agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice, powdery mildew in grape vineyard | Agrowon

भुरीच्या वाढण्याची शक्यता, नियंत्रणाकडे लक्ष द्यावे
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

गेल्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.

गेल्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.

  • नाशिक, पुणे विभागांमध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण वगळता पावसाची शक्यता जवळजवळ नाही.
  • सांगली भागामध्ये कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, पाचगाव, माळवा या भागांमध्ये येत्या रविवारी व त्यानंतर एक-दोन दिवस वातावरण ढगाळ होईल. अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे.
  • सोलापूर विभागामध्ये सोलापूर, नान्नज, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, तांदुळवाडी, होटगी, अक्कलकोट व जवळपासच्या भागामध्ये वातावरण ढगाळ होऊन, रविवार ते बुधवारपर्यंत रिमझिम किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.
  • तापमान सर्वच भागामध्ये दुपारी ३०-३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील, तर पहाटेचे तापमान १५-१८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. वरील वातावरणाचा अंदाजानुसार ज्या ठिकाणी ढगाळ व पावसाचा अंदाज आहे, अशा ठिकाणी भुरी वाढण्याची शक्यता दिसते. त्याच्या नियंत्रणासाठी मागील आठवड्यामध्ये सुचवल्याप्रमाणे सल्फर (८० डब्ल्यूजी) ५०० ते ८०० ग्रॅम प्रतिएकर फवारावे.
  • नुकतीच सल्फरची फवारणी झालेली असल्यास ट्रायकोडर्मा किंवा बॅसीलस सबटिलिस हे जैविक नियंत्रक घटक भुरीच्या नियंत्रणासाठी फवारावे. या वर्षीच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये झालेल्या सर्व प्रात्यक्षिकांमध्ये ज्या ठिकाणी फळधारणेनंतर सल्फर आणि जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, अॅम्पिलोमायसीस, बॅसिलस सबटिलीस फवारलेले होते, त्या ठिकाणी आज भुरी चांगल्या प्रकारे नियंत्रित झालेली दिसते.
  • सध्याच्या वातावरणामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी कटाक्षाने टाळावी.
  • नाशिक, पुणे विभागातील ढगाळ वातावरण राहणार असले तरी पावसाची शक्यता नाही. अशा वेळी भुरीसाठी करावयाच्या फवारण्या शेतकऱ्यांनी घडावर कागद चढवण्यापूर्वी करून घ्याव्यात.
     

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...