agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon

हलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत स्थितीनुसार करा उपाययोजना
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 5 एप्रिल 2018

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण निश्चित राहणार आहे. बहुतांश द्राक्ष विभागामध्ये ७ आणि ८ तारखेला हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढे १५ एप्रिलनंतर पुन्हा सर्व विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण निश्चित राहणार आहे. बहुतांश द्राक्ष विभागामध्ये ७ आणि ८ तारखेला हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढे १५ एप्रिलनंतर पुन्हा सर्व विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

  •  नाशिकमध्ये सर्वसाधारणपणे दक्षिण भागामध्ये (निफाड व सिन्नर) जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
  •  सोलापूरच्या सर्व द्राक्ष उत्पादक भागामध्ये म्हणजेच नानज, काटी, कारी, वैराग, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
  •  सांगली भागामध्ये कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, विटा, तासगाव, पलूस व वाळवा येथे ७ व ८ तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे.
  •  पुण्यामध्ये नारायणगाव, जुन्नर भागामध्ये जास्त प्रमाणात, तर यवत भागामध्ये कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे. बारामती भागामध्ये ८ तारखेला पावसाची शक्यता आहे. 

हवामानाच्या वरील संभाव्य स्थितीमध्ये द्राक्ष बागांमध्ये पुढील प्रकारे परिणाम होतील.

1) काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या द्राक्षबागा
वरील विभागातील काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्या बागांमध्ये छाटणी करून घ्यावी. येणाऱ्या दिवसांमध्ये पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि त्यानंतर वाढणारी आर्द्रता आणि तापमानात घट होण्याची शक्यता या सर्व गोष्टीमुळे नवीन छाटलेल्या बागांमध्ये फुटी लवकर येण्यास मदत होईल. विशेषतः सोलापूर व जवळपासच्या भागामध्ये छाटणीनंतर कडक उन्हे व जास्त तापमानामुळे फुटी उशिरा निघतात. येथे ओलांडे जास्त दिवस उन्हामध्ये राहिल्यास नुकसान होऊ शकते. असे ओलांडे मृत लाकडासारखे टणक होऊ शकतात. संभाव्य वातावरणाच्या अंदाजानुसार राहणारे ढगाळ वातावरण, कमी तापमान व पावसामुळे वाढणारी आर्द्रता छाटलेल्या काड्यांना लवकर फुटी येण्यास मदत करू शकेल. म्हणूनच शक्य असलेल्या सर्व ठिकाणी लवकरात लवकर छाटण्या घेण्याचे नियोजन करावे. त्याचा फायदा होऊ शकेल.

2) काढणी अद्यापही न संपलेल्या बागा
अद्यापही द्राक्षांची काढणी संपलेली नाही, अशा ठिकाणी मात्र बागेतील फळांना इजा पोचू शकेल. सांगली भागामध्ये सध्या वातावरण निरभ्र असल्यामुळे पहाटेचे तापमान बऱ्याच अंशी कमी राहत आहे. विशेषतः जिथे बागेमध्ये पाणी दिलेले आहे, अशा ठिकाणी सकाळच्या वेळी धुकेही दिसत आहे. अशा वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी फळांमध्ये सूक्ष्म क्रॅकिंगही पाहण्यास मिळते. थोड्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा निर्माण होईल, तसेच सकाळच्या व दुपारच्या तापमानातील अंतरही कमी होऊ शकेल. अशा ठिकाणी क्रॅकिंगचे प्रकार जास्त होणार नाहीत. मात्र, पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास क्रॅकींग वाढू शकते. घडांवर पाणी पडल्याने फळांची काढणीनंतरची टिकवण क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये काढणीनंतरची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
    पाऊस येण्याआधी (ता. ७ पूर्वी) बागेमध्ये कायटोसॅन २ ते ३ मि.लि. फवारल्यास अगोदरच क्रॅकिंग झालेल्या मण्यामध्ये कूज सहजासहजी होणार नाही. पावसामुळे नव्याने जास्त क्रॅकिंग होण्याची शक्यता कमी होईल. त्याच बरोबर ढगाळ वातावरणामुळे देठावरील भुरी वाढू शकते, त्याचेही नियंत्रण होईल.
    निर्यातीसाठीच्या द्राक्षामध्ये कायटोसॅनचा वापर टाळावा. अशा बागामध्ये बॅसिलस सबटिलिस १ ते २ मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास देठावरील भुरीपासून घडाचे संरक्षण होईल.

 डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...