वांग्यावरील फळे, शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

वांग्यावरील फळे, शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
वांग्यावरील फळे, शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

 शा. नाव - Leucinodes orbonalis Guen. किडीची ओळख :

  • या किडींचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी व पिंगट ठिपके असतात.
  • अळ्या गुलाबी रंगाच्या असतात.
  • वर्षाकाठी किडीच्या आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात.
  • फळ आणि शेंडा पोखरणारी कीड सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते.
  • योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत जावू शकते.
  • नुकसानीचा प्रकार:

  • शेंडा आणि फळे पोखरणारी अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यांत, फुलांत किंवा फळांत शिरून उपजीविका करते.
  • अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी पानाच्या मुख्य शिरेतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात.
  • पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात.
  • लहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडले आहे की नाही, हे कळणे अवघड असते. अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.
  • आर्थिक नुकसान पातळी : ५ टक्के शेंड्यांचे किंवा फळाचे नुकसान

    एकात्मिक कीड व्यवस्थापन : 

  • कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास काढून नष्ट करावीत.
  • पीक फुलोऱ्यावर यायच्या अगोदर एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. सापळे शेतात पिकाच्या उंचीच्या वर लावावेत. यातील कामगंधाकडे किडीचे नर पतंग आकर्षित होऊन अडकतात. त्यांचे मिलन होत नाही. परिणामी पुढील पिढी निर्माण होण्यात अडथळे येतात.
  • प्रकाश सापळा प्रती एकर क्षेत्रात एक लावावा.
  • जैविक कीड नियंत्रणासाठी, ट्रायकोग्रामा चिलोनीस प्रजातीचे ट्रायकोकार्ड ४-५ प्रती हेक्टरी लावावेत.
  • बी. टी. जिवाणूवर आधारित कीटकनाशक १० ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ३ मि.ली. प्रती लिटर पाणी - लागवडीनंतर १५ दिवसांनी फवारणी करावी.
  • सिंथेटिक पायरेथ्रॉईडस् वर्गातील कीटकनाशकांचा वापर टाळावा.
  • या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ असल्यास, फवारणी प्रती लिटर

  • क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १ मि.ली. किंवा
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.  ४ ग्रॅम किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) १ मि.ली. किंवा
  • पायरीप्रोक्झीफेन (५ ईसी) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ ईसी) (संयुक्त कीटकनाशक) १  ते १.२ मि.ली.
  • या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रती लिटर पाणी
  • थायोक्लोप्रीड (२१.७ एससी) ०.१५ मि.ली. किंवा
  • थायोडिकार्ब (७५ डब्लूपी) १ ते २ ग्रॅम किंवा
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल ( १८.५ एससी) ०. ४ मि.ली.
  • टीप : वरील कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी त्यांचे एमआरएल, पीएचआय तपासून घ्यावेत. आवश्यकता भासल्यास त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.

     ः डॉ. दादासाहेब पोखरकर- ९९२३७३५००२  ः डॉ. पंकजकुमार पाटील- ७५८८९२११९६ (कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com