गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवड

गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवड
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवड

भुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे गादीवाफे तयार करून त्यावर पेरणी करावी. गादीवाफे तयार करताना तळा रुंदी एक मीटर आणि वरची रुंदी ७० सें.मी. ठेवावी. प्रत्येक गादीवाफ्यावर तीन ओळीत लागवड करावी. उन्हाळी भुईमुगासाठी मध्यम खोल, चांगली निचरा होणारी, सेंद्रिय खतांचे चांगले प्रमाण असलेली जमीन निवडावी. भारी आणि चिकण मातीच्या जमिनी वाळल्यास कडक होतात, आऱ्या जमिनीत सुलभतेने जाऊ शकत नाहीत. काढणीच्या वेळी जास्त शेंगा जमिनीत रहातात.

बीज प्रक्रिया ः

  • पेरणीसाठी शेंगा फोडून झाल्यावर बियाण्यास थायरम ५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलोप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
  • पेरणीपूर्वी पाच तास अगोदर प्रति दहा किलो बियाण्यास रायझोबीयम २५० ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम यांची बीज प्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.
  • पेरणीचे नियोजन ः

  • सुरवातीला जमिनीत पुरेसे पाणी देऊन वापश्यावर पेरणी करावी.
  • पेरणीसाठी २.५ ते ३ मीटर रुंद आणि जमिनीच्या उतारानुसार ३० ते ५० मीटर लांबीचे सारे पाडावेत.
  • गादीवाफ्यावर पेरणी ः एक मीटर रुंदीचे गादीवाफे तयार करून त्यावर पेरणी करावी. गादीवाफे तयार करताना तळाची रुंदी एक मीटर आणि वरची रुंदी ७० सें.मी. ठेवावी. प्रत्येक गादीवाफ्यावर तीन ओळीत लागवड करावी.
  • माती परीक्षणानुसार शिफारशीत मात्रेमध्ये खते पेरून द्यावीत. एका ठिकाणी एकाच बियाण्याची टोकण करावी. पेरणी पाच ते सहा सें.मी. अंतरावर करावी.
  • पहिले ४५ दिवस पीक तण विरहित ठेवावे. खुरपणी, कोळपणी करून तण नियंत्रण करावे. शेवटच्या कोळपणीपूर्वी जिप्समची शिफारशीत मात्रा द्यावी.
  • रासायनिक खतमात्रा ः

  • माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा ठरवावी.
  • प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र (५५ किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४०० किलो जिप्सम द्यावे. या खतमात्रेपैकी संपूर्ण युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि अर्धे जिप्सम पेरणी करताना द्यावे. राहिलेले २०० किलो जिप्सम पेरणीनंतर ४० दिवसांनी शेवटच्या कोळपणीपूर्वी द्यावे.
  • जिप्सममुळे कॅल्शियम (२८ टक्के) आणि गंधक ( १८.६ टक्के) हे अन्नघटक पिकाला मिळतात. कॅल्शिअममुळे शेंगा चांगल्या भरतात. दाण्यांचा उतारा वाढतो. कॅल्शिअमची कमतरता असल्यास शेंगांचा पोकळपणा वाढतो.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये ः

  • भुईमुगासाठी जस्त, लोह आणि बोरॉन ही सूक्ष्मअन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत.
  • जस्ताची कमतरता असल्यास पेररुंणीपूर्वी २० किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी तीन वर्षांतून एकदा द्यावे.
  • लोहाच्या कमतरतेमुळे कोवळ्या पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो. पिकाची वाढ संथगतीने होते. मुळांवरील गाठींची संख्या कमी होते. लोहाची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी १० किलो फेरस सल्फेट जमिनीत मिसळून द्यावे.
  • बोरॉनच्या कमतरतेमुळे शेंगांच्या दोन दलातील पोकळी वाढते. दाण्याची योग्य वाढ होत नाही. यासाठी माती परीक्षणानुसार तीन वर्षांतून एकदा प्रति हेक्टरी चार किलो बोरॅक्स पावडर जमिनीतून द्यावी.
  • संपर्क ः डॉ. डी. के. कठमाळे, ९४०५२६७०६१ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com