agricultural stories in Marathi, agrowon, Layer Poultry yashkatah, Farmer Shashikant Tisage, nashik | Agrowon

काटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत बसवला जम
ज्ञानेश उगले
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

व्यवसायाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय कोणत्याही व्यवसायात यश मिळत नाही. वजीरखेडे (जि. नाशिक) येथील शशिकांत आणि रमाकांत तिसगे या बंधूंनी वडिलांकडून मिळालेल्या व्यावसायिकतेच्या भांडवलावर लेअर पोल्ट्रीचा व्यवसाय उभारला आहे. ४४ हजार पक्षी क्षमता, दररोज ३२ हजार अंडी उत्पादन असलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल चार कोटींपर्यंत पोचली आहे.

व्यवसायाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय कोणत्याही व्यवसायात यश मिळत नाही. वजीरखेडे (जि. नाशिक) येथील शशिकांत आणि रमाकांत तिसगे या बंधूंनी वडिलांकडून मिळालेल्या व्यावसायिकतेच्या भांडवलावर लेअर पोल्ट्रीचा व्यवसाय उभारला आहे. ४४ हजार पक्षी क्षमता, दररोज ३२ हजार अंडी उत्पादन असलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल चार कोटींपर्यंत पोचली आहे.

अवर्षणग्रस्त मानल्या जाणाऱ्या मालेगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर वजीरखेडे गाव आहे. येथील श्रावण पुंजाराम तिसगे (वय ७२) यांच्याकडे १२ एकर शेती आहे. मूळचे शेतकरी असलेल्या तिसगे कुटुंबीयांची दृष्टी मात्र उद्योजकाची आहे. आता त्यांच्या दोन्ही मुलांनी- शशिकांत व रमाकांत यांनी लेयर पोल्ट्री उद्योगात जम बसवला आहे. शून्यातून सुरू केलेल्या पोल्ट्री उद्योगामध्ये आज ४४ हजार पक्षी असून, प्रतिदिन ३५ हजार अंडी उत्पादन होते.

सातत्याने वाढ केली
१९९८ मध्ये १ हजार ब्रॉयलर पक्ष्यांपासून पोल्ट्री उत्पादनाला सुरवात केली. त्यानंतर दरवर्षी त्यात वाढ करत २००६ पर्यंत फार्म २० हजार पक्ष्यांचा झाला. प्रत्येक आठवड्याला बॅच निघेल असे व्यवस्थापन होते. या उद्योगामध्ये कंपन्यांचा शिरकाव झाल्याने स्पर्धा वाढली. या कंपन्या स्वतःच अत्यंत कमी दर ठरवत. आपले उत्पादन तयार झाल्यानंतर दर आणखी कमी होत. या दरात मांसल पक्षी उत्पादन परवडत नसल्याने अंडी उत्पादनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये १० हजार पक्ष्यांपासून सुरवात केली. २००८ मध्ये १० हजार, २०१४ मध्ये ११ हजार, पुढे १२ हजार या क्रमाने पक्षीसंख्या वाढवत नेली. आता त्यांच्याकडे ४४ हजार पक्षी आहेत.

व्यवस्थापनातील महत्त्वाचे...
उत्पादकता ः कंपनीच्या निकषानुसार एका पक्ष्यानं २० ते ७२ आठवड्यांत ३३० अंडी द्यायला हवीत. तिसगे यांनी त्यांच्या ९० टक्क्यांपर्यंत ( ३२० अंडी) पोचले असून, त्यात सातत्य ठेवले. मालाची गुणवत्ता उंच असल्याने ग्राहक टिकून राहिला आहे. लेयर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात संपूर्ण गुणवत्तापूर्ण कामावर भर दिला जातो. शेडमध्ये पूर्ण स्वच्छता ठेवली जाते.

खाद्य व्यवस्थापन ः पोल्ट्रीमध्ये संपूर्ण शाकाहारी खाद्यांचा वापर केला जात असल्याने माश्या, कीटक किंवा दुर्गंधी यांना स्थान नाही. या खाद्यामुळे अंडे डागविरहित, पूर्ण पांढरे व आकर्षक आकाराचे मिळते. पक्ष्याच्या वयानुसार खाद्यात बदल केला जातो. पक्षी चिक्‍स अवस्थेत असताना २० टक्के खाद्य देतो. दुसऱ्या टप्प्यात १८ टक्केचं खाद्य देतो. तिसऱ्या टप्प्यात १७ टक्के, त्यानंतर १६, १५, १४ या क्रमाने खाद्य देतो. त्यामुळे वय, वजन आणि वाढ यांचं गुणोत्तर साधले जात असल्याचे शशिकांत यांनी सांगितले.

खाद्याचा साठा व नियोजन ः स्वतःच्या १२ एकर शेतीमध्ये प्रामुख्याने मका उत्पादन घेतले जाते. पुढील चार महिने पुरेल इतका खाद्याचा साठा तयार ठेवतो. सध्या सुमारे ४०० टन मका शिल्लक असून, तो जानेवारी २०१९ पर्यंत पुरेल.

नियमित लसीकरण ः ब्रुडिंग, शेडमधील योग्य तापमान, लसीकरण या बाबी महत्त्वाच्या असून, लसीकरणाचे वेळापत्रक कटाक्षाने पाळले जाते.

