agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon

द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची फारशी शक्यता नाही
डॉ. एस. डी. .सावंत
गुरुवार, 24 मे 2018
सर्व द्राक्ष विभागांमध्ये सोमवारपर्यंत अधूनमधून फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सांगलीच्या काही भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी नाशिकच्या दक्षिणेकडील भागात पावसाची शक्यता आहे. हा अपवाद वगळता सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या बुधवारपर्यंत वातावरण उष्ण राहील. ज्या ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तिथे दुपारचे तापमान कमी (३७ ते ३९ अंशांपर्यंत) होईल.
सर्व द्राक्ष विभागांमध्ये सोमवारपर्यंत अधूनमधून फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सांगलीच्या काही भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी नाशिकच्या दक्षिणेकडील भागात पावसाची शक्यता आहे. हा अपवाद वगळता सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या बुधवारपर्यंत वातावरण उष्ण राहील. ज्या ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तिथे दुपारचे तापमान कमी (३७ ते ३९ अंशांपर्यंत) होईल. अशा वातावरणामध्ये मागील काही दिवसानंतरच्या पावसानंतरसुद्धा कोणत्याही रोगांच्या वाढण्याची शक्यता दिसत नाही. खालील दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

१) काही भागामध्ये गारपिटीमुळे पाने फाटली, हिरव्या काडीवर जखमा झाल्याचे दिसून येत आहे. हिरव्या काडीवरील जखमा काही उपाययोजनेशिवायही भरून येतील. तो तसा काळजीचा विषय नाही. फाटलेली पाने किंवा झालेल्या जखमांमधून जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडिया सारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. अशा बुरशांची वाढ होऊ नये म्हणून कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात मिसळून फवारावे.

२) गरम हवामानामध्ये ऑक्झिन्स अधिक प्रमाणात बनतात. ऑक्झिन्स जास्त वाढल्यामुळे केवळ शेंडा वाढण्याऐवजी सर्वच बगलफुटी अधिक वाढू लागतात. काही ठिकाणी जास्त वाढ झाल्याने गाठीही बनतात. या सर्व फुटी व गाठी या कवकुवत असल्याने वाऱ्याने तुटतात किंवा पिचकतात. याला बहुतांशी लोक रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव समजतात. मात्र, हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. तापमान ढगाळ वातावावरणामुळे कमी झाल्यास ते आपोआप सुधारेल. बहुतांशी ठिकाणी नवीन लागवडीच्या बागेमध्ये ही समस्या जास्त दिसते. दुपारच्या वेळी अशा झाडांमध्ये पाणी फवारल्यास दुपारच्या तीव्र तापमानापासून झाडांचे संरक्षण करता येईल.
जुन्या बागेमध्ये दोन ओळीमध्ये सावलीसाठी शेडनेट लावलेले असते. ते तसेच ठेवल्यास त्याचाही उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी फायदा होईल.

 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...