agricultural stories in Marathi, agrowon, Mahesh Mahajan Banana yashktha | Agrowon

निर्यातक्षम केळी उत्पादनाचा महेश महाजन यांनी घेतलाय ध्यास
महेश विठ्ठल महाजन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

 घरगुती अडचणीमुळे नोकरी सोडून शेतीमध्ये आलेल्या गोरगावले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील महेश दिलीप महाजन यांनी शेतीही तितक्याच काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केला. नवीन असतानाही गेल्या सात वर्षांमध्ये जाणकाराची मदत घेत केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेतले. त्यांचा नवीन शिकण्याचा ध्यास, उत्तम नियोजन यातून त्यांची केळी सौदी अरेबियापर्यंत पोचलीच, मात्र स्थानिक बाजारपेठेतही उत्तम नाव मिळवले आहे.

 घरगुती अडचणीमुळे नोकरी सोडून शेतीमध्ये आलेल्या गोरगावले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील महेश दिलीप महाजन यांनी शेतीही तितक्याच काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केला. नवीन असतानाही गेल्या सात वर्षांमध्ये जाणकाराची मदत घेत केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेतले. त्यांचा नवीन शिकण्याचा ध्यास, उत्तम नियोजन यातून त्यांची केळी सौदी अरेबियापर्यंत पोचलीच, मात्र स्थानिक बाजारपेठेतही उत्तम नाव मिळवले आहे.

जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूमुळे सन २०११ मध्ये त्यांना गावी परत यावे लागले. सुरवातीला गावातील जाणकार शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ऊस आणि केळी अशा पारंपरिक पिके घेऊ लागले. आजवरच्या शेती प्रवासामध्ये, कामांच्या नियोजनामध्ये आई मंगलाबाई आणि पत्नी उज्ज्वला यांची खंबीर साथ मिळाली आहे.

पारंपरिकतेकडून निर्यातक्षम शेतीकडे
पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करताना प्रामुख्याने ऊस, कापूस, कडधान्य पिके यांची लागवड असे. त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत असले तरी नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न महेश यांनी सुरू केला. गावामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादन करून खासगी कंपनीला देणारे एक दोन शेतकरी होते. त्यांच्याशी चर्चा करत, माहिती घेत निर्यातक्षम केळी उत्पादनाचा निर्णय घेतला. त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागातील जाणकार व्यक्तींकडून शास्त्रीय अद्ययावत माहिती मिळवली. अगदी लागवड, रोपांची निवड, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि मार्केटिंग अशा प्रत्येक बाबी हळूहळू शिकून घेतल्या. आत्मसात केल्या.

निर्यातक्षम केळी पिकाचे नियोजन
लागवड ः १.६.२०१७,
क्षेत्र- ४ एकर,
रोपे - ५२००,
लागवडीवेळी रोपाभोवती धैंचा पिकाची पेरणी केली. त्यामुळे हिरवळीचे खताचा फायदा झाला.
लागवडीचे अंतर- ६ x ५ फूट, गादीवाफा पद्धतीने.
खत व्यवस्थान व कीड रोग नियंत्रण- आवश्‍यकतेप्रमाणे विद्राव्य खते वापरली.

घडाची गुणवत्ता सुधारावी यासाठी –
१. निसवनीच्या वेळी केळ फूल दिसल्यावर आंतरप्रवाही कीडनाशकाचा वापर केला.
२. केळी निसवल्यावर ८ फणी ठेवून केळ फुल मोडले.
३. घडावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष दिले.
४. केळी घडाचे उष्णतेपासून संरक्षणासाठी स्कर्टिंग बॅगेचा वापर.
५. योग्य प्रकारे तण नियंत्रण.
६. प्रतिओळ दोन इनलाइन लॅटरलद्वारे ठिबक सिंचन केले आहे.

निर्यातक्षम केळीला मिळाले २०० रुपये अधिक
१० व्या महिन्यापासून केळी काढणीस सुरवात करून २४ मार्च ते २५ एप्रिल या काळात काढणी पूर्ण केली. योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे घडाची गुणवत्ता उत्तम मिळाली. एका खासगी कंपनीने बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल २०० रुपये अधिक दर देत निर्यातीसाठी केळीची खरेदी केली. ही केळी पुढे सौदी अरेबियाला पाठवण्यात आली.

