agricultural stories in marathi, agrowon, ONION advice | Agrowon

कांदा, लसूण पीक सल्ला
डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे
शुक्रवार, 30 मार्च 2018

सद्यस्थितीत रब्बी कांद्याची; तसेच बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांद्याची रोपे शेतात उभी आहेत. रांगडा कांद्याची काढणी एकतर झालेली आहे किंवा होण्याच्या स्थितीत आहे. काहींच्या शेतात लसूण पक्व झाला असून तो काढून त्याला साठवणीत ठेवणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत पुढील प्रकारे व्यवस्थापन करावे.

रब्बी कांद्याच्या उभ्या पिकासाठी :

सद्यस्थितीत रब्बी कांद्याची; तसेच बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांद्याची रोपे शेतात उभी आहेत. रांगडा कांद्याची काढणी एकतर झालेली आहे किंवा होण्याच्या स्थितीत आहे. काहींच्या शेतात लसूण पक्व झाला असून तो काढून त्याला साठवणीत ठेवणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत पुढील प्रकारे व्यवस्थापन करावे.

रब्बी कांद्याच्या उभ्या पिकासाठी :

 • सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड २) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी फवारणी करावी. कांदा पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर राहते.
 • पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच करपा, पांढरी सड, मुळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांचे नियंत्रण करावे; तसेच लाल कोळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
 • बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्यात.
 • डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे.
 • पिकाला जमिनीचा मगदूर, तापमान व पिकाची गरज पाहून ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

  पीकसंरक्षण :

 • फुलकीड व करपा, पांढरी सड, मुळकूज नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
  पहिली फवारणी ः प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम
  दुसरी फवारणी ः फिप्रोनील १ मि.लि. अधिक प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम
  तिसरी फवारणी ः कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लाझोल १ ग्रॅम
 • पहिली फवारणी अगोदरच केली असल्यास आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी करावी. दोन्ही फवारण्यांनंतरही नियंत्रण न झाल्यास तिसरी फवारणी करावी. फवारणीमध्ये आवश्‍यकतेनुसार १०-१५ दिवसांचे अंतर ठेवावे.
 • लाल कोळी नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
  ८० टक्के विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा
  डायकोफॉल २ मि.लि.

लसूण पिकाची काढणी व साठवण

 • लसूण काढण्याच्या २० दिवस आधी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्या फवारण्या थांबवाव्यात.
 • पिकाची जवळ-जवळ ५० टक्के पाने सुकल्यानंतर लसणाची काढणी करावी.
 • लसणाची काढणी गड्ड्यांसहित करावी.
 • लसूण गड्ड्यांसह २-३ दिवस शेतातच सुकू द्यावा. यामुळे लसणाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होते.
 • लसूण लहान कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा. फुटलेले गड्डे वेगळे करावेत. तसेच लहान गड्डे प्रतवारी करून वेगळे काढावेत.
 • काढलेल्या लसणाची पाने ओली असताना २० ते २५ सारख्या आकाराच्या गड्यांची जुडी बांधावी व पानांची वेणी बांधून घ्यावी.
 • त्यानंतर अशा जुड्या झाडाखाली किंवा उघड्या असलेल्या छपरीत १५ दिवस सुकवाव्यात. त्यानंतर त्या साठवणगृहात ठेवाव्यात.

कांदा बीजोत्पादनाच्या उभ्या पिकाकरिता

 • फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची फवारणी टाळावी; अन्यथा मधमाश्‍यांना हानी पोचते.
 • अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी.
 • मधमाश्‍यांची संख्या कमी झाल्यास एकरी एक-दोन मधमाश्‍यांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
 • पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • सामान्यतः बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी.
 • सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. ते जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे ३ ते ४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.
 • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पाेचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.
 • मळणी केलेले बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.

डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)
 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...