मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च तंत्रज्ञान

मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च तंत्रज्ञान
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च तंत्रज्ञान

परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव देशमुख-वरपूडकर हे सोयाबीन व हरभरा पिकातील विशेषतः त्यातील बीजोत्पादनातील मास्टर शेतकरी आहेत. आपल्या सुमारे १५० एकरांत त्यांचे बहुतांश क्षेत्र याच पिकांसाठी त्यांनी दिले आहे. पाणी व्यवस्थापनाचा त्यांचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म आहे. त्या दृष्टीने पिकाला मोजून मापून पाणी देताना तुषार सिंचनातील रोटरी नोझल्स, बबलर, वॉबलर, रेन कर्टन, एसटी अशा अमेरिकेतील अत्याधुनिक जलतंत्र प्रणालीचा वापर ते करीत आहेत.

परभणी जिल्ह्यात काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी आपली शेती वाचवण्यासाठी जल व्यवस्थापनाचे प्रयोग करताना दिसत आहेत. वरपूड (ता. जि. परभणी) येथील चंद्रकांत अंबादासराव देशमुख- वरपूडकर हे त्यापैकीच दूरदृष्टीचे व पाणी व्यवस्थापनाचा अत्यंत सखोल अभ्यास असलेले शेतकरी आहेत. पाण्याबाबत प्रयोगशीलता   पिकांसाठी मोजून मापून किंवा काटेकोर वापर व त्यासाठी आधुनिक सिंचन प्रणालीचा अंगीकार हे वरपूडकर यांच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म सिंचनातील एक पाऊल पुढे टाकून अमेरिकी तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी सुरू केला आहे. पाण्याचा परिणामकारक वापर करताना त्यांनी आपली दीडशे एकर शेती सिंचनाखाली आणली आहे. वरपूडकर यांची शेती

  • सोयाबीन व हरभरा हीच मुख्य पीक पद्धती. आपल्या दीडशे एकरांपैकी बहुतांश क्षेत्र याच पिकांखाली.
  • या पिकांचे मुख्यत्वे बिजोत्पादन.
  • सारे बियाणे पीक लागवडीखाली असतानाच शेतकऱ्यांकडून ‘बुक’ झालेले असते.
  • दोन्ही पिकांचे बियाणे किलोला ७० रुपये दराने विकतात.
  • यंदा आधुनिक सिंचन प्रणालीआधारे उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग. पीक अत्यंत जोमदार.  
  • शेतीची वैशिष्ट्ये  

  • विविध कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्या सोयाबीन, हरभरा वाणांच्या सुधारीत वाणांचे व लागवड पद्धतीचे प्रयोग सुरवातीला दहा गुंठ्यांत. मिळणाऱ्या निष्कर्षांतून सरस वाणाची निवड करून मोठ्या क्षेत्रावर लागवड.
  • क्षेत्र अधिक असल्याने पेरणी ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण.
  • यंदा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी विकसित केलेल्या हरभऱ्याच्या फुले विक्रम वाणाचे ५० एकरांत बिजोत्पादन.
  • जमीन धारणा मोठी. त्यामुळे परिपक्वतेचा कालावधी ८५ ते ८८ दिवस, ९२ ते ९५ दिवस, १०० ते १०५ दिवस अशा विविध वाणांचे प्रयोग. ‘ड्राय स्पेल’ किंवा परतीच्या पावसामुळे होणारे नुकसान व उत्पादनाची जोखीम कमी होते, असा अनुभव. 
  • कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रयोगांना भेटी देऊन प्रसंशा.  
  • फळपिकांचीही समृद्धी

  • वरपूड शिवारात मध्यम प्रकारची, चांगला निचरा होणारी जमीन
  • सिंचनासाठी चार विहिरी
  • खरिपात सोयाबीन आणि रब्बीत हरभरा ही पीक पद्धती
  • अन्य क्षेत्रात आठ वर्षांपूर्वी आंब्याच्या केशर, पायरी, हापूस, वनराज, हूर, दशहरी आदी जाती.
  • एक एकरावर नारळ, बांबू व जांभूळ     
  • शेतीची आस स्वस्थ बसू देईना