निर्यातक्षम केळी पिकाचा आर्थिक ताळेबंद

 • केळी लागवड सरासरी खर्च ः ८० रु. प्रतिझाड
 • लागवड केलेली रोपे ः ५२००
 • प्रत्यक्ष काढणी केलेली झाडे ः ४९५०
 • सरासरी प्रतिझाड उत्पादन ः २४ किलो
 • एकूण उत्पादन ः ४९५० झाडे x २४ किलो.) ः ११८८ क्विंटल
 • दर प्रतिक्विंटल ः रु. १२००
 • एकूण उत्पन्न - १४,२५,६०० रुपये.
 • एकूण खर्च ः ४,१६,००० रुपये.
 • एकूण फायदा ः १०,३६,६०० रुपये.
 • निर्यातक्षम केळीतून मिळालेल्या उत्तम फायद्यामुळे या वर्षी केळीच्या क्षेत्र ८ एकरने वाढवलेले आहे.

शेतीचे नियोजन ः

 • महाजन यांच्याकडील १३ एकर क्षेत्रापैकी ४ एकर क्षेत्रावर पूर्व हंगामी कापूस पिकाची लागवड करतात. त्यांना ४९ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला ४६०० प्रतिक्विंटल या दराने २,२७,७०० रुपये उत्पन्न मिळाले. पिकाचा उत्पादन खर्च ७० हजार रुपये वजा करता निव्वळ नफा १,५७,७०० रुपये मिळाले. याच शेतावर ४५०० केळी रोपांची लागवड केली.
 • जानेवारी महिन्यात काढणी करून मे महिन्यात केळी रोपांची लागवड केली जाते. या पिकाची काढणी पुढील महिन्यात सुरू होईल.
 • ४ एकर क्षेत्रावर खरीप हंगामात मूग पिकाची लागवड करतात. त्याचे १० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याचा नाफेडच्या हमीभावाने मुगाची खरेदी झाल्यास चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. याच क्षेत्रावर ६००० केळी रोपे लावली असून, मृग बाग केला आहे.
 • मागील रब्बी हंगामात हरभरा पिकातून (क्षेत्र ४ एकर) ४० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून निव्वळ नफा १,६१,२४० रुपये मिळाला.
 • उर्वरित ४ एकर क्षेत्रावर केळी पिकाची नवीन लागवड दि. २४ सप्टेंबर २०१८ रोजी केली आहे.
 • तसेच मुख्य पिकासोबत धैंचा पिकाची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे चवळी, मूग यांसारखी आंतरपिके घेतात. त्यातून उत्पादनासोबत बेवडही चांगले मिळते.

असे असते नियोजन

 • केवळ शेतीवर कुटुंबीयांचा प्रपंच चालवत असल्याने शेतीचे संपूर्ण नियोजन त्या अनुषंगाने करतो.
 • शेतीमध्ये कायमस्वरूपी कामगार (सालदार) असून, त्याला ८५ हजार रुपये प्रतिवर्ष दिले जातात.
 • सध्या मुलगी जिया ही केवळ ज्यू. केजीमध्ये आहे. मात्र, तिच्या शिक्षणासाठी वार्षिक ४० हजारापर्यंत खर्च येतो. हा खर्च भविष्यात वाढत जाणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन आतापर्यंत करत आहे.
 • शेतीमध्ये सुधारणा करणे, यंत्रे व अवजारे यासाठी प्रतिवर्ष १ ते १.५ लाख रु. काढून ठेवतो.
 • घरातील आजारपण, विमा यासंदर्भात योग्य ती तरतूद करत आहे.

निर्यातक्षम उत्पादनाची व काटेकोर व्यवस्थापनाची तंत्रे अद्यापही शिकत आहे. त्यामध्ये गावातील जाणकार शेतकरी, पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ, कृषी विभागातील अधिकारी वर्ष यांची मदत होते. नव्या तंत्रांचा शेतीमध्ये वापर करण्याचा आवर्जून प्रयत्न करतो. भविष्यात त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेमध्ये निर्यातक्षम केळीबाबतचे प्रशिक्षण घेण्याचा मानस आहे.
- महेश दिलीप महाजन, शेतकरी. ९९२२८२११८८.

(लेखक पाल, ता. रावेर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ- पीकसंरक्षण म्हणून कार्यरत आहे. )

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...