agricultural stories in Marathi, agrowon, parasitoids in field | Agrowon

परोपजीवी मित्रकीटकांची ओळख
विवेक सवडे, डॉ. धीरज कदम
गुरुवार, 24 जानेवारी 2019

अळी-कोष-परोपजीवी
(Larval-Pupal Parasitoid)
या प्रकारातील परोपजीवीची मादी यजमान किडीच्या अळयांवर किंवा आत अंडी घालतात. आतमध्ये पूर्ण वाढ होऊन यजमान किडीच्या कोषावस्थेतुन प्रौढ़ बाहेर पडतात. उदा. आयसोटीमा जावेन्सिस     ः यजमान -उसावरिल शेंडा पोखरणारी अळी    

कोष-परोपजीवी (Pupal Parasitoid)
या प्रकारातील परोपजीवी मादी यजमान किडींच्या कोषामध्ये अंडी घालते. त्यांच्या अळ्या कोषाच्या आत खाऊन वाढ झाल्यानंतर त्यांचे प्रौढ़ यजमान किडींच्या कोषावस्थेतून बाहेर पडतात.

अळी-कोष-परोपजीवी
(Larval-Pupal Parasitoid)
या प्रकारातील परोपजीवीची मादी यजमान किडीच्या अळयांवर किंवा आत अंडी घालतात. आतमध्ये पूर्ण वाढ होऊन यजमान किडीच्या कोषावस्थेतुन प्रौढ़ बाहेर पडतात. उदा. आयसोटीमा जावेन्सिस     ः यजमान -उसावरिल शेंडा पोखरणारी अळी    

कोष-परोपजीवी (Pupal Parasitoid)
या प्रकारातील परोपजीवी मादी यजमान किडींच्या कोषामध्ये अंडी घालते. त्यांच्या अळ्या कोषाच्या आत खाऊन वाढ झाल्यानंतर त्यांचे प्रौढ़ यजमान किडींच्या कोषावस्थेतून बाहेर पडतात.

परोपजीवी मित्रकीटक  -  यजमान कीड
ब्राचिमिरिया नेफेनटिडीस ,  झांटोपिमप्ला पुन्क्टाटा , 
ट्रायकोस्पिलुस पुपिवोरा , ट्रायकोस्पिलुस इस्रायली    -

नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी
     
पिल्ले-प्रौढ़-परोपजीवी
(Nymphal-Adult-Parasitoid)
या प्रकारातील परोपजीवीची मादी यजमान किडींच्या बाल्यावस्थामध्ये शरीराच्या आत किंवा वर अंडी घालता. त्यातून बाहेर पडलेली अळी यजमान किडीला खाऊन टाकतात. मेलेल्या किडीच्या शरीरामधून पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रौढ़ बाहेर पडतात.

परोपजीवी मित्रकीटक   - यजमान कीड
एपिरिकॅनिया मेलेनोल्यूका    -उसावरिल पायरीला
अफेलिनस मॅली    -सफरचंदावरील मावा
एन्कार्सिया फॉरमोसा अणि एन्कार्सिया फेवोस्कुटेलम   - कपाशीवरील पांढरी माशी

अशा प्रकारे करता येईल परोपजीवी मित्रकीटकांचे संवर्धन :

 • रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच कराव्यात किंवा त्याचा अतिरेकी वापर टाळावा.
 • आलटून-पालटून पीक घेणे तसेच मिश्रित पीकपद्धतीचा नियोजन करावे, तर पट्टापिक कापणी पद्धतीचा अवलंब करावा.
 • नर परोपजीवी परागकणांवर जगत असतात म्हणून पिकांच्या कडेने ज्वारी, मका अणि बाजरी अशा जास्त परागकण असलेल्या पिकांची झाडे लावावीत.
 • जैविक कीटकनाशकांचा पुरेपूर वापर करावा.
 • प्रकाश सापळ्याचा उपयोग सायंकाळी सूर्यास्तानंतर तर सकाळी सुर्योदयाअगोदर २ ते ३ तास करावा. मर्क्युरी बल्बचा वापर करू नये. अशा दिव्यांकडे परोपजीवी मित्रकिटक आकर्षित होत असल्याचे प्रयोगात आढळले आहे.
 • शक्यतोवर निंबोळी अर्क, करंज तेल अशा वनस्पतीपासून बनलेल्या कीडनाशकांचा वापर करावा.
 • काही मित्र किडींची कोषावस्था पालापाचोळ्यात असते म्हणून ते लगेच जाळून नष्ट करू नये.
 • मित्रकीटकांना हानी पोचवणारी तीव्र कीटकनाशके  वापरणे शक्यतो टाळावे.

    जैविक कीड नियंत्रणातील काही महत्त्वाचे मित्रकीटक

ट्रायकोग्रामा :

 • या परोपजीवी कीटकाच्या अनेक प्रजाती असून त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही प्रजाती जैविक नियंत्रणातील एक मुख्य उदाहरण आहे. ट्रायकोग्रामाचे प्रौढ ०.५  मिलीमीटर इतक्या लहान आकाराचे असून, २ ते ३ दिवस जगतात. एक ट्रायकोग्रामाची मादी साधारणपणे १०० अंडी घालू शकते. त्याचप्रमाणे ८ ते ११ दिवसांचा जीवनक्रम, जास्त प्रजनन संख्या, २०० हून अधिक पतंग वर्गीय यजमान किडी यामुळे ही एक महत्त्वाची अंडी परजीवी आहे.
 • या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्‍याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
 • ट्रायकोग्रामा बॅक्टरी ही परोपजीवी कीटक सध्या गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनामध्ये विशेष भूमिका बजावत आहे.   

प्रसारण मात्रा -  एका ट्रायकोकार्डवर सुमारे २० हजार अंडी असतात. अशा ट्रायकोकार्डसचे ५ ते १० प्रति हेक्‍टर या प्रमाणात तर प्रौढांचे ५० हजार प्रौढ प्रति हेक्‍टर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने ४  ते ५  प्रसारणे करावीत.

कोटेशिया : (अपेंटॅलीस)
ब्रॅकोनिड कुटुंबातली हा परोपजीवी असून, नर पतंग साधारणत: ३ मिलिमीटर लांबीचा असतो. तो झाडाच्या फुलातील रस शोषून जगतो, तर मादी यजमान किडीच्या अळीमध्ये अंडी घालते. या परोपजीवीच्या अळी अवस्थेचा विकास होताना यजमान  किडीच्या अळीचा नायनाट करते. अळी नंतर सुप्तावस्थेमध्ये जाते. भाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, उसावरील कांडी कीड, घाटे अळी किंवा बोंड अळी आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. प्रसारण मात्रा - ५० हजार प्रौढ प्रति हेक्‍टर.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...