  • चंद्रकांत-वरपूडकर हे माजी कृषी राज्यमंत्री सुरेशराव वरपूडकर, विजयराव व बाळासाहेब
  • यांचे बंधू आहेत. चंद्रकांत यांनी पूर्वी अकोला येथे बियाणे कंपनी स्थापन करून ज्यूट (ताग) बिजोत्पादन व बियाणे विक्री व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात वर्षाला दोन हजार क्विंटल बिजोत्पादन घेतले जायचे. उदगीर, भालकी (कर्नाटक) या भागातून पिवळी ज्वारी खरेदी करून पॅकिंगद्वारे विक्रीही केली. सध्या बांधकाम व्यावसायिक म्हणून ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. देशातील विविध कृषी विद्यापीठे, शेतांना भेटी देऊन पीक पद्धती, जल तंत्रज्ञान अभ्यासतात. गावच्या मातीची ओढ कायम असल्यानेच गावी दर शनिवार आणि रविवारी ते जाऊन येऊन शेती करतात.
  •  जल व्यवस्थापन केंद्रित शेती

  • संपूर्ण शेतीत जल व्यवस्थापन हा मुद्दा वरपूडकर यांनी केंद्रस्थानी ठेवला आहे. त्याच अनुषंगाने शेतीचे सारे नियोजन होते. त्यातील बाबी पुढीलप्रमाणे.
  •  बीबीएफ पद्धतीने पेरणी
  • पावसाचा खंड, अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी मूलस्थानी जलसंधारण व्हावे व मातीची धूप थांबावी या उद्देशाने रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने लागवड.
  •  बीबीएफ पेरणी यंत्रात थोडा बदल केला आहे. यात बियाणे मातीमध्ये सोडणाऱ्या पाइपची लांबी एक फुटापर्यंत कमी केली.  त्यामुळे एकाच ठिकाणी दोन बिया (जोड दाणा) पडत नाहीत. दोन रोपांतील अंतर योग्य राखता येते.  
  • रोटरी तुषार सिंचन

  • सिंचनासाठी चार विहिरी. चारही विहिरींमधील पाणी एकमेकांत ने-आण करण्याची सुविधा
  • एक विहीर ६० फूट खोल व शंभर फूट परिघाची  
  • प्रचलित तुषार सिंचन संचापेक्षा कमी आणि अधिक कार्यक्षमरीत्या पाणी लागणाऱ्या रोटरी तुषार नोझल्सचा वापर
  • तंत्रज्ञान अमेरिकेतून आयात. यात सहा इंची एचडीपीई पाइपची ‘मेन लाइन’ व त्यास तीन इंची लॅटरल वापरून त्यावर नोझल्स लावले जातात.
  • ‘रोटरी नोझल्स’चे फायदे

  • पिकाची वाढीच्या विविध अवस्थेनुसार व मुळांच्या कार्यक्षम कक्षेत पाणी मिळते.  
  • फिल्टर व प्रेशर रेग्युलेटरची सुविधा. हव्या त्या पद्धतीचा दाब नियंत्रित करण्याच्या सुविधेद्वारे नोझल्स चालू व बंद करणे शक्य.  
  • प्रति मिनीट ६ ते २२ लिटर पाण्याचा डिस्चार्ज करण्यासाठी वेगवेगळे नोझल्स   
  • बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आकार लहान- मोठा करता येतो. नोझल्स ० ते ३६० अंशाच्या कोनातून फिरवण्याची व्यवस्था
  • प्रचलित तुषार संचाच्या तुलनेत पाण्याची ५० टक्के बचत  
  • दवबिंदूंप्रमाणे पिकास पाणी मिळते. योग्य आर्द्रता राखता येते.
  • जमीन भुसभुसीत व वाफसा स्थितीत राहाते.
  • वरपडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्यातील जवळपास २५ शेतकऱ्यांनी रोटरी तुषार सिस्टिमचा वापर सुरू केला.
  •   एसटी तंत्र वा रेन कर्टन