आधुनिक तंत्रज्ञानावर भर ः लेयर शेडमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करतात. आधुनिक फिडमिलमुळे खाद्य नियोजन सोपे झाले असून, कच्चा माल मोजण्यापासून सर्व कामे स्वयंचलित यंत्रांनी केली जातात. शेड आवारातच १ टन क्षमतेचा वजन काटा घेतला असून, गरजेनुसार ४००-५०० किलो माल एलेव्हेटरच्या साह्याने ग्राइंडरकडे जातो. अचूकतेबरोबरच वेळ व मनुष्यबळाची बचत होते. प्रतिदिन खाद्य, अंडी उत्पादन, मरतूक यांच्या सर्व नोंदी संगणकात ठेवल्या जातात.

मनुष्यबळ व्यवस्थापन ः मजुरांच्या ५ जोड्या पूर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ३ लाखांपर्यंत खर्च करून उत्तम क्वार्टर बांधले असून, आवश्यक सर्व सुविधा दिल्या आहेत. परिसरातील १० जणांना रोजगार मिळाला.

दूध धंद्यातही होती ओळख
रमाकांत तिसगे म्हणाले की, आमच्या वडिलांनी १९८२ मध्ये एक म्हैस आणि पाच लिटर दूध उत्पादनापासून सुरू केलेला व्यवसाय २५ म्हशी आणि २२५ लिटर दूध उत्पादनापर्यंत वाढवला. स्वत:चे व अन्य शेतकऱ्यांचे दररोज ४०० लिटर दूध संकलन होते. त्यातूनच मालेगावला दूध डेअरी सुरू केली होती. संपूर्ण माहिती नोंदी, म्हशीचे खाद्य, विण्याचा कालावधी, त्यासाठीचे नियोजन यातून काळानुरूप व्यवसायात बदल केल्याने दुग्धव्यवसायातही स्वत:ची ओळख निर्माण केली होती. २००९ मध्ये हा व्यवसाय बंद केला.

८० टक्के मालाची जागेवरच विक्री

  • रोटेशनमध्ये उत्पादन मिळण्याच्या उद्देशाने विविध वयाच्या पक्ष्यांचे नियोजन केले जाते. परिणामी वर्षभर व्यापाऱ्यांना पक्षी पुरवठा शक्य होतो. पर्यायाने ८० टक्के व्यापारी कायमस्वरुपी जोडले गेले असून, केवळ २० टक्के उत्पादन बाजारात जाते.
  • वर्षभर प्रतिदिन ३५ हजार अंडी उत्पादन होते. मालेगावला स्वत:चे किरकोळ अंडी विक्री केंद्र आहे. त्यात ३ हजार अंडी विक्री होतात. उर्वरित ३२ हजार अंडी जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री होते. सुमारे ८० टक्के मालाची प्री बुकिंग असते.

शशिकांत तिसगे म्हणतात...

  • पोल्ट्री या क्षेत्रात शून्यापासून सुरवात केली होती. हमालाने आयुष्यात जेवढे पोते उचलले तितके पोते आम्ही मागील १० वर्षांत उचलली आहेत. कष्टाचा आनंद आणि फळ मिळतेच.
  • चांगलं व्यवस्थापन व नियमितपणा हा व्यवसायाचा पाया. मी सकाळी ५ वाजता उठतो. नंतर १ तास फिरण्याच्या व्यायामानंतर शेतावर, शेडवर असतो. अनावश्‍यक बाहेर न जाण्याचे पथ्य मी पाळतो.
  • बाजाराचा अभ्यास महत्त्वाचाच. कच्चा माल खरेदीसाठी मार्केट विश्लेषक दीपक चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतो. नवापूर, नाशिक, अमरावती येथील व्यावसायिक मित्रांशी चर्चा करून बाजाराची अद्ययावत माहिती घेतो. पशुखाद्यावर सुमारे ६५ टक्के खर्च होतो. त्यातील योग्य निर्णयातून २५ टक्क्यापर्यंत बचत साधता येते.
  • विमासंरक्षण आवश्‍यक. वर्ष २०१५ मध्ये जोरदार पावसाने शेड पडला. त्यात साठविलेल्या मक्‍याचं भिजून नुकसान झाले. मात्र विमा उतरवलेला असल्याने ताण आला नाही.
  • ४४ हजार पक्षी क्षमता असून, खर्च वजा जाता २० लाख उत्पन्न मिळते. येत्या काळात १ लाख पक्ष्यांपर्यंत क्षमता वाढविण्याचे ध्येय. आजमितीस आमच्या लेयर पोल्ट्री उद्योगाची ४ कोटीची उलाढाल आहे. व्यवसायातील उत्पन्न पुन्हा व्यवसायातच गुंतविले जाते. दरवर्षी २ लाखांपर्यंत आयकर भरतो.

भविष्यातील नियोजन

  • शीतगृहात आपण आठ महिनेही माल ठेवणे शक्य असते. त्यामुळे शीतगृह उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थात, भारनियमन हे या व्यवसायापुढील आव्हान आहे.
  • उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी एक एकर क्षेत्रात १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे.

शशिकांत तिसगे ः ९४२३१८४६१९

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
कडवंची : हमखास मजुरी देणारं गावद्राक्षबागांमुळे कडवंची गावात बारमाही रोजगार तयार...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...