agricultural stories in Marathi, agrowon, making of grape vine grafting | Agrowon

द्राक्ष कलम करण्याची पद्धती
सतीश फाळके
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

खुंटरोपाची निवड

डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा साल्ट ग्रीक, ११०आर, सेंटजॉर्ज आणि टेलकी ५ ए.,१६१३ आणि फ्रिडम

जमिनीच्या प्रकारानुसार खुंटरोपाची निवड

खुंटरोपाची निवड

डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा साल्ट ग्रीक, ११०आर, सेंटजॉर्ज आणि टेलकी ५ ए.,१६१३ आणि फ्रिडम

जमिनीच्या प्रकारानुसार खुंटरोपाची निवड

 • जास्त सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आणि क्षारांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीसाठी ः डॉगरीज, डीग्रासेट, रामसे, फ्रिडम आणि १६१३ या खुंटरोपाची निवड करावी.
 • क्षार सहनशील खुंटरोप ःरामसे किंवा साल्ट ग्रीक, डॉगरीज आणि डीग्रासेट
 • कमी पाणी असणाऱ्या जमिनीसाठी खुंट रोपाची निवड ः जास्त सहनशील-११०आर, कमी सहनशील- सेंटजॉर्ज

खुंट कसे तयार करावे ?

 • खरड छाटणी झाल्यानंतर कलम बांधवयाच्या जातीची खुंट रोपाची काडी घ्यावी. निवडलेली काडी गोलाकार व पक्व असावी. काडीवर किमान ४ डोळे असावे.
 • काडी लावण्यासाठी ८ x १५ सेंमी आकाराची नर्सरी पिशवी वापरावी.
 • नर्सरी पिशवीत माती, चांगले कुजलेले शेणखत आणि स्फुरद या खताची मात्रा २:१:१ या प्रमाणात भरावी.
 • निवडलेल्या खुंट रोपाची काडी लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर पाण्यामध्ये बुडवून ठेवावी. यामुळे काडीवरील डोळे लवकर फुटतात.
 • निवडलेली काडी नर्सरी पिशवीमध्ये लावण्यापूर्वी कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये ५ मिनिटे बुडवून घ्यावी. - नर्सरीमधील खुंट रोप २-३ महिन्यांनंतर आधी आखणी केलेल्या शेतामध्ये योग्य अंतरावर स्थलांतरीत करावे.

कलम बांधण्यासाठी खुंटरोपाचे वय
खुंटरोप लागवडीपासून ८ ते ९ महिने वयाचे असावे. ते गोलाकार व पेन्सीलच्या जाडीचे असावे.

कलम काडीची निवड

 • कलम काडी एप्रिल छाटणीपासून सुमारे १२० दिवसांची असावी.
 • काडीचा रंग विटकरी असावा.
 • निवडलेल्या कलम काडीवर किमान दोन चांगले फुगलेले डोळे असावेत.
 • कलम काडीची जाडी ८-१० मिमी असावी.

कलम करताना लागणारे साहित्य ः कलम चाकू, प्लॅस्टिक टेप

कलम करण्याचा योग्य काळ

 • १५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर.
 • वातावरणातील आर्द्रता ८० टक्क्यांच्या वर असते, असा काळ कलम करण्यासाठी योग्य समजावा. आर्द्रता ८०% किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची खूण म्हणजे या काळात बागेमध्ये फिरताना किंवा काम करताना घाम जास्त येतो. या काळात केलेले कलम यशस्वी होते.

कलम करण्याची पद्धत
पाचर कलम -

 • निवडलेल्या खुंट रोपावर जमिनीपासून १ फूट उंचीवर कट करावे. त्यावर साधारण मधोमध दोन इंचाचा उभा काप घ्यावा.
 • कलम काडीवर दोन इंचाचा तिरका काप घ्यावा. कलम काडीची पाचर खुंट रोपावर घट्ट बसवून घ्यावी. त्यावर प्लॅस्टिक टेप हवेचा शिरकाव होणार नाही, अशा पद्धतीने घट्ट बांधावा.

कलम यशस्वी झाले किंवा नाही कसे ओळखावे?
साधारणतः ८-९ दिवसांनंतर कलम काडीवरील डोळे फुटायला सुरवात होते किंवा फुगलेला डोळा तांबूस रंगाचा दिसतो

कलम केल्यानंतर घ्यावयाची काळजी
कलम केल्यानंतर ३-४ दिवसांमध्ये कलम काडीवरील डोळे फुगून नवीन फूट बाहेर पडण्यास सुरवात होते. त्या वेळी उडद्या कीड डोळे कुरतडून खाते. कलम यशस्वी होत नाही. अशा वेळी शिफारशीत अांतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.
कलमाच्या जोडाखालील म्हणजेच खुंट रोपावरील येणाऱ्या फुटी वेळोवेळी काढून टाकाव्यात. त्यामुळे कलम काडीवरील डोळे लवकर फुटण्यास मदत होईल.
कलम जोडावरील गुंडाळलेले प्लॅस्टिक हे कलम काडीच्या आत मध्ये जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी प्लॅस्टिक काडीच्या आत शिरले असेल, तेथील प्लॅस्टिक सुईच्या साह्याने कापून काढावे.

संपर्क ः सतीश फाळके, ८००७१४०२४४

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...