  • पावसाच्या प्रदीर्घ खंड काळात पिकास पाणी देण्यासाठी एसटी नोझल्स तंत्राचा वापर. यालाच रेन कर्टन असेही म्हणतात.
  • यामुळे सुमारे ४२ ते ५० मीटर कार्यक्षेत्रापर्यंत जमीन भिजते.
  •  कमी वेळेत पावसाप्रमाणे पिकास पाणी देणे शक्य.  
  • सहा नोझल्स. सर्व पिकांसाठी या तंत्राचा वापर शक्य.  
  • त्याची उंची ३० फुटांपर्यंत असते.
  • प्रचलित रेनगनमध्ये पिकांना पाण्याचा मारा बसतो. एचटी पद्धतीत पाणी एका उंचीवर नेले जाते. गरजेनुसार त्यातून थेंब पाडणे शक्य. एकाच वेळी कमी वेळेत अधिक क्षेत्र भिजवता येते.
  • स्टॅंडर्ड वॉब्लर

  • मायक्रो स्प्रिंकलर आणि फॉगिंग प्रकारचे नोझल.
  • ते एक किलो दाबावर चालते.
  • सुमारे ५५ फूट व्यासाचे क्षेत्र प्रति नोझलद्वारे भिजते.
  • नोझलद्वारे ४ ते १६ लिटर प्रति मिनीट पाण्याचा डिस्चार्ज ॲडजस्ट करणे शक्य.
  • ‘ओव्हरलॅपिंग’ होत नाही. गोलाई सहा मीटर.
  • नेहमीच्या पिकांसह भाजीपाला, रोपवाटिका यांच्यासाठीही उपयुक्त.
  • हाय वॉब्लर

  • सूक्ष्म पद्धतीने पाण्याचे तुषार ऊर्ध्व दिशेने जाऊन खाली पडतात.
  • नोझल्सद्वारे ४ ते १९ लिटर प्रति मिनीट पाण्याचा डिस्चार्ज ॲडजस्ट करता येतो.
  • मूग, उडीद, सोयाबीन आदींसाठी उपयुक्त.
  • यूपी ३- सूक्ष्म तुषार प्रकारातील नोझल्स.
  • साठ फूट व्यासाचे क्षेत्र सिंचित करता येते.
  • डिस्चार्ज ५ ते ३० लिटर प्रति मिनीट.  रोपवाटिकेसाठीही उपयुक्त.
  • आय वॉब

  • ही पायव्होट पद्धत खास फळबागांच्या सिंचनासाठी.
  • एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावरील फळबागांना पाणी देता येते.
  • पंधरा ते २०० लिटर प्रति मिनीट पाण्याचा डिस्चार्ज ॲडजस्ट करता येतो.
  • एक किलोपेक्षा दाब तयार करता येतो.
  • इम्पॅक्ट सिस्टिम
  • (प्रचलित तुषार नोझल सिस्टिम)
  • प्रचलित तुषार संच प्रणाली आहे. मात्र याचा वापर होत नाही.
  • यात नोझल्सद्वारे ३० लिटर प्रति मिनीट या प्रमाणे पाण्याचा डिस्चार्ज.
  • या तंत्रात प्रेशर रेग्युलेटर तसेच स्वतंत्र फिल्टर नसतो. त्यामुळे पाण्याचे थेंब एकसमान पडत नाहीत.
  • विहिरीवरील पंप सुरू होतो तेव्हा त्याचे ‘प्रेशर’ येईपर्यंत पाणी वाया जाते. पंप बंद करतेवेळीदेखील पाणी वाया जाते. त्यामुळे जास्तीच्या पाण्यामुळे पीक खराब होते. चिखल झाल्याने पाइप अन्य ठिकाणी उचलण्यासाठी त्रास होतो.
  •  डान्सिंग म्युझिकल नोझल

  • फूलशेतीसाठी उपयुक्त.
  • यात २० फूट व्यासाचे क्षेत्र भिजविता येते.
  • याद्वारे ५ ते २२ लिटर प्रति मिनीट पाण्याचा डिस्चार्ज शक्य.
  • झिरो परसेंट ओव्हर लॅपिंग
  • नोझल ही नवी संकल्पना
  • वरपूडकर यांनी त्याचा वापर सुरू केला आहे.
  • प्रचलित तुषार संचापेक्षा अधिक क्षेत्र सिंचित करता येते.
  • सुमारे २४ मीटरपर्यंत क्षेत्र भिजते. त्यामुळे पाइप्सची संख्याही कमी लागते. थेंब एकसमान पडतात.
  •  : चंद्रकांत देशमुख-वरपूडकर- ९८२३०४३८०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com