तंत्र करडई लागवडीचे

तंत्र करडई लागवडीचे
तंत्र करडई लागवडीचे

करडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड करावी. कोरडवाहू करडर्ईची लागवड १० ऑक्टोबरपर्यंत आणि बागायती लागवड ३० ऑक्टोबरपर्यंत करावी. लागवडीसाठी सुधारित जातींची निवड करावी. करडर्ईची मुळे पाच फूट खोल जात असल्यामुळे जमिनीतल्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये आणि ओलाव्याचा उपयोग करून घेतला जातो. अवर्षणात तग धरणारे हे पीक आहे. एक पाणी देण्याची सोय असेल; तर करडर्ई आणि हरभरा ही आंतरपीक पद्धत जास्तच फायद्याची दिसून आली आहे.

  1. कोरडवाहू करडर्ईची पेरणी १० ऑक्टोबरपर्यंत करावी. बागायती पेरणी ३० ऑक्टोबरपर्यंत करावी.
  2. पेरणी दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात १५ ते २० सें.मी. अंतर ठेवावे.
  3. एकरी ५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. त्यानंतर ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा तसेच २५ ग्रॅम पीएसबी, २५ ग्रॅम अॅझेटोबॅक्टर बियाणास प्रक्रियाकरून सावलीत सुकवून पेरणी करावी.
  4. एकरी ५० किलो युरीया, २५ किलो सुपर फॉस्फेट ही खत मात्रा द्यावा.
  5. करडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये करडर्ई, हरभरा लागवड केली असल्यास दोन्ही पिकांना शिफारस केलेली स्फुरदाची मात्रा शंभर टक्के द्यावी. १०० किलो सुपर फॉस्फेट आणि ५० किलो युरिया अशी खतमात्रा द्यावी.
  6. ३० ते ३५ दिवसांनी पहिले आणि ५० ते ६० दिवसांनी दुसरे संरक्षित पाणी दिले असता उत्पादनात वाढ मिळते.
  7. सुधारित जातींचा वापर केल्यास शिफारशीप्रमाणे खतमात्रा दिल्यास करडर्ई आणि हरभरा या आंतरपिकाचा अवलंब केल्यास १९ ते ५० टक्के करडर्ईच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.

जातींची निवड ः

  1. फुले - कुसुमा ः ही जात हमखास पावसाच्या प्रदेशासाठी चांगली आहे. कोरडवाहूमध्ये एकरी ७ ते ९ क्विंटल आणि बागायतीमध्ये १२ ते १३ क्विंटल उत्पादन. तेलाचे प्रमाण २८ ते २६ टक्के.
  2. एस.एस. ६५८ ः ही बिगर काटेरी जात, एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन. तेलाचे प्रमाण २७ ते २८ टक्के.
  3. फुले चंद्रभागा (एस.एस.एफ. ७४८) ः १२५ ते १४० दिवसांत तयार होते. जिरायती १३-१६ क्विंटल आणि बागायतीमध्ये २०-२५ क्विंटल प्रतिएकरी उत्पादन. कोरडवाहू आणि बागायतीसाठी उत्तम, काटेरी वाण, माव्यास मध्यम प्रतिकारक.
  4. ए.के.एस.-२०७ ः १२५ ते १३५ दिवसात तयार होते. एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन. माव्यास मध्यम प्रतिकारक.
  5. नारी -६ ः १३० ते १३५ दिवसात तयार होते. एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन. बिगर काटेरी, पाकळ्यांसाठी उपयुक्त जात. संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास लागवडीस चांगली.

संपर्क ः ०२१७-२३७३०४७ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com