Parasitoid: परोपजीवी मित्रकीटकांची ओळख

परोपजीवी मित्रकीटकांची ओळख
परोपजीवी मित्रकीटकांची ओळख

सध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या अविवेकी वापर केला जात असल्याने मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा स्थितीमध्ये परोपजीवी मित्रकीटकांची ओळख आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे.

अॅनासियस हे परोपजीवी कीटक सध्या जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे उदाहरण आहे. कपाशीमध्ये सन २००७ -०८  पासून मोठ्या प्रमाणात उपद्रव करणाऱ्या पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात या कीटकांचा मुख्य सहभाग होत आहे.

चिलोनस चिलोनस ब्लॅकबर्नी या परोपजीवी कीटकांचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, कपाशीवरील बोंड अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होत आहे.

प्रसारण मात्रा - ५० हजार प्रौढ़  प्रति हेक्‍टर   प्रमाणे गरजेनुसार ३ ते ४ वेळा, तसेच गोदामामध्ये बटाट्याची साठवण केली असता  ५ प्रौढ़ प्रति किलो प्रमाणे सोडावेत.

एनकार्शिया एन्कार्सिया फॉरमोसा हे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

एपिरिकॅनिया फक्त हाच एक अपवादात्मक परोपजीवी लेपिडोप्टेरा वर्गातील आहे. हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर परजीवीकरण करतो व नियंत्रण करतो.प्रसारण मात्रा - ५० हजार अंडी किंवा ५ हजार कोष प्रति हेक्‍टर वापरावेत.

ब्रेकॉन ब्रॅकोन ब्रेव्हीकोर्निस अणि ब्रॅकोन हेबेटर यांच्या अळी-बाह्यपरोपजीवी आहेत. यांची मादी अळीच्या अंगावर अंडी घालते म्हणून यांना बाह्यपरोपजीवी असे संबोधतात.

कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी व अन्य पतंगवर्गीय यजमान किडींच्या नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. 

प्रसारण मात्रा - ५० हजार प्रौढ प्रति हेक्‍टर. कोपिडोसोमा हे मित्रकीटक बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.  प्रसारण मात्रा - ५००० अळ्या प्रति हेक्‍टर. गरजेनुसार चार ते पाच वेळा प्रसारणे करावीत.

 : डॉ. धीरज कदम, ९४२१६२१९१०,  : विवेक सवडे, ९६७३११३३८३, (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक असून, विवेक सवडे हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com