊन मणी तडकण्याचे प्रमाण वाढते. ते कमी करण्यासाठी कायटोसॅन फवारल्यास मदत होऊ शकेल. कायटोसॅन फक्त देशांतर्गत विक्रीच्या द्राक्षामध्ये पाऊस आला तरच वापरावे.

संपर्क ः ०२०-२६९५६००१
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...