agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon

द्राक्ष बागेत रोग नियंत्रणाबरोबरच फलधारणा वाढविण्याकडे लक्ष द्यावे
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 7 जून 2018

येत्या सोमवार-मंगळवार (ता. ११ व १२) पर्यंत सर्व द्राक्ष विभागांमध्ये अधूनमधून पावसाळी वातावरण, हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस, बहुतांश ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

येत्या सोमवार-मंगळवार (ता. ११ व १२) पर्यंत सर्व द्राक्ष विभागांमध्ये अधूनमधून पावसाळी वातावरण, हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस, बहुतांश ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

अशा वातावरणामध्ये सर्वसाधारणपणे भुरीचा धोका जास्त असतो. भुरीच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने सल्फरचा वापर करावा. सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पानांवर सर्व भागांपर्यंत चांगले कव्हरेज मिळेल असे फवारावे. संपूर्ण बाग धुवून काढण्याऐवजी वापरलेले सल्फर पानांच्या सर्व भागामध्ये पोचून डिपॉजिट होण्यासाठी प्रयत्न करावा. जास्त डिपॉजिट मिळण्यासाठी फवारणी करताना जास्त पाण्याचा वापर करण्यापेक्षा नोझलमधून निघणारे तुषार व पाण्याच्या थेंबाचा (ड्रॉपलेट) आकार लहान ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे. फवारलेले सल्फर पानांच्या सर्व भागात पसरून सुकून अधिक काळ राहील. फक्त ट्रायअझोल गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरून सध्याच्या वातावरणामध्ये भुरीचे संपूर्ण नियंत्रण मिळणार नाही. ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके वापरल्यानंतर भुरी काही काळ कमी झाल्यासारखे जाणवेल. मात्र ती संपूर्ण मरत नसल्याने काही दिवसातच वाढू शकेल. भुरी संपूर्णपणे मारण्यासाठी व नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे दिलेल्या सल्फरच्या फवारण्या जास्त महत्त्वाच्या आहेत.

छाटणीनंतर ४५ ते ६० दिवसांमध्ये सुप्त डोळ्यामध्ये फलधारणा होत असते. या फळधारणेसाठी सबकेन करणे, नत्राची मात्रा कमी करणे, फॉस्फरस वाढवणे, युरॅसिल फवारणे इ. गोष्टी प्रचलित आहेत. परंतू जोपर्यंत अशावेळी पाण्याचा ताण झाडावर मिळत नाही, तोपर्यंत फलधारणा होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत नाही. अशा परिस्थितीमध्ये झाडाची जीएची मात्रा कमी करून सायटोकायनिन वाढणे अतिशय महत्त्वाचे असते. मुळामध्ये पाणी भरपूर असल्यास साहजिकपणे नत्र वाढते. त्यामुळे फलधारणा चांगली होत नाही. अशा परिस्थितीमध्ये फलधारणेसाठी पूर्वी सीसीसी चा (क्लोरमेक्वाट क्लोराईड) वापर होत असे. त्याचे उर्वरित अंश काढणीपर्यंत फळामध्ये राहू शकतात, त्यामुळे क्लोरमेक्वाट क्लोराईडचा वापर टाळण्याचे सांगितले जाते. अशा स्थितीमध्ये फळधारणा वाढण्यासाठी काय करावे, असा प्रश्न असतो. येत्या आठवड्यामध्ये अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे अशी स्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीमध्ये ट्रायअझोल गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणासाठी एक दोन वेळा वापरल्यास भुरीच्या नियंत्रणाबरोबरच फलधारणा वाढवण्यासाठी उपयोग होतो. या बुरशीनाशकांचा वापर झाल्यास शेंडा थांबतो, वाढ मंदावते व झाडामध्ये असलेल्या जीएचे प्रमाण काही काळ कमी होते. त्यामुळे सुप्त डोळ्यामध्ये फलधारणा होण्यास मदत होते.

ज्या ज्या बागेमध्ये शेंडा चालू आहे, तिथे करपा वाढण्याची शक्यता आहे. करपा रोगाच्या नियत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर किंवा थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम प्रति लिटर अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रमाणात मिसळून फवारावे. कार्बन्डाझिम व थायोफिनेट मिथाईल दोन्ही बुरशीनाशकांमध्ये एमबीसी (मिथाईल बेंझिमिड्यॅझोल कार्बामेट) हा घटक असतो. या घटक सायटोकायनिनसारखा आहे. परिणामी ही बुरशीनाशके वापरल्यानंतर त्वरीत पाने ताजी हिरवीगार होतात. फलधारणा वाढण्यासाठीसुद्धा झाडामध्ये सायटोकायनिन वाढणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून ही बुरशीनाशके उपयोगी आहेत, याची नोंद घ्यावी.

काही दिवस सलग पाऊस झाल्यास कमाल तापमान ३० अंशांपेक्षा खाली जाण्याची बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे. अशा वेळेस द्राक्षबागेत डाऊनी मिल्ड्यू येण्याची शक्यता असते. खोडावर असलेल्या फुटी किंवा वायरवरून खाली लोंबणाऱ्या फांद्यावर सर्वसाधारणपणे पहिल्यांदा डाऊनी येतो. अशा प्रकारची जमिनीजवळ असलेली पाने किंवा काड्या काढून घ्याव्यात, त्यामुळे डाऊनी बागेमध्ये लवकर येत नाही. ज्या बागेमध्ये शेंडा चालू असेल, अशा बागेमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी फोसेटिल एएल २ ग्रॅम किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड २ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब दोन ग्रॅम मिसळून फवारावे.

संपर्क ः ०२०-२६९५६००१
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...