agricultural stories in Marathi, agrowon, groundnut sucking pests managementt | Agrowon

उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे नियंत्रण
डाॅ. ए. व्ही. कोल्हे, डाॅ. डी. बी. उंदिरवाडे
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या अवस्थेमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. विविध किडींमुळे १०-३० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. किडीचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आढळल्यास खालील उपाययोजना कराव्यात.

मावा

प्रौढ व पिल्ले झाडाच्या कोवळे शेंडे आणि पानांमध्ये प्रौढ आणि पिल्ले रसशोषण करतात. त्यामुळे पाने मुडपली जातात व झाडांची वाढ खुंटते. या किडींमुळे विषाणूजन्य रोगांचाही प्रसार होतो.

उपाययोजना :

उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या अवस्थेमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. विविध किडींमुळे १०-३० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. किडीचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आढळल्यास खालील उपाययोजना कराव्यात.

मावा

प्रौढ व पिल्ले झाडाच्या कोवळे शेंडे आणि पानांमध्ये प्रौढ आणि पिल्ले रसशोषण करतात. त्यामुळे पाने मुडपली जातात व झाडांची वाढ खुंटते. या किडींमुळे विषाणूजन्य रोगांचाही प्रसार होतो.

उपाययोजना :

 • लेडी बर्ड बिटल, क्रायसोपा, सिरफिड माशी इ. परभक्षी मित्रकिटकांचे संरक्षण करावे.
 • फवारणी प्रति लिटर पाणी
  निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.ली. किंवा
  इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२ ते ०.२५ मि.ली.

तुडतुडे

हिरवट रंगाचे तुडतुडे पानाच्या पुष्ठभागावर राहून पेशीतील रस शोषतात. त्यामुळे पानाच्या शिरा पांढुरक्या होऊन चकाकतात. प्रादुर्भावग्रस्त झाडे पिवळसर रंगाची दिसतात.

उपाययोजना

 • कातणी व लायजासीड ढेकूण यांचे संरक्षण करावे.
 • चवळी, सोयाबीन आणि एरंडी ही सापळयाची पिके भुईमुगाच्या शेताच्या भोवती लावावीत.
 • आर्थिक नुकसान पातळी ः सरासरी झाडावर १.५ ते २ तुडतुडे किंवा २० पानावर ३ तुडतुडे.
 • आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
  इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के) ०.२ ते ०.२५ मिली किंवा
  लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.४ ते ०.६ मिली किंवा
  क्विनाॅलफाॅस (२५ टक्के प्रवाही) १.४ ते २.८  मि.ली.

पांढरी माशी

प्रौढ व पिल्ले पानाचे मागील बाजूस राहून पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी, मलूल होऊन गळतात.
उपाययोजना :
पिवळ्या चिकट सापळयांचा वापर करावा. पीक ४० दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. परभक्षक व परोपजीवी किटकांचे संरक्षण करावे.

फुलकिडे

फुलकिडे हे पिवळसर किंवा काळपट रंगाचे सूक्ष्म आकाराचे व लांबोळके असतात. त्याची पिल्ले व प्रौढ पानांच्या पृष्ठभागावर खरवडतात, त्यामधून स्त्रवणारा द्रवाचे शोषण करतात. परिणामी पाने पिवळी पडतात. पानाच्या कडा वरच्या बाजूने मुडपल्या जातात. पानावर हिरवट रंगाचे चट्टे पडतात. प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असल्यास झाडाची वाढ खुंटते  आणि पाने वाळून जातात.

उपाययोजना

 • जास्त तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असल्सास फूलकिड्यांची संख्या वाढते.
 • ओरियस मॅग्झीडेरेग्झ, ओरियस टॅंटिलस, लायस एग्झटेनोनेटलस, सिम्नस नुबीलीस व क्रायसोपा हे मित्रकिटक फुलकिड्यांचे भक्षक आहेत. त्यांचे संवर्धन करावे.
 • मका हे आंतरपीक म्हणून घेतल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 • पेरणीपासून ४० दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.
 • आर्थिक नुकसान पातळी  ः ५ फुलकिडे प्रति शेंडा.
 • या आर्थिक नुकसान संकेत पातळीपेक्षा अधिक प्रादुर्भाव आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
  निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा
  लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.४ ते ०.६ मि.ली किंवा
  क्विनालफाॅस (२५ टक्के प्रवाही) २.८  मि.ली.

 ः डाॅ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
(किटकशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
लागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
लागवड उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
मोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...
तंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...
आरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...
सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापनएकात्मिक कीड व्यवस्थापन पिकाच्या...
सोयाबीनवर दिसतोय खोडमाशीचा प्रादुर्भावराज्यामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत...
रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणीसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही...
सोयाबीन उत्पादनवाढीची सप्तसूत्रेसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची...
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
करडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसितभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच...
कृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...
कृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...